• New

    चालू घडामोडी : 20 ऑक्टोबर 2017

    * भारत, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिका (IBSA) यांनी IBSA ट्रस्ट फंड वर नुकतीच स्वाक्षरी केली.
    - उद्देश : विकसनशील देशातील गरिबीविरोधात लढा देणे.
    - दरबान, दक्षिण आफ्रिका येथे पार पाडलेल्या 8 व्या बैठकीत स्वाक्षरी करण्यात आली.
    - प्रत्येक देश एक दशलक्ष अमेरिकन डॉलर्स या निधिमध्ये वाटा देईल.
    - या निधिचे व्यवस्थापन यूएनडीपीचा दक्षिण-दक्षिण सहकार्य हा युनिट बघेल.

    * जयपुर आणि श्रीनगर विमंतळांचा प्रथम क्रमांक 
    - एयरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल-एयरपोर्ट सर्विस क्वालिटी सर्वेक्षणामध्ये जयपुर आणि श्रीनगर विमानतळांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
    - जयपुर विमानतळाने वार्षिक 2 ते 5 दशलक्ष प्रवाशी आकारमान श्रेणीमध्ये जगात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
    - सलग दुसर्‍या वर्षी जयपुरने पहिले स्थान पटकावले आहे,
    - श्रीनगर विमानतळाने वार्षिक 5 ते 15 दशलक्ष प्रवाशी आकारमान श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

    * आदिवासी साक्षमीकरणासाठी सरकारचा खास प्रकल्प 
    - आदिवासी साक्षमीकरणासाठी 'कम्युनिटी अॅक्शन फॉर न्यूट्रिशन' हा प्रयोगिक तत्वावरील प्रकल्प आदिवशी विभाग राबविणार आहे.
    - या उपक्रमाचा कालावधी तीन वर्षांचा आहे.
    - हा प्रकल्प सात आदिवासी जिल्ह्यांत राबवला जाणार आहे. यामध्ये नंदुरबार, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक व पुणे हे जिल्हे आहेत.

    * इंद्र-2017 
    - भारत - रशिया संयुक्त लष्करी सराव 
    - भारताच्या स्वदेशी बनावटीच्या आयएनएस सातपुडा आणि आयएनएस कडमट या युद्धनौका सहभागी होणार आहेत
    - हा सराव रशियामध्ये पार पडणार आहे.
    - 20 ऑक्टोबर 2017 रोजी सुरुवात झाली.
    - आत्तापर्यंत या सरावात आलटून पालटून केवळ एकच सेनादल समाविष्ट होत असे.
    - यावर्षी प्रथमच तिन्ही सेनादले एकाच वेळी सहभागी होत आहेत.

    *मॅन बूकर 2017 
    - अमेरिकी लेखक जॉर्ज सॉन्डर्स यांच्या 'लिंकन इन द बार्डो' या कादंबरीला 2017 चा मॅन बूकर पुरस्कार जाहीर झाला आहे.
    - 50 हजार पाउंडचा हा पुरस्कार सलग दुसर्‍यांदा अमेरिकी लेखकला मिळाला आहे. 
    - गेल्या वर्षी पॉल ब्लेटी यांच्या सेलआऊट या कादंबरीला मिळाला होता.

    * पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीची दिवाळी भारत-पाकिस्तान नियंत्रणरेषेवरील गुरेझ खोर्‍यात (जम्मू-काश्मीर) जवानांसोबत साजरी केली.  

    * अरुणाचल प्रदेशसाठी आयएएस, आयपीएस आणि आयएफएस या अखिल भारतीय सेवांचे स्वतंत्र केडर निर्माण करावा असा ठराव अरुणाचल प्रदेश विधानसभेने संमत केला आहे. अरुणाचल प्रदेशला एजीएमयूटी अंतर्गत (अरुणाचल, गोवा मिझोराम आणि केंद्रशाशीत प्रदेश) केडर आहे.

    * प्रदूषणाशी निगडीत मृत्यूंच्या यादीत भारत प्रथम
    - प्रदूषणाशी निगडीत मृत्यूंच्या यादीत भारत प्रथम क्रमांकावर आहे.
    - नामांकित वैद्यकीय जर्नल The Lancet ने ही यादीकेली.
    - यानुसार 2015 मध्ये 2.51 दशलक्ष लोकांच यामुळे निधन झाले.
    - जगभरातील 9 दशलक्ष निधंनामध्ये भारताचा वाटा 28% आहे.
    - भरतानंतर यादीत चीनचा क्रमांक लागतो.
    - पहिले पाच देश: 
    1) भारत  - 2.51 दशलक्ष 
    2) चीन  - 1.58 दशलक्ष 
    3) पाकिस्तान  - 0.22 दशलक्ष 
    4) बांग्लादेश  - 0.21 दशलक्ष 
    5) रशिया  - 0.14 दशलक्ष 
    _______________________

    आधिक माहितीसाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉइन करा >> @MPSCmantra 
    जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad