• New

    International Solar Alliance

    International Solar Alliance
    जागतिक हवामानबदल परिषदेच्या पार्श्वभूमीवरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने पॅरिसमध्ये फ्रान्सचे पंतप्रधान फ्रँक्वा ओलँद यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची (International Solar AllianceISA) स्थापना करण्यात आली. सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना करण्यात आली आहे.
    संयुक्त राष्ट्रांच्या यंत्रणेत अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी विशिष्ट अशी संस्था नाही. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी आणि इंटरनॅशनल रिन्यूएबल एनर्जी एजन्सी या संस्था काही प्रमाणात हे कार्य पार पाडतात. त्यामुळे केवळ सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणारीत्या ऊर्जेचा प्रसार करणारी आणि अंमलबजावणीसाठी साह्य करणारी ‘ISA’सारखी यंत्रणा हवीच होती.
    पृथ्वीवरील कर्कवृत्त ते मकरवृत्तादरम्यानच्या प्रदेशाला सूर्यप्रकाश विपुल प्रमाणात मिळतो. तब्बल १२१ देश त्या प्रदेशात आहेत. त्या देशांमध्ये वर्षाचे किमान तीनशे दिवस चांगला सूर्यप्रकाश असतो. त्याचा कार्यक्षम वापर करून घेतलातर ऊर्जेची मोठी गरज भागू शकते. या गोष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ISA’ची स्थापना करण्यात आली आहे. या प्रदेशातील सर्व देशांना त्यात सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. या १२१ देशांमध्ये भारतफ्रान्ससहऑस्ट्रेलियाक्युबाफिजीजपानमोझांबिकपेरूसिंगापूरदक्षिण आफ्रिकादक्षिण सुदानमोझांबिकथायलंड आदी देशांचा समावेश आहे. गुडगावमधील ‘National Institute Of Solar Energy’ या संस्थेत ‘ISA’ चे मुख्यालय असेल.
    ISA काय काम करणार?
    ·       सौर ऊर्जानिर्मितीच्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणार.
    ·       पर्यावरण रक्षणासाठी आणि गरिबांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण होण्याच्या उद्देशाने सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार.
    ·       सौर ऊर्जेच्या वापराची क्षेत्रे वाढवण्यासाठी प्रकल्प आणि कार्यक्रम तयार करणार.
    ·       सौर ऊर्जा प्रकल्पातील भांडवली गुंतवणूक कमी करण्यासाठी अनोखी आर्थिक यंत्रणा विकसित करणार.
    ·       सौर ऊर्जा प्रकल्पांशी निगडित माहितीची देवाणघेवाण होण्यासाठी ई-पोर्टलची निर्मिती

    ·       सदस्य देशांमध्ये सौर ऊर्जेसंदर्भातील संशोधनविकासाला प्रोत्साहन देणार आणि क्षमतावृद्धीसाठी मदत करणार

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad