चालू घडामोडी : २६ जुलै
जागतिक असमानता कमी करण्यासाठी वचनबद्धता निर्देशांक (Global Commitment to Reducing Inequality Index)
आंतरराष्ट्रीय एनजीओ ऑक्सफॅम आणि डेवलपमेंट फायनान्स इंटरनॅशनल (डीएफआय) यांनी तयार केलेल्या नवीन जागतिक असमानता कमी करण्यासाठी वचनबद्धता निर्देशांकामध्ये भारताला १५२ देशांमध्ये १३२ वा क्रमांक मिळाला आहे.
गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी करण्यासाठी शासनाने कोणती कृती केली आहे यावर आधारित हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे.
निर्देशांकतील पहिले पाच देश : स्वीडन त्यानंतर बेल्जियम, डेन्मार्क, नॉर्वे, जर्मनी आणि फिनलंडचा क्रमांक लागतो.
मर्व्हिन रोझ यांचे निधन
ऑस्ट्रेलियन टेनिस खेळाडू मर्व्हिन रोझ यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी २३ जुलै २०१७ रोजी निधन झाले. टेनिस कारकिर्दीत त्याने ७ ग्रँड स्लॅम किताब जिंकले आहेत. १९५१-५७ दरम्यान त्याने डेव्हिस कप मध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले.
लखनौ मेट्रो
लखनौ मेट्रो स्वतःचे वेगळे रेडियो स्टेशन असलेली भारतातील पहिली मेट्रो ठरली आहे. यासोबतच लखनौ मेट्रो प्रवाश्यांना शुद्ध आणि थंड पाणी मोफत देणारी आणि मोफत सौचलाय सुविधा देणारी देशातील पहिली मेट्रो ठरली आहे.
वर्ल्ड इकनॉमिक आऊटलुक जुलै २०१७
- आंतरराष्ट्रीय नाणे निधीद्वारा हा अहवाल जाहीर केला जातो
- हा अहवाल वर्षातून दोनदा प्रकाशित केला जातो तर दोन वेळा अद्ययावत केला जातो.
- यामध्ये २०१७-१८ साठी भारताचा जीडीपी वृद्धीदर ७.२% असेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
- जागतिक आर्थिक वृद्धीदर २०१७ मध्ये ३.५% तर २०१८ मध्ये ३.६% असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
- भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था
रिलायन्स डीफेंसने दोन नौदल जहाजांचे अनावरण केले
रिलायन्स डिफेन्स अँड इंजिनीअरिंग लिमिटेडने शची आणि श्रुती या दोन नाविक किंनराई गस्त जहाजांचे त्यांच्या पिपवव, गुजरात येथील शिपयार्डमध्ये अनावरण केले आहे.
ही दोन जहाजे खाजगी क्षेत्रातील शिपयार्डद्वारे अनावरण करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या युद्धनौका आहेत.
पी-२१ प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात येणार्या पाच नौकापैकी या दोन आहेत.
सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा
राज्यामध्ये सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा सरकारने ३ जुलै २०१७ रोजी राजपत्राद्वारे प्रसिद्ध केले. असा कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
उद्देश :
1) जातपंचायत या समांतर घटनाबाह्य व्यवस्थेला पायबंद घालणे
2) अंधश्रद्धा, रूढी-परंपरा यातून होणारे शोषण थांबविणे
3) जातपंच्यातीच्या प्रभावाखालील वर्ग मुख्य प्रवाहात आणणे
___________________
# माजी राज्यपाल दिवंगत रा. सू. गवई यांच्या दुसर्या स्मृतिदिनी २५ जुलै २०१७ रोजी त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा ‘अजातशत्रु’ या स्मृतिग्रंथाचे नुकतेच प्रकाशन झाले. आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गवई हे विधान परिषदेचे तीस वर्षे सदस्य होते. त्यांनी सभापती, उपसभापती आणि विरोधीपक्षनेते ही पदे भूषविली.
___________________
प्राणी अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१७
केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने प्राणी अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१७ (मत्स्यालये आणि फिश टॅंक पशू शॉप) नव्याने कार्यान्वयित केला आहे.
शोभिवंत मासे या व्यवसायातील गैरप्रकार रोखण्यासाठी ही नियमावली केली आहे. हा अधिनियम मास्तयालय चालविणारे आणि शोभिवंत मषयांची विक्री करणार्याला लागू होतो
नियमावलीतील काही अटी
- द अॅनिमल वेल्फेयर बोर्ड ऑफ इंडिया आणि त्यांच्याशी संलग्न संस्थेशी परवानगी असल्याशिवाय माशांचे कोठेही प्रदर्शन करता येणार नाही
- मासे विक्रीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्तता झाल्याशिवाय विक्रीचा परवाना मिळणार नाही
- नियमावलीचे पालन विक्रेते करत नसल्यास परवाने रद्द होणार
- यात समुद्री मासे आणि खोल समुद्रातील शोभिवंत माश्यांच्या प्राजननाला बंदी घातली आहे.
बंदी असलेले काही मासे
बाटरफ्लाय फिश
एंजल फिश
ट्रीगर्स
रेसेस
जेली फिश
लायन फिश
क्लाऊन फिश
___________________
# वंशद्वेष विरोधी लढ्याचे नेते नेल्सन मंडेला यांच्यावर भारतीय वंशाच्या डॉक्टरने लिहीलेल्या पुस्तकावरून वादंग निर्माण झाले आहे. या पुस्तकात बर्याच बाबी अयोग्य असल्याचा ‘द नेल्सन मंडेला फाउंडेशनने दावा केला आहे. मंडेला यांचे दहा वर्षे डॉक्टर असणारे विजय रमलकण यांनी ‘मंडेला लास्ट इयर्स’ हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक पेंगविण रॅंडम हाऊसने प्रकाशित केले आहे.
___________________
# जागतिक पुरुष बॉक्सिंग स्पर्धा भारतात
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने पुढील वर्षी (२०१८) होणार्या महिलांच्या तसेच २०२१ मधील पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्याचा निर्णय घेतला आहे.
मॉस्को येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष डॉ. चिंग कुओ वू यांनी ही घोषणा केली.
भारताने आत्तापर्यंत कधीच पुरुषांच्या जागतिक स्पर्धेचे आयोजन केले नव्हते. मात्र, २००६ मध्ये महिलांच्या जागतिक स्पर्धेचे आयोजन भारताने केले होते.
अन्य महत्त्वाचे मुद्दे
- २०१९ मधील जागतिक स्पर्धेचे यजमानपद सोचीला देण्यात आले.
- २०१९ मधील महिलांच्या स्पर्धेचे यजमानपद तुर्कीला देण्यात आले.
- भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष – अजय सिंग
• जागतिक स्पर्धेत भारत –
- महिलांमध्ये मेरी कोमने पाच वेळा जागतिक विजेतेपद मिळविले आहे
- पुरूषांना आत्तापर्यंत तीनच पदके मिळाली असून तीनही ब्रोंझ पदके आहेत
1. विजेनदार सिंग – २००९
2. विकास क्रिशन - २०११
3. शिव थापा – २०१५
________________________________________
जागतिक जलतरण
अॅडम पिटी
ब्रिटनच्या अॅडम पिटी याने पुरुषांच्या 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक जलतरण प्रकारात जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने 26.10 सेकंड अशा विक्रमी वेळेत शर्यत जिंकली. त्याने तिसर्यांदा जागतिक विक्रम मोडला. दोन वर्षापूर्वी नोंदविलेला आपलाच 26.42 सेकंडचा विक्रम मोडीत काढला.
सारा स्योस्ट्रोम
महिलांच्या १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात स्वीडनच्या सारा स्योस्ट्रोम हिने ५५.५३ सेकंद अशी वेस देत विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. तिचे जागतिक स्पर्धेतील नववे पदक ठरले. तिने प्रथम २००९ मध्ये पदक जिंकले होते.
बेंजामिन प्राउड
पुरुषांच्या 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात ब्रिटनच्या बेंजामिन प्राउड याने २२.७५ सेकंद वेळेसह जागतिक स्तरावरील आपले पहिले पदक मिळविले. रिओ ऑलिंपिक स्पर्धेत तो चौथ्या स्थानी आला होता.
कॅटिन्का होस्झु
महिलांची २०० मीटर वैयक्तिक मीडेल शर्यत हंगेरीच्या कॅटिन्का होस्झु हिने 2 मिनिट ७ सेकंद वेळेत जिंकली. जागतिक स्पर्धा या स्पर्धा प्रकारात सलग तीन वेळा सुवर्णपदक मिळविणारी ती पहिलीच जलतरणपट्टू ठरली. तिने यापूर्वी 2013 आणि 2015 मध्ये शर्यत जिंकली होती. रिओ ऑलिंपिक स्पर्धेत तिने तीन सुवर्ण पदके मिळविली होती. तिचे हे सहावे सुवर्ण पदक आहे.

वन लायनर २६ जुलै
• हिन्दी सिनेमांचा सुवर्णकाळ गाजविणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला हिचा मेणाचा पुतळा नवी दिल्ली येथील मदाम तुसा संग्रहालयात लवकरच दाखल होणार आहे.’मुघले आझम’ चित्रपटातील अनारकलीच्या रूपात हा पुतळा असेल.
• शासकीय रस्ते आणि संस्थांना नावे देण्यासाठी दिल्ली सरकारने ‘राज्य नावे प्राधिकरण’ स्थापन केले आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्ष उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे असणार आहेत.
• राष्ट्रीय नफा प्रतिबंध प्राधिकरणच्या सदस्य आणि प्रमुखांची निवड करण्यासाठी नीती आयोगाने पी के सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची स्थापना केली आहे.
• ‘इंदिरा: इंडियाज मोस्ट पॉवरफूल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकाचे लेखक – सागरिका घोस
• आयसीसी महिला विश्वचषक २०१७ च्या संघाच्या कप्तानपदी मिताली राज हिची निवड आयसीसीने केली आहे.
• भाकड गायींना सांभाळण्यासाठी शेतकर्यांना अर्थसाहाय्य पुरविण्याचे गोवा सरकारने ठरविले आहे. १९७८ च्या कायद्यानुसार गोव्यात गोहत्येवर बंदी आहे.
• गूगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या संचालक मंडळावर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय वंशाचे 45 वर्षीय पिचाई हे मूळचे चेन्नईमधील आहेत.
• तमिळनाडूतील शाळांमध्ये आठवड्यातून दोनदा ‘वंदे मतरम, म्हणणे सक्तीचे करा, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत