• New

    चालू घडामोडी प्रश्नसंच : २० नोव्हेंबर २०१७

    प्र. 1) भारताच्या मनुश्री छिलरने मिस वर्ल्ड २०१७ हा किताब जिंकला. हा किताब जिंकणारी ती कितवी भारतीय ठरली आहे?
    a) पहिली 
    b) तिसरी 
    c) पाचवी 
    d) सहावी 

    प्र. 2) South Asia Regional Training and Technical Assistance Center (SARTTAC) च्या सुकाणू समितीची अंतरिम बैठक नुकतीच कोणत्या शहरामध्ये पार पडली?
    a) मुंबई 
    b) हैद्राबाद
    c) नवी दिल्ली 
    d) बंगळुरु 

    प्र. 3) योग्य विधाने ओळखा:
    a) मुडीज्‌ संस्थेने भारताच्या स्थानिक आणि परदेशी चलनदाता मानांकनात बीएए 3 वरुन बीएए 2 अशी सुधारणा केली 
    b) मानांकनाबाबतचा दृष्टीकोन सकारात्मकवरुन  स्थिर असा बदलला. 
    c) 13 वर्षांनंतर भारताच्या मानांकनात सुधारणा करण्यात आली आहे.
    योग्य पर्याय निवडा: 
    1) फक्त a बरोबर 
    2) फक्त a व b बरोबर 
    3) फक्त a व c बरोबर 
    4) a, b, c सर्व बरोबर 

    प्र. 4) चुकीचे विधान ओळखा:- 
    a) चीनमधील शांघाय या शहरात शांघाय सहकार्य संघटनेची बैठकी 15-17 नोव्हेंबर दरम्यान पार पडली.
    b) जून 2017 मध्ये भारत सदस्य बनल्यानंतर शांघाय सहकार्य संघटनेने आयोजित केलेली ही पहिलीच मंत्रीस्तरीय परिषद आहे.
    पर्याय 
    1) फक्त a
    2) फक्त b
    3) a व b दोन्ही 
    4) यापैकी नाही 

    प्र. 5) जागतिक शौचालय दिन कधी साजरा केला जातो?
    1) 16 नोव्हेंबर 
    2) 17 नोव्हेंबर 
    3) 18 नोव्हेंबर 
    4) 19 नोव्हेंबर 

    प्र. 6) यंदाचा इंदिरा गांधी शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
    1) मनमोहन सिंह 
    2) सीएनआर राव
    3) मीरा कुमार 
    4) यापैकी नाही 

    प्र. 7) महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कोणते राज्य 'महिला सुरक्षा दल' स्थापन करणार आहे?
    1) पंजाब 
    2) महाराष्ट्र 
    3) दिल्ली 
    4) हरयाणा 


    प्र. 8) कोणत्या रोगावरील उपचारासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोफत दैनिक औषधी पद्धती सुरू केली आहे?
    1) कॅन्सर
    2) टीबी
    3) विषमज्वर
    4) हृदयरोग 


    प्र. 9) फॉर्च्यून या व्यवसाय मासिकाने नुकतेच जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार कोणता देश जगातील सर्वांत श्रीमंत देश ठरला आहे?
    1) सिंगापुर 
    2) मलेशिया 
    3) दुबई 
    4) कतार 

    प्र. 10) खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या आरबीएल बँकेने कोणत्या शहरात नुकतीच सर्व महिला कर्मचारी असलेली शाखा उघडली आहे?
    1) नवी दिल्ली 
    2) मुंबई 
    3) कलकत्ता 
    4) चेन्नई 

    जॉइन करा आमचे टेलीग्राम चॅनल » @MPSCmantra
    उत्तरे :-
    1) सहावी 2) नवी दिल्ली 3) a, b, c सर्व बरोबर  4) फक्त a (ही बैठक रशियामध्ये पार पडली) 5) 19 नोव्हेंबर  6) मनमोहन सिंग 7) दिल्ली 8) टीबी  9) कतार 10) चेन्नई

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad