चालू घडामोडी : २५ जुलै २०१७
# इस्रोचे माजी अध्यक्ष यू आर राव यांचे निधन
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अंतराळ वैज्ञानिक, इस्रोचे माजी अध्यक्ष उडप्पी रामचंद्र राव यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी २४ जुलै २०१७ रोजी बंगळुरु येथे निधन झाले.
यू आर राव यांचा अल्पपरिचय
- १० मार्च १९३२ रोजी आदमरू, कर्नाटक येथे जन्म
- शिक्षण : बीएससी (मद्रास विद्यापीठ,१९५२), एमएससी (मद्रास हिंदू विद्यापीठ,१९५४) आणि पीएचडी (गुजरात विद्यापीठ,१९६०)
- इस्रोच्या बेंगळुरू येथील केंद्रात १९७२ पासून ते वैज्ञानिक म्हणून काम करू लागले
- सतीश धवन यांच्या नंतर १९८४-९४ या काळात इस्रोचे अध्यक्ष (१० वर्षे इस्रोचे अध्यक्ष)
- त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट यासह २० पेक्षा जास्त उपग्रह विकसित करण्यात आले.
- त्यांच्या नेतृत्वाखाली भूस्थिर प्रक्षेपक यान जीएसएलव्ही आणि क्रयोजेनिक तंत्रज्ञान विकासाला सुरुवात झाली.
- एमआयटी, अमेरिका मध्ये अध्यापक वर्गाचे सदस्य
- टेक्सास विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य
- अंतरीक्ष (Antrix) कार्पोरेशनचे ते पहिले अध्यक्ष होते
- ते इंडियन इंस्टीट्यूट फॉर स्पेस सायन्स अँड टेक्नॉलजीचे कुलपती होते
- फिजिकल रिसर्च लॅबरोटरी (अहमदाबाद) आणि नेहरू प्लॅनेटरियम (बंगळुरु) च्या प्रशासकीय परिषदेचे ते अध्यक्ष होते
- पुरस्कार : पद्मभूषण (१९७६), पद्मविभूषण (२०१७), शांति स्वरूप भटनागर पुरस्कार (१९७५),
- २०१३ मध्ये वॉशिंग्टन डी.सी येथील ‘सॅटेलाईट हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश. हा सन्मान मिळवणारे पहिले भारतील अंतराळ वैज्ञानिक
- २०१६ मध्ये ‘इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉटिक्स फेडरेशन (आयएएफ) हॉल ऑफ फेम’ (पहिले भारतीय)
- कर्नाटक विद्यपीठकडून डी.लिट
- एकूण २५ विद्यापीठांच्या त्यांना डॉक्टरेट मिळाल्या
________________________________________
# कोविन्द यांनी राष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारली
नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २५ जुलै २०१७ रोजी औपचारिकरित्या पदाची सूत्रे स्वीकारली. संसदेच्या मध्यवर्ती सभाग्रहात झालेल्या सोहळ्यामध्ये सरन्यायाधीशांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती डॉ. हमीद आंसारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, केंद्रीय मंत्रिमंडळतील सदस्य, संसदेच्या दोन्ही सभाग्रहातील खासदार, सर्व राज्यपाल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख तसेच सर्व देशांचे राजदूत या सोहळ्याला उपस्थित होते.
________________________________________
# दास फेस्ट २०१७
जर्मनीतील बाडेन व्युर्टेन बेर्ग या राज्यातील कार्ल्स रूह शहरात दरवर्षी ‘दास फेस्ट’ हा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी यामध्ये महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी ‘इंडिया समर डेज’ हा दोन दिवसांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. जर्मनीतील बाडेन व्युर्टेन बेर्ग या राज्याने महाराष्ट्राबरोबर मैत्रीकरार केला आहे, तर कार्ल्स रूह या शहराने पुण्याबरोबर मैत्री करार केला आहे.
________________________________________
# लैंगिक अत्याचारच्या तक्रारीसाठी ‘शी बॉक्स’
केंद्र सरकारच्या महिला कर्मचार्यांना कामाच्या ठिकाणी होणार्या लैंगिक अत्याचारविरोधात तक्रार करणे शक्य व्हावे, यासाठी ‘शी बॉक्स’ (सेक्श्यूअल हरॅसमेंट इलेक्ट्रॉनिक बॉक्स) हे ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने या पोर्टलचे उद्घाटन २४ जुलै २०१७ रोजी करण्यात आले. सुरूवातीला यावर केंद्राच्या अखत्यारीतिल महिला कर्माच्यार्यांना तक्रारी नोंदविता येणार असून नंतर त्याची व्याप्ती खाजगी क्षेत्रासाठी वाढविण्यात येणार आहे.
________________________________________
# ‘महिको’चे संस्थापक बारवाले यांचे निधन
‘महिको’च्या माध्यमातून भरपूर उत्पादन देणारे बियाणे शेतकर्यांना उपलब्ध करून देत क्रांती घडवून आणणारे उद्योजक आणि स्वातंत्र्य सैनिक बद्रीनारायन बारवाले यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी २४ जुलै २०१७ रोजी मुंबईत निधन झाले.
अल्पपरिचय
महाराष्ट्र हायब्रिड सिड कंपनीचे (महिको), अध्यक्ष, संस्थापक (कंपनीची जालना येथे स्थापना)
हैदराबाद मुक्ती संग्रामात सहभाग.
जालन्यात बारवाले महाविद्यालय, गोल्डन जुबली स्कूल या शैक्षणिक संस्था स्थापन केल्या
२००१ मध्ये पद्मभूषण पुरस्कार
त्यांना डी. लिट आणि पीएचडी पदविने सन्मानित करण्यात आले
१९९८ मध्ये अमेरिकेच्या वर्ल्ड फूड प्राइज फाऊंडेशनतर्फे ‘वर्ल्ड फूड प्राइज’
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचा राष्ट्रीय संशोधन आणि विकास पुरस्कार
इंटरनॅशनल सिड अँड सायन्स टेक्नॉलजीचा पुरस्कार
१९९६ मध्ये फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल सिड्स मॅनचे मानद सदस्यत्व
# अलीकडेच महिकोने डेंगयू आणि चिकंगुणिया इत्यादि रोगास करणीभूत ठरणार्या नर दसची उत्पत्ती प्रतिबंधित व्हावी यासाठी दावलवाडी येथील संशोधन केंद्रावर संशोधन कार्य सुरू केले.
________________________________________
# राष्ट्रकुल युवा स्पर्धा
या स्पर्धेत भारताने ४ सुवर्ण पादकांसह एकूण ११ फडके जिंकली
भारताने पदक क्रमवारीत सातवे स्थान मिळविले.
भारताचा २८ सदस्यीय संघ केवळ सहा क्रीडप्रकारांत सहभागी झाला होता.
________________________________________
# ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. यशपाल यांचे निधन
ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. यशपाल यांचे वयाच्या ९० व्या वर्षी २४ जुलै २०१७ रोजी नोएडा (उत्तर प्रदेश) येथे निधन झाले. शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती.
अल्पपरिचय
१९२६ मध्ये झांग येथे जन्म (सध्या पाकिस्तानात)
पंजाब विद्यापीठातून १९४९ मध्ये भौतिकशास्त्रात पदवी
१९५८ मध्ये मॅसेच्यूसेट्स इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून भौतिकशास्त्रातच पीएच.डी
टाटा मूलभूत संशोधन संस्थेतून त्यांनी कारकीर्दीस सुरुवात केली
स्पेस अॅप्लिकेशन सेंटर, अहमदाबादचे पहिले संचालक
कॉसमिक रेज ग्रुपचे सदस्य
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू
वैश्विक किरणांच्या संशोधनात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
१९८१-८२ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या अंतराळ क्षेत्राशी संबंधित परिषदेसाठी त्यांची महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
१९८३-८४ मध्ये ते नियोजन आयोगाचे सल्लागार होते
१९८६-९१ विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष
ते विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष होते.
२००९ मध्ये उच्च शिक्षण सुधारणा समितीचे अध्यक्ष (यशपाल समिती)
१९७६ मध्ये पद्मभूषण तर २०१३ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार
२००९ मध्ये कालिंगा पुरस्कार
विज्ञानाच्या लोकप्रियतेसाठी यूनेस्कोचा पुरस्कार
त्यांना इंदिरा गांधी पुरस्कार आणि मेघनाद शहा पुरस्कारही मिळाला आहे
ते दूरदर्शनवरील लोकप्रिय ‘टर्निंग पाँईंट’ या विज्ञान मालिकेत ते ‘विज्ञान गुरू’ च्या भूमिकेत
‘भारत की छाप’ ही मालिकाही त्यांनी केली.
________________________________________
# आरंभ मोबाइल अॅप्लिकेशन
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने ग्रामीण रस्त्यांच्या देखरेखीसाठी कार्यप्रदर्शन आधारित देखभालीसाठी आरंभ हे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले आहे.
________________________________________
# जागतिक सायबर स्पेस कॉन्फरन्स
सायबर स्पेस आणि संबंधित बाबींवरील जगातील सर्वांत मोठी परिषद असलेली पाचवी जागतिक सायबर स्पेस कॉन्फरन्स, २०१७ भारतामध्ये होणार आहे.
प्रमुख मुद्दे
पहिल्यांदाचा ओईसीडी देशांच्या बाहेर परिषद होत आहे
भारतात पहिल्यांदाच परिषदेचे आयोजन
संकल्पना – ‘Cyber4All: An Inclusive, Sustainable, Developmental, Safe and Secure Cyberspace’.
________________________________________
* जगातील पहिली तरंगती पवन शेती (Wind Farm) स्कॉटलंडच्या किनारी स्थापन करण्यात येत आहे.
* भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने जानेवारी २०१८ पासून चहाच्या पिशव्यांवर स्टेप्लर पिन्स लावण्यास बंदी घातली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत