चालू घडामोडी : 3 डिसेंबर 2016
केहकशा बसूला आंतरराष्ट्रीय
बाल शांतता पुरस्कार
|
·
दुबईस्थित भारतीय वंशाची
पर्यावरण कार्यकर्ती केहकशा बसू (वय १६ वर्षे) हिला आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार
नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
·
तिचे सगळे कार्य
पर्यावरण क्षेत्रात असून एकूण ४५ देशांत फिरून तिने पृथ्वीच्या संरक्षणाचा संदेश
पोहोचवला आहे.त्याबद्दल तिला हा पुरस्कार देण्यात आला.
·
दुबईत जन्मलेल्या
केहकशाचे आईवडील भारतीय आहेत.
·
देयरा इंटरनॅशनल स्कूलची
विद्यार्थिनी असलेल्या केहकशाने वयाच्या चौदाव्या वर्षी ‘ग्रीन होप’ ही
संस्था संयुक्त अरब अमिरातीत सुरू केली.
·
आता ती संयुक्त
राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाची जागतिक समन्वयक आहे.
·
अमेरिका, ओमा, नेपाळ, मेक्सिको,
कोलंबिया, फ्रान्स या देशात पाच हजार झाडांची
लागवड करण्याचा प्रयोग तिने केला.
·
केहकशा ही वर्ल्ड फ्युचर
कौन्सिलची युवा दूत आहे.
·
तिचा जन्म पर्यावरण दिनी
झाला असून प्रत्येक जन्मदिनी ती एक झाड लावते.
·
तिला आतापर्यंत शेख
हमदान पुरस्कार व डायना पुरस्कारही मिळाला आहे.
उसेन बोल्टला, अल्माझ अयाना वर्ल्ड ऍथलेट ऑफ द इयर
|
·
जमैकाच्या उसेन बोल्टला पुरूष
श्रेणीतील २०१६ चा वर्ल्ड ऍथलेट ऑफ द इयर पुरस्कार जाहीर झाला आहे.
·
त्याला हा पुरस्कार सहाव्यांदा
मिळाला आहे. यापूर्वी २००८, २००९, २०११, २०१२, आणि २०१३ मध्ये त्याला हा पुरस्कार मिळाला
आहे.
·
इथिओपियाची अल्माझ अयाना
हिला महिला श्रेणीतील २०१६ चा वर्ल्ड ऍथलेट ऑफ द इयर पुरस्कार जाहीर झाला आहे.
·
इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ
ऍथलेटिक्स फेडरेशन मार्फत हा पुरस्कार दिला जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत