• New

    चालू घडामोडी : 5 व 6 डिसेंबर 2016

    हैलाकांडी (आसाम) : कामगारांना कॅशलेस पगार देणारा पहिला जिल्हा
    ·        आसाममधील हैलाकांडी (Hailkandi) जिल्हा चहा कामगारांना रोकडविरहित पगार देणारा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे. चहा कामगाराला त्यांच्या वयक्तिक खात्यात त्यांचा पगार जमा केला जात आहे.
    ·        आसाम ग्रामीण विकास बँकेच्या पाच बँक प्रतिनिधींमार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात अली आहे.

    तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन
    ·        एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे वयाच्या 68 व्या वर्षी चेन्नईतील अपोलो रुग्णालयात निधन झाले.
    ·        २०११ मध्ये डीएमकेच्या एम करुणानिधी यांचा पराभव करत जयललिता या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. मात्र २०१४ मध्ये बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी जयललिता यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. मात्र यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष ठरविल्याने जयललिता या पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या होत्या.
    जयललिता यांच्याविषयी
    ·        जयललिता यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८ मध्ये पूर्वीच्या म्हैसूर पण सध्याच्या कर्नाटकमधील मेलूकोटे या गावात झाला.
    ·        'अम्मा' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जयललिता यांचे पूर्ण नाव जयललिता जयरामन असे आहे.
    ·        त्यांनी अनेक तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटामधून अभिनय केलेला आहे.
    ·        त्यांनी एपिसल या इंग्रजी चित्रपटात देखील काम केले होते.
    ·        दहावीच्या परीक्षेत त्यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवत राज्य सरकारचा गोल्ड स्टेट अॅवॉर्ड मिळवला होता.
    ·        वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी कन्नड चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली होती.
    ·        १९६५ ते १९७२ दरम्यान त्यांनी एम.जी.रामचंद्रन यांच्या सोबत चित्रपटात काम केले.
    ·        त्यांनी रामचंद्रन यांच्यासोबतच १९८२ मध्ये राजकारणात प्रवेश केला.
    ·        १९८४ ते १९८९ दरम्यान त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या.
    ·        १९८७ मध्ये रामचंद्रन यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी स्वतःला रामचंद्रन यांचे उत्तरधिकारी म्हणून जाहीर केले.
    ·        १९८९ मध्ये त्या विरोधी पक्षनेत्या झाल्या.
    ·        १९९१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षासोबत आघाडी केली होती. या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला आणि २४ जून १९९१ रोजी त्या राज्याच्या पहिल्या महिला आणि तरुण मुख्यमंत्री झाल्या.
    ·        सहा वेळा त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंतीपद भूषविले आहे.
    ·        १९९६ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
    ·        २००१ मध्ये त्यांनी पुन्हा सत्ता मिळवत दुस-यांदा मुख्यमंत्री झाल्या.
    ·        त्यानंतर २०११ पासून त्या मुख्यमंत्रीपदावर आहेत.
    ·        मद्रास विद्यापीठाने त्यांना १९९१ मध्ये मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली.
    ·        १९९७ मध्ये त्यांच्या जीवानावर 'इरुवर' या तामिळ चित्रपटआला होता. त्यामध्ये ऐश्वर्या रायने जयललितांची भूमिका साकारली होती.

    पनीरसेल्वम तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री
    ·        जयललिता यांच्या निधनानंतर ओ पनीरसेल्वम यांचा तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून  शपथविधी झाला.
    ·        त्यांना पद व गोपनीयतेची शपथ राज्यपाल विद्यासागर राव यांनी दिली आहे.
    ·        यासोबतच मंत्रिमंडळाच्या 31 मंत्यांनीही शपथ घेतली आहे.
    ·        ते तामिळनाडूचे तिसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. पनीरसेल्वम यापूर्वी दोनवेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
    ·        २००१ ते २००२ ही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा पहिली वेळ. त्यानंतर सप्टेंबर २०१४ ते मे २०१५ या काळात सर्वोच्च न्यायालयाने जयललिता यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केल्यावर हा कार्यभार पुन्हा पनीरसेल्वम यांच्याकडे आला होता.

    लाँचपॅड: अमेझॉनचा स्टार्टअप उपक्रम
    ·        इ-कॉमर्स कंपनी अमेझॉनने भारतामध्ये त्यांचा जागतिक स्टार्टअप उपक्रम 'लाँचपॅड' सुरु केला आहे.
    ·        या उपक्रमाद्वारे भारतीय स्टार्टअप्सना परदेशांत त्यांचे उत्पादन विकत येणार आहे.
    ·        यासाठी अमेझॉनने स्टार्टअप इंडिया आणि नॅस्कॉम सोबत भागीदारी केली आहे.

    कोकण १६ : भारत-यूके संयुक्त नौदल सराव
    वार्षिक द्विपक्षीय नौदल सराव कोकण १६ मुंबई येथे भारतीय नौदल आणि ब्रिटिश नौदल रोयल नेवी मध्ये ५- १६ डिसेंबर २०१६ दरम्यान पार पडला.
     महत्वाची मुद्दे
    -          हा सराव मुंबई आणि गोवा येथे दोन टप्प्यांमध्ये पार पडला आहे.
    -          ५ ते ९ डिसेंबर दरम्यान मुंबई येथे तर १२ ते १६ डिसेंबर दरम्यान गोवा येथे हा नौदल सराव पार पडला आहे.
    -          २००४ पासून हा नौदल सराव घेतला जातो.

    न्या. जे. एस. खेहर ४४ वे सरन्यायाधीश
    ·        राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या स्थापनेबाबतचा वादग्रस्त कायदा रद्द ठरवणाऱ्या पाच सदस्यीय घटनापीठाचे प्रमुख न्या. जगदीश सिंग खेहर यांची देशाचे ४४ वे सरन्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली आहे.
    ·        न्या. खेहर हे शीख समाजातील पहिले सरन्यायाधीश असतील.
    ·        विद्यमान सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर हे ३ जानेवारी रोजी निवृत्त होत असून आपला उत्तराधिकारी म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश खेहर यांच्या नावाची शिफारस केली आहे.
    ·        न्या खेहर २७ ऑगस्ट २०१७ पर्यंत हे पद भूषवतील.
    ·        न्या. खेहर यांची सप्टेंबर २०११मध्ये सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती झाली होती.
    न्या. जगदीश सिंग खेहर यांच्याबद्दल
    -          त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९५२ मध्ये झाला
    -          १९७७ मध्ये पंजाब विद्यापीठातून त्यांनी एलएलबी पूर्ण केली तर १९७९ मध्ये त्याच विद्यापीठातू त्यांनी एलएलएम पूर्ण केले.
    -          पंजाब आणि हरियाणा उछ न्यायालय, हिमाचल प्रदेश उछ न्यायालय, आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली केली आहे.
    -          २००८ आणि २००९ मध्ये त्यांना पंजाब आणि हरियाणा उछ न्यायालयात कार्यकारी न्यायाधीश म्हणून नेमण्यात आले.
    -          २००९ मध्ये ते उत्तराखंड उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश बनले.
    -          २०१० मध्ये ते कर्नाटक उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश बनले.
    -          २०११ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून रुजू झाले.
    -          न्यायिक नियुक्ती आयोग कायदा आणि ९९ वी घतांनादुरुस्ती संबंधित पाच सदस्यीय घटनात्मक पिठाचे ते प्रमुख होते.
    -          अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रपति राजवटी संबंधित पिठाचेही ते प्रमुख होते.

    # भारताने व्हिएतनामच्या सुखोई-३० लढाऊ विमानाच्या पायलट्सना प्रशिक्षण देण्याचे मान्य केले आहे.
    # भारताच्या इज ऑफ डुईंग बिजनेसला  सहायय करण्यासाठी केंद्र सरकारने युके सोबत करार केला आहे.

    उपेक्षित नोबेल विजेत्याचा पाक पुन्हा सन्मान करणार
    ·        ज्या व्यक्तीने पाकिस्तानला पहिले नोबेल मिळवून दिले आणि आजतागायत पाकिस्तान त्या उपेक्षित व्यक्तीचा तिरस्कार करत होता, त्या व्यक्तीचा पाकिस्तान आता सन्मान करणार आहे.
    ·        पाकिस्तानमधील कायदे ए आझम विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाला भौतिकशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विजेते प्रोफेसर दिवंगत अब्दुस सलाम यांचे नाव देण्यात येणार आहे.
    ·        अब्दुस सलाम यांना 1979 मध्ये शेल्डन ग्लाशो आणि स्टिव्हन वाइनबर्ग यांच्यासह संयुक्तपणे भौतिकशास्त्रातील नोबेल देण्यात आले होते.
    ·        देवकण शोधण्याचा मार्ग त्यांनी शोधून काढला होता आणि हा शोध शंभर वर्षांतील सर्वांत मोठे यश मानले जात होते.



    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad