• New

    चालू घडामोडी : 7 जानेवारी 2017

    7 January 2017
    भारत पोर्तुगालमध्ये तीन करार
    भारत आणि पोर्तुगालदरम्यान सहा सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. यामध्ये पुढील करारांचा समावेश आहे:
    1)      संरक्षण
    2)      पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा
    3)      सागरी संशोधन आणि संसाधने
    4)      कृषी आणि संलग्न क्षेत्र
    5)      माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स
    6)      लिस्बन विद्यापीठात आयसीसीआरचे अध्ययन केंद्र स्थापन करणे

    राहील शरीफ  इस्लामिक मिलिटरी अलायन्सच्या प्रमुखपदी
    ·        पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख राहील शरीफ यांची इस्लामिक मिलिटरी अलायन्सच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. इस्लामिक मिलिटरी अलायन्स ही सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील लष्करी युती असून 39 देश सध्या त्याचे सदस्य आहेत.
    ·        राहील शरीफ हे नोव्हेंबर 2016 मध्ये पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख पदावरून निवृत झाले असून त्यांची जागा जनरल कमर जावेद बाज्वा यांनी घेतली आहे.
    काय आहे इस्लामिक मिलिटरी अलायन्स ?
    -          दहशतवादाशी लढा देण्यासाठी इस्लामिक मिलिटरी अलायन्सची स्थापना झाली असून 39 देश सध्या सदस्य आहेत.
    -          डिसेंबर 2015 मध्ये या अलायन्सची स्थापना सौदी अरेबियाने केली आहे.
    -          सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे या अलायन्सचे कमांड सेंटर आहे.
    -          इस्लामिक सहकार संघटनेचे (OIC) तत्त्व आणि उद्देशांच्या अनुरोधाने या युतीची स्थापना झाली.
    -          इराक, लिबिया, सिरिया, अफगाणिस्तान आणि इजिप्त मधील दहशतवादाविरोधाच्या लष्करी कार्यवाहिला सदस्य देश मदत करतात.
    -          पाकिस्तान, इजिप्त, येमेन, बांग्लादेश यांसारखे देश या युतीचे सदसी असून विशेष म्हणजे इराण या युतीचा सदस्य नाही.

    14 वा प्रवासी भारतीय दिन
    ·        प्रवासी भारतीय दिनाची 14 वी आवृत्ती भारताचे माहिती तंत्रज्ञान हब असलेल्या बेंगूळुरू (कर्नाटक) येथे पार पडली.
    ·        2017 ची थीम : Redefining Engagement with the Indian Diaspora
    ·        3 दिवसाच्या या कार्यक्रमात पहिला दिवस युथ प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यात आला.
    ·        मुख्य अधिवेशनाचे उद्घाटन नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान अँन्टोनिओ कोस्टा यांच्या हस्ते झाले.
    ·        भारतीय वंशाचे पोर्तुगालचे पंतप्रधान अँन्टोनिओ कोस्टा हे यावर्षीच्या प्रवाशी भारतीय दिनाचे प्रमुख पाहुणे होते.
    काय आहे प्रवासी भारतीय दिन ?
    -          परदेशात राहणारे भारतीय आणि भारत सरकार यांच्यामध्ये संवाद प्रस्थापित करण्यासाठी  परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि फिक्कीकडून 2003 पासून दरवर्षी साजरा केला जाणारा हा कार्यक्रम आहे.
    -          परदेशातील भारतीय समुदायासोबत प्रतिबद्ध राहण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्यसरकारला यामुळे मोठे व्यासपीठ प्राप्त झाले आहे.
    -          प्रवाशी भारतीयांसंबंधित स्थापन करण्यात आलेल्या एल एम सिंघवी यांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय समितीच्या सिफारशीवरून प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
    -          8 जानेवारी 2002 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी या दिवसाची घोषणा केली होती.
    -          9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधीजी दक्षिण  आफ्रिकेवरुन भारतात परत आले होते त्यामुळे 9 जानेवारी हा दिवस यासाठी निवडण्यात आला.
    -          आपणा भारत, आपणा गौरव या संकल्पनेसह 2015 चा प्रवासी भारतीय दिवस गुजरातमधील गांधीनगर येथे साजरा करण्यात आला होता.
    -          पहिला प्रवाशी भारतीय दिवस 2003मध्ये दिल्ली मध्ये साजरा करण्यात आला असून 2005 मधील तिसरा प्रवासी भारतीय दिवस महाराष्ट्रात मुंबई येथे साजरा करण्यात आला होता.


    भारताचा जीडीपी वृद्धीदर 2016-17 मध्ये 7.1% असेल : सीएसओ
    §  केंद्रीय संखीकी कार्यालयाने जाहीर केलेल्या वृद्धीदर अंदाजानुसार भारताचा जीडीपी 2016-17 मध्ये 7.1% असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2015-16 मध्ये भारताचा जीडीपी वृद्धीदर 7.6% होता.
    सीएसओचे 2016-17 चे अंदाज
    ·        2016-17 मध्ये दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न 1,03,007 रुपये राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील वर्षापेक्षा ही वाढ 10.4% असेल. 2015-16 मध्ये 93,293 रुपये एवढे होते.
    ·        2016-17 मध्ये कृषी व संलग्न क्षेत्रातील वृद्धीदर 4.1% असेल. 2015-16 मध्ये हा दर 1.2% होता.
    ·        निर्मिती क्षेत्राचा वृद्धीदर 7.4% असेल. यापूर्वी हा दर 9.3% होता.
    ·        ढोबळ किंमत वर्धन (जीव्हीए) 7% असेल.



    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad