• New

    चालू घडामोडी : 7 डिसेंबर 2016

    आंबेडकरांची जयंती जलदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय
    ·        केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब अमेडकर यांची जयंती (१४ एप्रिल) देशभरात जल दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी केली.
    ·        डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पाणी व्यवस्थापनाबाबत केलेल्या कार्‍याला उजळा देणे तसेच मौल्यवान पाण्याच्या स्त्रोतांचे व्यवस्थापन करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हा यामागचा हेतु आहे.

    रिसोर्स सॅट-टू एचे यशस्वी प्रक्षेपण
    ·        इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने रिसोर्स सॅट-टू ए या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. हा उपग्रह पूर्णपणे स्थापित झाल्यानंतर तो प्रामुख्याने शेतीविषयक कामांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
    ·        आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन तळावरून पीएसएलव्ही-सी३६ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून हा उपग्रह सोडण्यात आला.
    ·        पीएसएलव्हीचे हे ३८ वे उड्डाण आहे. रॉकेटची एक्सएल आवृत्ती यासाठी वापरण्यात आली. पीएसएलव्हीचे हे ३७ वे यशस्वी उड्डाण होते.
    रिसोर्स सॅट-टू ए बद्दल
    -          यापूर्वी २००३ मध्ये सोडलेल्या रिसोर्स सॅट-१ आणि २०११ मध्ये सोडलेल्या रिसोर्स सॅट-२ चे अनुसरण रिसोर्स सॅट-२सी करणार आहे.
    -          रिसोर्स सॅट-२सी चे वजन १२३५ किलोग्राम असून ८१७ किमी च्या ध्रुवीय कक्षेत सोडले जाणार आहे.
    -          जमीन व पाणीविषयक माहिती मिळवण्यासाठी या उपग्रहाच्या माध्यमातून मिळणारी छायाचित्रे उपयुक्त ठरतील.
    -          या उपग्रहात Linear Imaging Self Scanner (LISS-4) camera, medium resolution LISS-3 camera, आणि  coarse resolution Advanced Wide Field Sensor (AWiFS) camera हे तीन कॅमेरे बसवण्यात आले असून त्यातून मिळणाऱ्या प्रतिमा या कृषिक्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहेत.
    पीएसएलव्ही बद्दल
    -          पीएसएलव्ही हे चार टप्प्यांचे द्रव्य व घन माध्यम असलेले रॉकेट आहे.
    -          १९९४ ते २०१६ दरम्यान या प्रक्षेपकाने १२१ उपगृह अवकाशात सोडले आहेत.
    -          त्यापैकि ४२ उपगृह भारतीय तर ७९ उपगृह परदेशाचे आहेत.
    -          पीएसएलव्ही-एक्सएल ४४.४ मीटर उंच आणि ३२०१ टन वजनाचे आहे  आहे

    राजकीय विश्लेषक चो रामास्वामी यांचे निधन
    ·        ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पत्रकार, भाजपचे माजी राज्यसभा खासदार श्रीनिवास अय्यर रामास्वामी ऊर्फ चो रामास्वामी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले.
    ·        'तुघलक' या राजकीय नियतकालिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते.
    रामास्वामी यांचा अल्पपरिचय
    -          चो रामास्वामी यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९३४ रोजी झाला होता.
    -          त्यांनी वकिलीचा अभ्यास केला होता. त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात सहा वर्षे वकिली केली. 
    -          नंतर TTK ग्रुपचे विधी सल्लागार म्हणून काम पाहिले.
    -          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली होती. मोदी त्यांना 'राज गुरु' असे संबोधत.
    -          त्यांनी २०० सिनेमांत अभिनय केला आहे. २३ नाटके आणि १४ सिनेमाचे संवादलेखन केले आहे तर चार सिनेमांचे दिग्दर्शनही केले आहे.
    -          त्यांच्या 'थेन्मोझियल' नाटकातल्या पात्रावरून त्यांना 'चो' हे नाव पडले.

    आरबीआयचा पाचवा द्विमासिक पातधोरण आढावा
    ·        आरबीआयने पाचवा द्विमासिक पातधोरण आढावा ७ डिसेंबर रोजी जाहीर केला असून त्यामध्ये कोणत्याही दरामध्ये बादल केला नाही.
    ·        धोरणात्मक दर पुढीलप्रमाणे 
    -          तरलता समयोजित सुविधेअंतर्गत (LAF) रेपो दर: ६.२५%
    -          तरलता समयोजित सुविधेअंतर्गत रिव्हर्स रेपो दर : ५.७५%
    -          रोख राखीव प्रमाण (CRR) : ४%
    -          वैधानिक तरलता प्रमाण (SLR) : २०.७५%

    पुणे मेट्रोला अखेर मान्यता
    ·        गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा आणि वादविवादात अडकलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाला अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने ७ डिसेंबर २०१६ रोजी  मंजुरी दिली आहे. पुणे मेट्रो रेल्वे मार्ग महामंडळाच्या पहिल्या टप्प्याला मान्यता देण्यात आली आहे.
    पुणे मेट्रो बाबत महत्वाची मुद्दे
    -          यामध्ये दोन मार्गांचा समावेश असून त्याची एकूण लांबी ३१.२५ किमी असणार आहे.
    -          या प्रकल्पाचा पहिला टप्पा स्वारगेट - पिंपरी-चिंचवड असा १६ किमीचा असणार आहे.
    -          तर वनाज - रामवाडी हा १४ किमीचा मार्ग मेट्रोचा दुसरा टप्पा आहे.
    -          या प्रकल्पासाठी ११ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
    -          महा-मेट्रो द्वारे या प्रकल्पाची अमलबजावणी केली जाणार आहे.
    -          महा-मेट्रो ही केंद्र व राज्य सरकारची संयुक्त कंपनी असून त्यामध्ये ५०:५० % त्यांचा वाटा आहे.
    -          या प्रकल्पाला मेट्रो रेल्वे (ऑपरेशन अँड मेंटेनन्स) कायदा २००२, मेट्रो रेलवे (कन्स्ट्रक्शन ऑफ वर्क) कायदा १९७८ आणि रेल्वे कायदा १९८९ या कायद्यांचा आधार असणार आहे.

    इंग्रजी जगातील सर्वाधिक शक्तीशाली भाषा
    ·        जागतिक शक्तीशाली भाषा निर्देशांक २०१६ मध्ये जगातील सर्वात शक्तीशाली १० भाषांमध्ये इंग्रजीने पहिला क्रमांक पटकावला आहे.
    ·        जागतिक आर्थिक मंचाद्वारे हा निर्देशांक जाहीर केला असून यादीमध्ये हिन्दीला दहावे स्थान प्राप्त झाले आहे.
    निर्देशांकतील काही महत्वाची मुद्दे
    -          जगभरमध्ये ६००० पेक्षाही जास्त भाषा बोलल्या जातात.
    -          पहिल्या दहा भाषा : इंग्रजी.  मँडेरियन, फ्रेंच, स्पॅनिश, अरेबिक, रशियन, जर्मन, जापनीज, पोर्तुगीज आणि हिंदी
    -          यापैकी पहिल्या सहा भाषा संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयीन भाषा आहेत.
    -          हिन्दी ही भारतामध्ये प्रामुख्याने बोलली जाणारी भाषा असून ४१% लोक हिन्दी बोलतात.
    -          एकूण ३३५ दशलक्ष लोकांची इंग्रजी ही स्थानिक भाषा आहे, त्यामधील २२५ दशलक्ष लोक अमेरिकेमध्ये आहेत.
    -          इतर भाषांसमवेत इंग्रजी ही जगभरात ११० देशांमध्ये बोलली जाते.
    -          दहा जागतिक आर्थिक केंद्रांपैकी आठ या इंग्रजी बोलीभाषा वापरणारे शहरे आहेत.
    -          शक्तीशाली भाषा निर्देशांक (PLI) हा भाषेचा प्रभाव आणि पोहोच यांचे मूल्यांकन करण्याचा एक पद्धतशीर मार्ग आहे.
    -          हा निर्देशांक विविध २० निर्देशकांवर अवलंबून आहे.

    डोनाल्ड ट्रम्प  यांची टाइम पर्सन ऑफ द इयर २०१६ साठी निवड
    ·        प्रस्थापितांविरोधात जोरदार प्रचार करून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिकणार्‍या डोनाल्ड ट्रम्प  यांची टाइम पर्सन ऑफ द इयर २०१६ साठी निवड करण्यात आली आहे.
    महत्वपूर्ण मुद्दे
    -          हिलरी क्लिन्टन दुसऱ्या क्रमांकावर  आहेत तर ऑनलाइन हॅकर्सनी तिसरा क्रमांक पटकावला आहे.
    -          टाइमने जगभरातील ११ दिग्गजांच्या नावांची यादी तयार केली होती. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांचा समावेश होता.
    -          टाइमने केलेल्या वाचकांच्या ऑनलाइन चाचणीत मोदी यांनी बाजी मारली होती. त्यांना सर्वाधिक १८ टक्के मते मिळाली होती. तर ट्रम्प आणि असांज यांना केवळ ७ टक्के मते मिळाली होती.
    -          वाचकांची पसंती कुणालाही असली तरी अंतिम निवड मात्र संपादकांच्याच हाती असते
    -          टाइम या नियतकालिकाने १९२७ पासून पर्सन ऑफ द इअर हा सन्मान देण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम १९२७ मध्ये चार्ल्स लिंडबर्ग यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. लिंडबर्ग यांनी एकट्याने अटलांटिकवरून विमान प्रवास केला होता.
    -          आतापर्यंत केवळ एकाच भारतीय व्यक्तीचा या यादीमध्ये समावेश आहे. १९३० मध्ये महात्मा गांधी यांना पर्सन ऑफ द इअर म्हणून घोषित केले होते.
    -          दांडी यात्रा आणि मीठाचा सत्याग्रह या कारणांमुळे त्यांची निवड पर्सन ऑफ द इअर म्हणून झाली होती.
    -          एखादी व्यक्ती तिने जगावर नकारात्मक प्रभाव जरी टाकला असेल त्या व्यक्तीला देखील पर्सन ऑफ द इअर घोषित केले जाते.



    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad