• New

    चालू घडामोडी : 2 डिसेंबर 2016

    चित्र रामकृष्ण
    ·        राष्ट्रीय शेअर बाजाराच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्र रामकृष्ण यांनी २ डिसेंबर रोजी पदाचा राजीनामा दिला आहे.
    ·        एनएसइ प्राथमिक समभाग विक्रीसाठी (IPO) पुढील महिन्यात आणत आहे. यावरून संचालक मंडळामध्ये झालेल्या मतभेदामुळे रामकृष्ण यांनी राजीनामा दिला आहे.
    ·        जे.रविचंद्रन यांच्याकडे हंगामी कार्यभार सोपवण्यात आला आहे.
    ·        एनएसइची स्थापना १९९२ मध्ये झाल्यापासून चित्रा रामकृष्णन तेथे कार्यरत होत्या. रामकृष्णन यांचा कार्यकाळ २०१८ मध्ये संपणार होता
    ·        त्यांनी २०१३ मध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची भूमिका स्वीकारली होती. रवी नारायण यांच्याकडून त्यांनी हि जबाबदारी घेतली होती.

    धसई : महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव
    ·        डिजीटल घेण-देणवर भर देण्यासाठी केंद्राच्या प्रयत्नासोबतच ठाणे जिल्ह्यातील धसई गाव महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव म्हणून ठरले आहे.
    ·        धसई हे गाव ठाणे जिल्‍हयातील मुरबाड तालुक्‍यातील सुमारे १० हजार लोकसंख्‍येने गाव असून सदर गावानजिकच्‍या ६० छोटे गाव व्‍यापार उदीमासाठी या गावावर निर्भर आहेत.
    ·        'बँक ऑफ बडोदा'च्‍या सहकार्याने सदर गाव कॅशलेस करण्‍याचा उपक्रम हाती घेण्‍यात आला आहे.
    ·        या गावातील नागरिकांकडे जनधन खाते असल्‍यामुळे डेबीट कार्ड आधीपासूनच त्‍यांच्‍याकडे उपलब्‍ध आहे. ३९ स्‍वाईप कार्ड मशीनसाठी अर्ज करण्‍यात आलेले आहे.
    ·        हे गाव कॅशलेस होण्‍याच्‍या दृष्‍टीने वीर सावरकर प्रतिष्‍ठान सारख्‍या नामवंत एनजीओनेही महत्त्‍वपूर्ण भूमिका बजावली असून संस्‍थेच्‍या माध्‍यमातून नागरिकांना प्रशिक्षित करण्‍याचे कामही करण्‍यात आले आहे.
    टीप : देशातील पहिले डिजिटल गाव बनण्याचा मान गुजरातमधील अकोडरा या गावाने मिळवला आहे. हे गाव आयसीआयसीआय बँकेने दत्तक घेतले आहे.


    UNESCO ची मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसाच्या यादीत योगचा समावेश
    ·        UNESCO च्या मानवतेच्या अमूर्त संस्कृतिक वारसा मध्ये प्राचीन भारतीय पद्धत योगाचा समावेश करण्यात आला आहे.
    ·        २ डिसेंबर २०१६ रोजी इथिओपिया मध्ये पार पाडलेल्या अमूर्त सांस्कृतिक वारसा च्या संरक्षणासाठी समितीच्या  अकराव्या सत्रात ही घोषणा करण्यात आली आहे.
    ·        हा निर्णय समितीच्या सर्व २४ सदस्यांकडून एकमताने घेण्यात आला आहे.
    ·        या यादी मध्ये योगाचा समावेश करावा यासाठी जून २०१६ मध्ये सरकारतर्फे प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
    ·        यासोबतच विविध राष्ट्रांमधील १६ इतर नवीन बाबींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
    युनेस्कोची अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी
    Ø जगामध्ये ज्या सांस्कृतिक वारसा विविधता दाखवतात त्यांचा समावेश युनेस्को या यादीमध्ये करत असते.
    Ø २००३ मध्ये लागू झालेल्या अमूर्त सांस्कृतिक वारसा संरक्षण करारानुसार २००८ मध्ये युनेस्कोने हि यादी तयार केली.
    Ø यामध्ये दोन प्रकारच्या याद्या आहेत: मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसाची प्रतिनिधी यादी आणि त्वरित संरक्षणाची गरज असणारी अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी .
    Ø या यादीमध्ये सध्या ८१४ सांस्कृतिक स्थळे, २०३ नैसर्गिक आणि ३५ नैसर्गिक- सांस्कृतिक(मिश्र) स्थळे आहेत.
    Ø योग हे भारतातिल १३ वे अमूर्त सांस्कृतिक वारसा झाले आहे.
    Ø भारतामधील या यादीत समाविष्ट वारसा पुढीलप्रमाणे:  कूडियात्तम, मुदिएत्त, वैदिक जप ची परंपरा, कल्बेलिया, राम्मन, छाऊ नृत्य, लदाखचा बौद्ध मंत्रोच्चार, संकीर्तना, पंजाब मधील जंदियला गुरू चे थथेरस, रामलीला

    निको रॉसबर्ग
    ·        फॉर्मुला वन मध्ये कारकीर्द गाजविणारा निको रॉसबर्ग याने  २ डिसेंबर २०१६ रोजी निवृत्तीची घोषणा केली आहे.
    ·        मर्सिडीज संघाच्या या शर्यतपट्टूने व्हिएन्ना येथे एफआयए विश्वविजेतेपद पुरस्कार वितरण सोहळ्यात हि घोषणा केली आहे.
    ·        नुकत्याच अबुधाबी येथे पार पडलेल्या मोसमातील अखेरच्या शर्यतीत दुसरे स्थान निश्चित करताना रॉसबर्गनर कारकिर्दीतला पहिले वाहिले विश्वविजेतेपद पटकावले होते.
    कारकीर्द
    -          नागरिकस्तव : जर्मनी
    -          सक्रिय वर्ष : २००६-१६
    -          संघ : विल्यम्स, मर्सिडीज
    -          विजय २३
    -          अग्रस्थान ३०
    -          पहिली स्पर्धा : चायनीज ग्रां.पी. (२००६)
    -          अखेरचा विजय : जपान  ग्रां.पी. (२०१६)
    -          अखेरची स्पर्धा : अबुधाबी  ग्रां.पी. (२०१६)

    प्रवीण महाजन
    ·        अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदी प्रवीण महाजन या पहिल्या महिला अध्यक्षाची निवड घोषित करण्यात आली आहे.
    ·        यापूर्वी अखिल भारतीय टेनिस संघटनेचे अध्यक्षपद अनुभवी क्रीडा प्रशासक अनिल खन्ना भूषवित होते. 2012 साली अनिल खन्ना यांची संघटनेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.  
    ·        प्रवीण महाजन यापूर्वी केंद्रीय अबकारी आणि कस्टम खात्याच्या प्रमुख होत्या.
    ·
    मबईतील चैत्यभूमीला प्रार्थनास्थळाचा दर्जा
    ·        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने मुंबईतील दादरच्या चौपाटीवरील चैत्यभूमीला श्रेणी प्रार्थनास्थळ आणि पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे.
    ·        राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेल्या चैत्यभूमीला श्रेणी प्रार्थनास्थळ आणि पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती.
    ·
    कार्लसनने राखले जगज्जेतेपद
    ·        नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने तिसर्‍यांदा जागतिक बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेत विजय मिळवला आहे.
    ·        पंचावन्नाव्या बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने रशियाच्या सर्जी कार्जाकिनला पराभूत केले आहे.
    मॅग्नस कार्लसन
    -          नॉर्वेचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर
    -          वयाच्या १३ व्या वर्षी ग्रँडमास्टर
    -          २०१० मध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान
    -          जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारा इतिहासातील सर्वात कमी वयाचा
    -          २०१३ मध्ये विश्वनाथ आनंदला हरवून जगजेत्ता
    -          २०१३ मध्ये टाइम्स मासिकाच्या सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तीच्या यादीत समावेश

    कस्तीतील  द्रोणाचार्य भागवत यांचे निधन
    कुस्ती खेळातील पहिले द्रोणाचार्य भालचंद्र ऊर्फ "भाल' भागवत यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अमेरिका येथे निधन झाले.
    अल्पपरिचय
    -          पुण्यात जन्मलेल्या भालचंद्र भागवत यांचे शिक्षणही पुण्यातच झाले.
    -          १९९२ मध्ये त्यांची हेलसिंकी ऑलिंपिकसाठी भारतीय संघात निवड पण दुर्दैवाने त्यांना त्या वेळी सहभागी होता आले नाही.
    -          त्यानंतर १९६२ ते १९९१ ते पतियाळात राष्ट्रीय क्रीडा संस्थेत कुस्तीचे मुख्य प्रशिक्षक होते.
    -          त्यांनी टोकियो (१९६४), मेक्सिको (१९६८) , म्युनिक (१९७२) आणि दिल्ली येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत त्यांनी पंच म्हणूनही काम पाहिले .
    -          भारत सरकारने १९८५ मध्ये क्रीडा मार्गदर्शकाला "द्रोणाचार्य' पुरस्कार देण्यास सुरवात केली. या पहिल्याच पुरस्काराचे भागवत मानकरी ठरले होते.

    हॉर्नबिल फेस्टिवल
    ·        १ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०१६ दरम्यान नैसर्गिक सौदर्याने नटलेल्या नागालँड राज्यात होर्नबिल महोत्सव पार पडला आहे.
    ·        कला, संस्कृती आणि नागा जीवन मुल्ये जपण्यासाठी या महोत्सवचे आयोजन दरवर्षी राजधानी कोहिमा येथून १२ किलोमीटर अंतरावर असणारया किसामा गावात केले जाते. हे गाव नागाची जीवनशैली आणि त्यांच्या इतिहासाचे प्रतिक म्हणून ओळखले जाते.
    होर्नबिल महोत्सवाचे वैशिष्ठ्ये
    Ø १ डिसेंबर १९६३ मध्ये या महोत्सवाची स्थापना झाली. तत्कालीन राष्ट्रपती राधाकृष्णन यांनी त्याचे उदघाटन केले होते.
    Ø दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या महोत्सवाचे आयोजन केले जाते.
    Ø महोत्सवांचा महोत्सव या नावाने ओळखला जातो
    Ø सात दिवसीय महोत्सवात नागा जीवनशैलीच्या समृद्ध आणि जीवंत संस्कृतीचे दर्शन घडविले जाते.
    Ø या महोत्सवाचे नाव होर्नबिल या पक्षाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. या पक्षाचे पंख नागा समुदायातील लोक त्यांच्या डोक्यावरील टोपीत एका विशेष शैलीत लावतात.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad