• New

    चालू घडामोडी : 18 ऑक्टोबर

    मॅन बूकर पुरस्कार 2017
    - अमेरिकन लेखक जॉर्ज सॉन्डर्स यांना त्यांच्या ‘लिंकन इन द बार्डो’ या कादंबरीसाठी 2017 चा मॅन बूकर पुरस्कार प्राप्त झाला आहे.
    - सलग दुसर्‍या वर्षी अमेरिकन लेखकाला हा पुरस्कार भेटला आहे. यापूर्वीचा पुरस्कार पॉल ब्लेटी यांना ‘द सेलआऊट’ या कादंबरीसाठी भेटला होता.
    मॅन बूकर पुरस्कार
    - इंग्रजी भाषेतील साहित्याला देण्यात येणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार
    - 1969 मध्ये या पुरस्कराची स्थापना झाली.
    - ‘द मॅन ग्रुप’ तर्फे हा पुरस्कार दिला जातो.
    - 50,000 पाऊंड्स असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.




    समशेर खान यांचे निधन
    - भारताचे माजी जलतरणपट्टू समशेर खान यांचे निधन झाले.
    - ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणारे ते भारताचे पहिले जलतरणपट्टू होते.
    - त्यांनी 1956 साली मेलबर्न ऑलिंपिकमध्ये सहभाग घेतला होता.
    - त्यांनी ब्रेस्टस्ट्रोक व बटरफ्लाय या दोन्ही शर्यतीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
    - ऑलिंपिकच्या पात्रता फेरीत त्यांना पाचवे स्थान मिळाले होते. आत्तापर्यंत अशी कामगिरी एकही भारतीय जलतरणपट्टूने केली नाही.
    - 149-1973 पर्यन्त ते सैन्यदलात होते. सैन्यदलात असताना त्यांना 1962, 1971 आणि 1973 च्या युद्धमध्ये भाग घेता आला.
    - ते मूळचे आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील होते.
    - 2016 मध्ये आंध्र प्रदेश सरकारने त्यांना 25 लाख रूपयांचा विशेष पुरस्कार दिला.



    पहिल्या पन्नास विद्यापीठांत भारतातील तीन संस्था
    - क्यूएस या ब्रिटिश संस्थेने आशियातील विद्यापीठांची क्रमवारी 17 ऑक्टोबर 2017 रोजी जाहीर केली.
    - आशिया खंडातील पहिल्या पन्नास विद्यापीठांमध्ये भारतातील तीन संस्थांना स्थान मिळाले आहे.
    - मागील वर्षी याच क्रमवारीत पहिल्या पन्नास विद्यापीठांत भारतातील सहा संस्थांनी स्थान मिळविले होते.
    - या क्रमवारीत सिंगापुर आणि चीन येथील विद्यापीठांचे वर्चस्व आहे.
    - यादीतील पहिल्या पाच संस्था:
    क्रमांक
    संस्था
    देश
    1)       
    नानयंग टेक्नॉलजीकल युनिव्हर्सिटी
    सिंगापुर
    2)       
    नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापुर
    सिंगापुर
    3)       
    हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलजी
    चीन
    4)       
    कोरिया अॅडव्हान्स इंस्टीट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलजी
    कोरिया
    5)       
    द युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग
    चीन
    - यादीतील भारतीय संस्था:
    1) आयआयटी मुंबई - 34 वा क्रमांक
    2) आयआयटी दिल्ली - 41 
    3) आयआयटी मद्रास - 48 
    4) आयआयएस बंगळुरू - 51
    5) आयआयटी कानपुर - 59
    6) आयआयटी खरगपुर - 62
    7) दिल्ली विद्यापीठ - 72
    8) आयआयटी रूरकी - 93
    9) आयआयटी गुवाहाटी -98




    ·        बियॉन्ड द ड्रीम गर्ल- हेमा मालिनी यांचे आत्मचरित्र. दीपिका पादूकोणच्या हस्ते प्रकाशन.
    ·        शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि समाजवादी विचारसारणीचे प्रगतिशील शेतकरी भास्करराव शंकर बोरावके यांचे वयाच्या 86 व्या वर्षी 17 ऑक्टोबर 2017 रोजी निधन झाले. संघटनेची आई असे त्यांना संबोधले जाई.
    ·        #IamThatWomen: केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने स्त्रियांविरोधात स्त्रियांची लैंगिक पूर्वाभिमुखता (bias) समाप्त करण्यासाठी #IamThatWomen हे ऑनलाइन अभियान सुरू केले आहे.
    ·        17 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन (International Day for the Eradication of Poverty)
    -          2017 ची थिम : Answering the Call of October 17 to end poverty: A path toward peaceful and inclusive societies
    ·        हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी Myntra या ई-कॉमर्स कंपनीने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाशी करार केला आहे.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad