चालू घडामोडी : 4 डिसेंबर 2016
|
४ डिसेंबर : भारतीय नौदल दिन
|
·
भारतीय नौदलाची भव्यता, यश आणि भूमिका प्रदर्शित करण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबर
रोजी भारतीय नौदल दिन साजरा केला जातो.
·
२०१६ चा हा ४५ वा
नौदल दिन होता.
# का साजरा केला जातो?
१९७१ साली भारताच्या नौदलानं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात
कराची बंदरावर हल्ला करण्यात, विशाखापट्टणमवरचा
हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची
कामगिरी बजावली होती. या कामगिरीचं नाव होतं ऑपरेशन ट्रायडण्ट. ४ डिसेंबरला
ही कामगिरी यशस्वी झाली. या कामगिरीला सलाम म्हणून भारतीय नौदल दिन साजरा करते.
|
हार्ट ऑफ आशिया
परिषद
|
·
३-४ डिसेंबर २०१६
दरम्यान दोन दिवसांची सहावी हार्ट ऑफ आशिया परिषद अमृतसर
मध्ये पार पडली.
·
पंतप्रधान नरेंद्र मोदी
आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घणी यांनी संयक्त पणे या परिषदेचे उद्घाटन केले
होते.
·
चीन, अमेरिका, रशिया, पाकिस्तान
आणि इराणसह या परिषदेत ३० देश सहभागी झाले होते.
·
केंद्रीय अर्थमंत्री
अरुण जेटली यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले आहे.
·
अफगाणिस्थानकडे परिषदेचे
कायमस्वरूपी अध्यक्षपद असून यंदा भारताकडे सहअध्यक्षपद आहे.
·
या परिषदेमध्ये दहशतवाद
हा मुख्य भर असलेल्या अमृतसर घोषणेचा स्वीकार करण्यात आला आहे.
·
परिषदेची थीम: Addressing Challenges, Achieving Prosperity.
·
चर्चेतील विविध मुद्दे
१) आशियाच्या विविध भागामध्ये, विशेषतः अफगाणिस्तानमध्ये
असणारा दहशतवाद
२) जहालमतावादाविरोधातील उपाय
३) सांस्कृतिक आणि नागरी संस्कृतीमधील सामान धाग्यांचा पुरेपूर वापर
४) शिक्षणाच्या क्षेत्रातील सहकार्य वाढविणे
हार्ट ऑफ आशिया परिषदेबद्दल
·
हार्ट ऑफ आशिया परिषदेची
सुरुवात २ नोव्हेंबर २०११ रोजी तुर्कीमधील इस्तंबूल येथून झाली. त्यामुळे
या परिषदेला इस्तंबूल प्रोसेस म्हणूनही ओळखले जाते.
·
सहभागी देश : अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान,
चीन, इराण, रशिया,
सौदी अरेबिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्की,
तुर्कमेनिस्तान, आयुक्त अरब अमिराती.
·
पाठिंबा देणारे देश: अमेरिका, ब्रिटन, फ्रांस,
जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा,
डेन्मार्क, इजिप्त, युरोपियन
महासंघ, फिनलँड, इराक, इटली, जपान, नॉर्वे, पोलंड, स्पेन, स्वीडन.
·
परिषदेचा उद्देश काय?
१) अफगाणिस्तानला मध्यावर ठेऊन विभागातील सहकार्य वाढवण्यासाठी व्यासपीठ तयार
करणे.
२) अफगाणिस्तानात स्थिरता आणतानाच सुरक्षित वातावरण तयार करणे
३) अफगाणिस्तानबरोबरच शेजारील देशांच्या व विभागातील भागीदार देशांच्या सामायिक
हितसंबंधांचा आणि आव्हानांचा विचार करणे.
·
परिषद पुढील
त्रिसूत्रीवर आधारित आहे:
१) राजकीय चर्चा
२) विश्वास निर्मितीसाठीचे उपाय
३) विभागीय संघटनांबरोबर सहकार्य
|
स्तनपान सुरक्षा
अँप
|
·
केंद्रीय आदिवशी व्यवहार
मंत्री जुयल ओराम यांनी स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी 'स्तनपान
सुरक्षा' मोबाइल अप्लिकेशनचे उद्घाटन केले
आहे.
·
हे अप्लिकेशन ब्रेस्टफिडींग
प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया (BPNI) ने विकसित केले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महात्मा गांधी शृंखला २००५ मध्ये विमुद्रिकरण करून
२० आणि ५० रुपयाची नवीन नोट जरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
|
जागतिक आयुर्वेद
काँग्रेस
|
·
७ वी जागतिक आयुर्वेद काँग्रेस २ ते ४ डिसेंबर २०१६ दरम्यान कलकत्ता येथे
पार पडली.
·
आयोजक? केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या साह्याने
वर्ल्ड आयुर्वेद फाउंडेशनद्वारे आयोजन करण्यात आले होते.
·
उद्देश? आयुर्वेद, योग आणि
निसर्गोपचार, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी असलेल्या आयुष औषध प्रणालीच्या विकास आणि वाढीसाठी सुविधा
उपलब्ध करून देणे.
·
मुख्य संकल्पना? आयुर्वेदिक परिसंस्थेला मजबूत करणे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत