चालू घडामोडी : २७ जुलै २०१७
MPSC MANTRA DAILY CURRENT AFFAIRS
#नितीश कुमार
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यांची साथ सोडत आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि भाजपाच्या पाठिंब्यावर त्यांनी पुन्हा २७ जुलै २०१७ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
नितीश कुमार यांच्याबद्दल
- जन्म – १ मार्च १९५१ बख्तियारपूर (बिहार) येथे
- जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत सहभाग घेऊन राजकीय कारकीर्दीस सुरुवात
- १९८५ मध्ये पहिल्यांदा बिहार विधानसभेत निवडून आले.
- १९८९ मध्ये पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले ( सलग ४ वेळा लोकसभेत निवड)
- १९९०- केंद्रीय कृषीमंत्री
- १९९८-९९ – केंद्रीय रेल्वे मंत्री, रस्ते वाहतूक मंत्री आणि कृषी मंत्री
- अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात ते रेल्वे मंत्री होते. (२००१-२००४)
- २०००- पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री (सात दिवसांत राजीनामा)
- २००५ मध्ये दुसर्यांदा मुख्यमंत्री
- फेब्रुवारी २०१५ ते जुलै २०१७ पाचवे मुख्यमंत्री.
- २७ जुलै २०१७ – बिहारचे सहावे मुख्यमंत्री म्हणून शपथ
# सुशील मोदी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
बिहारमधील पक्षीय बलाबल
एकूण सदस्य – २४३
बहुमतासाठी आवश्यक – १२२
राष्ट्रीय जनता दल – ८०
संयुक्त जनता दल – ७१
भाजप – ५३
कॉंग्रेस – २७
अन्य – १२
___________________
# राज्यातील विशेष आर्थिक क्षेत्राबाबत सध्यास्थिती
राज्यातील मंजूर सेझ – ६८
मंजूर सेझ पैकी कार्यान्वयित – २५
मंजूर सेझपैकी अधिसूचित – ५१
महाराष्ट्राने फेब्रुवारी २००६ पासून सेझ धोरण स्वीकारले
ऑक्टोबर २०१६ पर्यन्त राज्यात २४३ विशेष आर्थिक क्षेत्राचे प्रस्ताव प्राप्त झाले.
३१ ऑक्टोबर २०१६ पर्यन्त ७२ सेझची अधिसूचना रद्द झाली.
राज्यातील कार्यरत सेझ –
कोकण – ६
पुणे – १४
औरंगाबाद – ३
नागपूर – २
______________________
# राज्यातील अंगणवाडीतील बालकांना आता ‘आकार’
विद्या प्राधिकरण पुणे यांच्या समन्वयाने तीन ते सहा वयोगटातील बालकांसाठी ‘आकार’ नावाचा अभ्यासक्रम शिक्षण विभागाने विकसित केला आहे.
उद्देश : आंगणवाडीमध्ये सहा वर्षे पूर्ण झालेली मुले पहिल्या इयत्तेत जाण्यासाठी पात्र करणे
प्रमुख घटक
- राज्यातील शिक्षकांना शाळेतील मुलांबरोबरच अंगणवाडी सेविकांनाही शिकविण्याची जबाबदारी
- शिक्षकांना आठवड्यातून किमान एक वेळा अंगणवाडीला भेट द्यावी लागणार
- अंगणवाडीतिल तिन्ही गटातील अभ्यासक्रम पूर्ण करणार्या बालकांना प्रमाणपत्र
- प्रमाणपत्राच्या आधारे बालकांना पहिलीच्या वर्गामध्ये सहज प्रवेश मिळणार
____________________
# नव्या वेतन विधेयकाला मंजुरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने २६ जुलै २०१७ रोजी नव्या वेतन विधेयकाला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली.
किमान मजुरी कायदा १९४८, वेतन देय कायदा १९३६, बोनस देय कायदा १९६५ आणि समान वेतन कायदा, १९७६ अशा चार कायद्यांना एकत्रित करून नवे किमान वेतन विधेयक तयार करण्यात आले आहे.
या विधेयकामुळे विविध क्षेत्रांतील कार्मचाऱ्यांना किमान वेतनाची शाश्वती मिळणार असून, देशभरातील सुमारे चार कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
हे विधेयक केंद्र सरकारला सर्व क्षेत्रांत किमान वेतन निश्चित करण्यासाठी सक्षम बनवेल व राज्यांना केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागेल.
_________________
#‘खासगीपणा’साठी चार राज्ये कोर्टात
खासगीपणाचा हक्क हा सामान्य कायदेशीर हक्क असून, मूलभूत हक्क नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने मांडली आहे. त्या विरोधातील भूमिका कर्नाटक, पश्चिम बंगाल, पंजाब आणि पुद्दुचेरी या राज्यांनी घेतली आहे.
ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल या राज्यांची बाजू मांडत आहेत. या मुद्द्यावर सुनावणी घेणाऱ्या सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील नऊ सदस्यांच्या घटनापीठापुढे सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली.
___________________
#मंगोलियाच्या अध्यक्षांना भारताचे निमंत्रण
चीनचे टीकाकार म्हणून प्रसिद्ध असलेले मंगोलियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष खल्तमा बत्तुलगा यांना भारताने भेटीचे निमंत्रण दिले आहे. बत्तुलगा यांची नुकतीच अध्यक्षपदी निवड झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये मंगोलियाचा दौरा केला होता. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंगोलियातील अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन बत्तुलगा विजयी झाले.
मंगोलिया
- पूर्व व मध्य आशियातील एक देश
- उत्तरेला रशिया व इतर तिन्ही दिशांना चीन
- उलानबातर ही मंगोलियाची राजधानी व सर्वात मोठे शहर
- मंगोलिया हा जगातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला स्वतंत्र देश
- लोकसंख्या घनता केवळ १.७५ प्रति वर्ग किमी
- मंगोलिया खनिज संपदेने समृद्ध आणि भूवेष्टित (लँड लॉक्ड) देश आहे.
- सध्या मंगोलिया चीनवर आर्थिकदृष्ट्या पूर्ण अवलंबून आहे.
- जानेवारी ते मे काळात झालेल्या मंगोलियाच्या एकूण परदेशी व्यापारापैकी ६८.५ टक्के व्यापार चीनशी झाला.
- मंगोलियातून झालेल्या एकूण निर्यातीपैकी ९० टक्के चीनला झाली.
_______________
#NewBook
‘फ्रीडमःमाय स्टोरी’ - लेखक - अरुणा राजे पाटील, प्रकाशकः हार्पर कॉलिन्स
‘संघर्ष आणि शहाणपण’ - लेखक - नरेन्द्र चपळगावकर, ‘महाराष्ट्रातील समाजेतिहासातील काही अध्याय’ असे उपशीर्षक, प्रकाशक : मौज प्रकाशन, मुंबई
________________
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जुलै २०१७ रोजी रामेश्वरम येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्मारकाचे उद्घाटन केले. कलाम स्थळ येथे त्यांनी डॉ. कलाम यांच्या पुतळयाचे अनावरण केले.
पंतप्रधानांनी “कलाम संदेश वाहिनी” या प्रदर्शनी बस ला हिरवा कंदील दाखवला. ही बस देशभरातल्या विविध राज्यांमध्ये प्रवास करुन 15 ऑक्टोबर माजी राष्ट्रपती कलाम यांच्या जयंती दिनी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे पोहोचेल.
मोदी यांनी त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रामेश्वरम् ते अयोध्या या “श्रध्दा सेतू” नवीन एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी हरित रामेश्वरम् प्रकल्पाची रुपरेषा जारी केली.
__________________
#स्टार्ट अपसाठी कर्ज हमी निधी
केंद्र सरकार 2000 कोटी रुपयांच्या योगदानासह स्टार्टअपसाठी कर्ज हमी योजना तयार करत आहे. ज्यामुळे कोणत्याही ‘तारणा’शिवाय स्टार्ट अपसाठी कर्ज उपलब्ध होईल. प्रस्तावित योजना कर्ज घेण्यासाठी पात्र उमेदवाराला 50 लाख रुपयांपर्यंतचे हमी कर्ज उपलब्ध करून देता येईल. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी २६ जुलै रोजी राज्यसभेत ही माहिती दिली.
__________________
#नई रोशनी योजना
अल्पसंख्यांक महिलांच्या नेतृत्व विकासासाठी असलेल्या नई रोशनी योजनेचा नीती आयोगाने २०१५-१६ साठी मूल्यांकन अभ्यास घेतला.
योजनेचा अल्पसंख्याक महिलांवर होणा-या परिणामाचे मूल्यांकन करणे आणि या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये धोरण / कार्यक्रमांच्या अडचणी ओळखणे हा या अभ्यासाचा मुख्य उद्देश होता.
नई रोशनी योजना
- सुरुवात – २०१२-१३
- मंत्रालय – केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय
- उद्देश – अल्पसंख्यांक महिलांच्या नेतृत्व गुणांचा विकास करणे व त्यांना आत्मविश्वास देणे.
- राबविणारी यंत्रणा- एनजीओ, सामाजिक संस्था
- आत्तापर्यंत १.६७ लाख स्त्रियांना प्रशिक्षण देण्यात आले.
_______________
#कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एन धरम सिंग यांचे निधन
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एन धरम सिंग यांचे वयाच्या ८० व्या वर्षी बेंगळुरू येथे २७ जुलै २०१७ रोजी निधन झाले.
ते कॉंग्रेस-जनता दल आघाडीचे मे २००४ ते फेब्रुवारी २००६ दरम्यान कर्नाटकाचे १७ वे मुख्यमंत्री होते.
अल्पपरिचय
- जन्म – २५ डिसेंबर १९३६ रोजी
- सात वेळा कर्नाटक विधानसभा सदस्य
- १४ व्या लोकसभेचे सदस्य
- १९६०च्या दशकात कॉंग्रेसमध्ये सहभाग
________________________________________
अधिक महितीसाठी मचे टेलीग्राम चॅनल जॉइन करा >> click here to join
कोणत्याही टिप्पण्या नाहीत