• New

    दिनविशेष : ऑक्टोबर

    2 ऑक्टोबर : जागतिक अहिंसा दिन
    §  दरवर्षी 2 ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंती दिनी जगभरामध्ये जागतिक अहिंसा दिन साजरा केला जातो.
    §  संयुक्त राष्ट्र संघाने 2007 पासून हा दिन साजरा करते.
    §  अहिंसा धोरनाद्वारे जगभरामध्ये महात्मा गांधीच्या शांती संदेशाचा  प्रसार करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.

    ३ ऑक्टोबर : जागतिक अधिवास दिन
    §  ऑक्टोंबर महिन्याचा पहिला सोमवार हा दरवर्षी जागतिक अधिवास दिन म्हणून साजरा केला जातो.
    §  यावर्षी हा दिन ३ ऑक्टोबर या दिवशी साजरा करण्यात आला.
    §  २०१६ ची थीम : हाऊसिंग ऍट द सेंटर
    §  मानवी अधिवासाबाबत ठोस काम करून प्रत्येकाला डोक्यावर छप्पर मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने १९८५ मध्ये योजना मांडली. त्यानुसार १९८६ पासून दर वर्षी वेगळ्या विषयावर हा दिवस साजरा केला जातो.

    ९ ऑक्टोबर : जागतिक टपाल दिन
    §  डाक सेवा आणि त्याची दैनंदिन जीवनातील भूमिका याबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो.
    §  २०१६ ची या दिनाची थीम 'नाविन्यता, एकात्मता आणि समवेशकता' अशी आहे.
    §  भारतात हा दिन डाक विभागामार्फत साजरा केला जातो.
    §  १९६९ मध्ये टोकियो, जपान येथे पार पडलेल्या  युनिवर्सल पोस्टल युनियन काँग्रेस मध्ये या दिनाची स्थापना करण्यात आली.

    १० ऑक्टोबर : जागतिक मानसिक आरोग्य दिन
    §  जगभरामध्ये १० ऑक्टोबर रोजी दरवर्षी मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो.
    §  २०१६ ची संकल्पना 'मानसिक प्रथमोपचार' आहे.
    §  हा जागतिक मानसिक आरोग्य फेडरेशनचा उपक्रम असून जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने साजरा केला जातो.
    §  १९९२ मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला आहे.

    ११ ऑक्टोबर : अंतरराष्ट्रीय बालिका दिन
    मुलींचे अधिकार आणि मुलींना तोंड द्याव्या लागणार्‍या समस्या यांच्या जागृतीसाठी जगभरमध्ये ११ ऑक्टोबर रोजी अंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.  २०१६ ची थीम Girls’ Progress = Goals’ Progress: What Counts for Girls अशी आहे. संयुक्त राष्ट्राच्या आम सभेने २०११ मध्ये या दिवसाची स्थापना केली. 

    १३ ऑक्टोबर : अंतरराष्ट्रीय आपत्ती कपात दिन
    आपत्ती संवेदांक्षम समाज घडवण्यासाठी जनतेत आणि जगभरातील शासनामद्धे प्रोत्साहन देण्यासाठी १३ ऑक्टोबर हा दिवस अंतरराष्ट्रीय आपत्ती कपात दिन म्हणून साजरा केला जातो. २०१६ ची थीम Live to Tell: Raising Awareness, Reducing Mortality आहे. २००९ पूर्वी हा दिवस ऑक्टोबरच्या दुसर्‍या बुधवारी साजरा केला जात होता, मात्र २००९ पासून १३ ऑक्टोबर हा दिन निश्चित करण्यात आला. १९८९ मध्ये या दिनाची स्थापना करण्यात आली.

    १५ ऑक्टोबर : आंतराराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन
    §  ग्रामीण महिलेचे योगदान आणि महत्वपूर्ण भूमिका याबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
    §  ग्रामीण आणि कृषी विकास, गरिबी कमी करणे, आणि अन्न सुरक्षा सुधारणा अशा विविध क्षेत्रातील ग्रामीण स्त्रियांच्या भूमिकेला उजाळा देणे हा या दीनामागचा उद्देश आहे.
    §  २०१६ ची थीम:Climate is changing. Food and agriculture must too.”
    §  पहिल्यांदा हा दिन १५ ऑक्टोबर २००८ मध्ये साजरा करण्यात आला होता.

    १६ ऑक्टोबर : जागतिक अन्न दिन
    संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषि संघटनेचा स्थापना दिवस हा जगभरमध्ये जागतिक अन्न दिन म्हणून साजरा केला जातो. या संघटनेची स्थापना १६ ऑक्टोबर १९४५ मध्ये झाली होती. २०१६ ची थीम Climate is changing. Food and agriculture must too अशी आहे.  पहिल्यांदा हा दिन १६ ऑक्टोबर १९८१ रोजी साजरा करण्यात आला.

    १७ ऑक्टोबर : अंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन
    जगभरमध्ये गरीबी निर्मूलन विशेषतः विकसनशील देशांमध्ये गरीबी निर्मूलन करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी १७ ऑक्टोबर रोजी अंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन साजरा केला जातो. २०१६ या वर्षाची थीम ‘Moving from humiliation and exclusion to participation : Ending poverty in all its forms’ अशी आहे. १९९३ मध्ये पहिल्यांदा हा दिन साजरा करण्यात आला होता.

    २४ ऑक्टोबर : संयुक्त राष्ट्र दिन
    २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेचा चार्टर स्वीकारण्यात आला त्याचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी २४ ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून जगभर पाळला जातो. या वर्षीची पहिल्यांदा स्वातंत्र्य ही संकल्पना आहे.

    २७ ऑक्टोबर : दृकश्राव्य वारशासाठी जागतिक दिवस
    §  दृकश्राव्य दस्तावेजांचे महत्त्व जाणून त्यांच्या जतनासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने युनेस्कोतर्फे 2005 सालापासून दृकश्राव्य वारशासाठीचा जागतिक दिन साजरा केला जातो.
    §  इट्स युवर स्टोरी-डोन्ट लूज इट ही यावर्षीची संकल्पना आहे.

    28 ऑक्टोबर : राष्ट्रीय आयुर्वेद दिन
    §  धन्वंतरी जयंतीच्या दिवशी 28 ऑक्टोबर 2016 रोजी पहिला राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला आहे.
    §  यावर्षीची संकल्पना मधुमेहाच्या नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी आयुर्वेद ही होती.

    ३१ ऑक्टोबर : राष्ट्रीय एकता दिन
    सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी देशभरात राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. २०१६ मधील या दिनाची थीम 'भारताची एकात्मता' हि होती. पहिल्यांदा हा दिवस २०१४ मध्ये साजरा करण्यात आला होता.
    ३१ ऑक्टोबर : जागतिक शहर दिन
    §  नियोजित आणि शास्वत शहरी जीवन प्राप्त करण्यासाठी कार्य करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी जगभरमध्ये जागतिक शहर दिन साजरा केला जातो.
    §  २०१६ मधील या दिनाची संकल्पना “समावेशक शहरे आणि सामायिक विकास” अशी होती.
    §  २०१३ मध्ये एका ठरवद्वारे संयुक्त राष्ट्र साधारण परिषदेने या दिवसाची सुरूवात केली.  


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad