चालू घडामोडी : 6 जानेवारी 2017
ज्येष्ठ
अभिनेते ओम पुरी यांचे निधन
बॉलिवूडमधील ज्येष्ठ
अभिनेते ओम पुरी यांचे 6 जानेवारी 2016 रोजी वयाच्या 66 व्या वर्षी हृदयविकाराच्या
झटक्याने निधन झाले.
अल्पपरिचय
·
जन्म 18 ऑक्टोबर 1950 रोजी
हरियानमधील अंबाल शहरात
·
पंजाबमधील पटियाला येथून
प्राथमिक शिक्षण
·
1976 मध्ये पुण्यातील फिल्म
अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूटमधून पुढील शिक्षण
·
'मजमा' या
खासगी नाट्यमंडळाची स्थापना
·
घाशीराम कोतवाल या मराठी
नाटकावर आधारित एका चित्रपटातून कारकिर्दीची सुरवात
·
भावनी भवई (1980), सद्गती (1981), अर्ध सत्य (1982), मिर्च मसाला (1986) आणि धारावी (1992) या चित्रपटांमधील त्यांचा अभिनय
गाजला.
·
जंगल बुक या चित्रपटातील
बघिरा या पत्राला त्यांनी आवाज दिला होता.
·
त्यांनी शेवटचा अभिनय
पाकिस्तानी कॉमेडी चित्रपटात केला.
·
हॉलिवूडमध्येही अनेक
चित्रपटात काम केले.
·
केंद्र सरकारने 1990 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.
FSDC
ची 16 वी बैठक दिल्ली येथे पार पडली
·
वित्तीय स्थिरता आणि विकास
परिषदेची (FSDC) 16 वी बैठक नुकतीच दिल्ली येथे पार
पडली. केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले
होते.
·
आरबीआय गव्हर्नर ऊर्जित पटेल
यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने तयार केलेला FSDC च्या
कार्याचा संक्षिप्त आढावा यावेळी या बैठकीत सादर करण्यात आला.
·
या बैठकीमध्ये भारतीय
अर्थव्यवस्था, बँकिंग, वित्तीय
समावेशन, वित्तीय साक्षरता, तंत्रज्ञान
आणि विमुद्रिकरण अशा विविध मुद्यांवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली.
काय आहे FSDC ?
·
केंद्र सरकारने डिसेंबर 2010
मध्ये वीतीय स्थिरता आणि विकास परिषदेची स्थापना केली. या परिषदेचे अध्यक्ष
केंद्रीय वित्त मंत्री असतात.
·
रघुराम राजन यांच्या
अध्यक्षतेखालील वित्तीय क्षेत्र सुधारणा समितीने (2008) केलेल्या शिफारशिनुसार या
परिषदेची स्थापना करण्यात आली आहे.
·
ही परिषद निरोगी
अर्थव्यवस्था आणि कार्यक्षम आर्थिक व्यवस्थेसाठी आर्थिक क्षेत्रातील उच्च नियामक
मंडळ आहे.
·
रचना
-
अध्यक्ष : केंद्रीय
वित्तमंत्री
-
सदस्य : वित्तीय क्षेत्रातील
नियामक संस्थांचे प्रमुख (उदा. सेबी, आरबीआय, आयआरडीए इ.), वित्त सचिव, वीट
सेवा विभागाचे सचिव, प्रमुख आर्थिक सल्लागार.
इंजेटी
श्रीनिवास समितीची स्थापना
·
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने
सर्वसमावेशक राष्ट्रीय क्रीडा विकास संहिता तयार करण्यासाठी क्रीडा सचिव इंजेटी
श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे.
·
समिती विद्यमान क्रीडा
प्रशासन चौकट, क्रीडा प्रशासनासंबंधित समस्या आणि क्रीडा
प्रशासनामधील अलीकडील विकास या मुद्यांचा
अभ्यास करणार आहे.
·
न्यायालयाचे निर्णय आणि
अंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती यांचाही अभ्यास ही समिति करणार आहे.
·
समितीमध्ये अभिनव बिन्द्रा, अनुज बॉबी जॉर्ज, प्रकाश पदूकोण, नारिंदर बात्रा, नंदन कामथ,
बिश्वेश्वर नंदी, विजय लोकपल्ली यांचा समावेश आहे.
2017
: विकाससाठी शाश्वत पर्यटन वर्ष
संयुक्त राष्ट्र आम सभेने 2017 हे वर्ष
अंतरराष्ट्रीय विकाससाठी शाश्वत पर्यटन वर्ष घोषित केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत