• New

    पुण्यातील विविध संशोधन संस्था

    जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी)
    खोडद-नारायणगाव (पुणे):  येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ ही जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण आहे. रेडिओ दुर्बिणीचे कार्य कसे चालते याचा ‘लाइव्ह डेमो’ येथे पाहता येतो.

    राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (एनसीआरए) (पुणे) : 
    -खगोलशास्त्रात संशोधन करणारी ही महत्त्वाची संस्था.
    -वातावरणातील प्रकाशकिरण, एक्स रे, गॅमा रे, इन्फ्रारेड, रेडिओ लहरींचा अभ्यास करून त्याचे संशोधन या संस्थेत केले जाते.
    - संस्थेतर्फे खोडद येथे जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप उभारण्यात आला आहे.

    सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्प्युटिंग (सी डॅक)
    - विविध प्रकारच्या सुपरकम्प्युटर्सबरोबरच रिमोट व्होटिंग, बायोटेक्नोलॉजी, पेटंटस, रिमोट सेन्सिंग, भारतीय भाषांमध्ये कम्प्युटर्सचा वापर आदीबाबत सी-डॅकमध्ये संशोधन सुरू आहे.

    आयुका
    - ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पुढाकारातून पुणे विद्यापीठाच्या आवारात १९८८ मध्ये ही संस्था स्थापन झाली.
    - येथे विश्वनिर्मिती, विश्वाचे प्रसरण, सद्यस्थिती, कृष्णविवर, गुरुत्वाकर्षण, गुरुत्वीय लहरी आदीबाबत संशोधन सुरू असते.
    - अॅस्ट्रोसॅटच्या निर्मितीत आयुकाचे मोठे योगदान होते.

    सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी (सी-मेट)
    -  देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर निर्मितीला चालना देण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.
    - इलेक्ट्रिकल क्षेत्राला लागणाऱ्या विविध पदार्थांवर, छोट्या भागांवर येथे संशोधन चालते.
    - पॉलिमर्स, सिरॅमिक्स, मिश्रधातूंची निर्मिती व विकास, नॅनोटेक्नोलॉजीवरही येथे काम चालते.

    केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्था (खडकवासला) :
    - सिंचनप्रकल्प व जलस्रोतांंविषयी संशोधन करणारी ही संस्था खडकवासल्याजवळ १९१६ मध्ये स्थापन झाली.
    - येथे जलस्रोत, जलसंधारण, जलविद्युत आणि जलवाहतूक या संबंधी संशोधन चालते.
    - सीडब्ल्यूपीआरएसच्या अलीकडे केंद्रीय जल अकादमी असून येथे पाण्याविषयीचे संशोधन चालते.

    नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी) भोसरीः
    - एचआयव्ही हा विषाणू व एड्स या आजाराबाबत स्वतंत्रपणे संशोधन करणारी ही संस्था.

    आगरकर संशोधन संस्था
    - महाराष्ट्र अॅकॅडमी फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेस (एमएसीएस) अंतर्गत १९४६ मध्ये ही संस्था स्थापन झाली.
    - संस्थेत प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, कृषी, भूशास्त्र, जैवतंत्रज्ञान आदी विषयातील संशोधन चालते.
    - बायोगॅसनिर्मिती, सूक्ष्मजीवांचा औद्योगिक वापर, वनस्पती व धान्यांच्या नव्या प्रजातींविषयी या संस्थेने महत्त्वाचे संशोधन केले आहे.

    राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल)
    - वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएलआयआर) अंतर्गत येणाऱ्या प्रयोगशाळांपैकी ही एक महत्त्वाची संस्था.
    - सर्व प्रकारच्या रसायनांवरील मूलभूत संशोधनाप्रमाणेच उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक रसायने, जैवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, कृषी व नॅनोटेक्नोलॉजी या विषयांवरील संशोधन येथे चालते.

    भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संशोधन संस्था
    -  मान्सूनवर या संस्थेत व्यापक संशोधन सुरू आहे.
    - ढगांचे अंतरंग, वीज कोसळणे, हवामानबदल याबाबत येथे संशोधन चालते.
    - देशातील प्रमुख शहरांमधील प्रदूषण व हवेची गुणवत्ता मोजणारा सफर प्रकल्पही येथूनच राबविण्यात येतो.

    राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही)
    -  अमेरिकेतील रॉकफेलर फाउंडेशनच्या सहकार्याने १९५२ साली ही संस्था पुण्यात स्थापन झाली.
    - प्राण्यांसाठी जीवघेण्या ठरणाऱ्या विषाणूंचा अभ्यास, त्यावर संशोधन करून लस विकसित करण्याचे काम येथे चालते.
    - एन्फ्लुएन्झा, हिपेटायटिस, मलेरिया व अन्य साथीच्या रोगांवरचे तसेच स्वाईन फ्ल्यू बाबतचे संशोधनही येथे सुरू आहे.

    भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी)
    -  हवामानशास्त्रासंबंधीच्या देशभरातील सर्व महत्त्वाच्या नोंदी ठेवून त्याबाबत संशोधन करणारी ही संस्था सिमल्याहून पुण्यात हलविण्यात आली. त्यामुळे त्याला सिमला ऑफिसही म्हटले जाते.
    - हवामानासंबंधीचे संशोधन, अंदाज वर्तविणे, तसेच विविध हवामानशास्त्र उपकरणांचे संशोधन, कृषीबाबत हवामानशास्त्राचा अभ्यास व अंदाज, भूकंपमापन, नोंदी आदी काम येथे चालते.
    - हवामानाच्या नोंदी घेण्यासाठी पूर्वीपासून वापरली जाणारी उपकरणेही येथे पाहता येतात.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad