चालू घडामोडी : 4 जानेवारी 2017
4 January 2017
पाच
राज्यातील निवडणुक कार्यक्रम जाहीर
भारतीय निवडणूक
आयोगाने उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणीपुर
आणि गोवा या पाच राज्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या
पाच राज्यांमधील निवडणुकांची ११ मार्च २०१७ रोजी मतमोजणी होणार आहे.
काही
महत्वपूर्ण मुद्दे
·
उत्तराखंड, गोवा आणि पंजाब मध्ये एकाच टप्प्यामद्धे निवडणूक होणार आहे.
·
गोव्यामधील ४० जागांसाठी आणि
पंजाबमधील ११७ जागांसाठी ४ फेब्रुवारी २०१७ रोजी तर उत्तरखंडमधील ७० जागांसाठी १५
फेब्रुवारी २०१७ रोजी निवडणुका होणार आहेत.
·
उत्तरप्रदेश मध्ये एकूण ४०३
जागांसाठी सात टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. (११, १५, १९, २३, २७ फेब्रुवारी आणि ४ व ८ मार्च २०१७)
·
मणीपुरमध्ये ६० जगणासाठी ४ व
८ मार्च २०१७ रोजी दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.
·
या पाच राज्यांमध्ये एकूण १६
कोटी पेक्षा जास्त पात्र मतदार भाग घेणार आहेत.
·
पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश या राज्यांतील उमेदवाराना
२८ लाख तर गोवा, मणीपुर राज्यातील उमेदवारांना २० लाख रुपये
खर्च मर्यादा घालून देण्यात आली आहे. उमेदवारांना 20 हजारांवरील खर्चासाठी चेकचा
वापर बंधनकारक असणार आहे.
उमेदवार जागा- एकूण ६१९ जागा
·
उत्तर प्रदेश- 403 जागा
·
पंजाब- 117 जागा
·
उत्तराखंड – 70 जागा
·
मणिपूर- 60 जागा
·
गोवा- 40 जागा
|
स्वच्छ
भारत सर्वेक्षण २०१७ पाचशे शहरांमध्ये सुरू
·
केंद्रीय नागरी विकास
मंत्रालयाने १ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ५०० शहरांमध्ये स्वच्छ भारत
सर्वेक्षण २०१७ सुरू केले आहे.
·
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ मार्फत हे
सर्वेक्षण होणार आहे.
·
शहारच्या पालिकेकडून मिळणारी माहिती, प्रत्यक्ष निरीक्षण आणि स्वातंत्र्य मूल्यांकन करून आणि शहरातील
नागरिकांचा अभिप्राय या आधारे हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
·
पालिकेकडून मिळणार्या
महितीला ९०० गुण, प्रत्यक्ष निरीक्षण आणि
स्वातंत्र्य मूल्यांकणाचे आधारे मिळणार्या महितीला ५०० गुणा आणि जनतेच्या
अभिप्रायला ६०० गुण देण्यात येणार आहे.
·
नागरिक आपला अभिप्राय स्वच्छ
भारत सर्वेक्षणाच्या वेबसाईड वाराही आपला अभिप्राय देऊ शकणार आहेत किंवा १९६९ या
नंबर वर मिस्सड कॉल देहूनही अभिप्राय देता येणार आहे.
स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१६ मध्ये ७३ शहरांची यादी जाहीर
करण्यात आली होती. त्यामध्ये म्हैसूरने प्रथम क्रमांक पटकावला होता तर चांदीगड
दुसर्या स्थानी होते.
|
एम.के.
स्टॅलिन यांची DMK च्या कार्याध्यक्षपदी
निवड
·
तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री
एम.के. स्टॅलिन यांची द्रविड मुण्णेत्र कळघम (DMK) पक्षाच्या
कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून पक्षाचे खजिनदार पद आणि तमिळनाडू
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही स्टॅलिन यांच्याकडे आहे.
·
स्टॅलिन यांचे वडील व
तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांची प्रकृती बिघडली असल्याने स्टॅलिन
यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
·
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा
अपवाद वगळता भारतातील एखाद्या राज्यातील विधिमंडळ निवडणुका जिंकून स्वबळावर आपली
सत्ता स्थापन करण्याची विक्रमी कामगिरी करणारा DMK हा
पहिला राजकीय पक्ष आहे.
युरोपीय
समुदायाने भारतीय भाज्यांवर घातलेली बंदी उठविली
·
युरोपीय समुदायाने भारतातून आयात
होणाऱ्या आंबा, कारले, पडवळ,
वांगे आणि अळू या
भाज्यांवर तीन वर्षांसाठी घातलेली बंदी उठविली आहे.
·
युरोपीय समुदायाने भारतातून
आयात होणाऱ्या या भाज्यांवर मे 2014 मध्ये तीन वर्षांसाठी बंदी घातली होती. या
भाज्यांमधील काही हानीकारक घटक संपूर्ण युरोपच्या जैवसुरक्षेला धोका निर्माण
करणारे असल्याचे युरोपीय समुदायाने म्हटले होते.
राज्य
शासनाकडून चार पुरस्कार जाहीर
मराठी भाषा मंत्री
विनोद तवडे यांनी पुढील चार पुरस्कारांची घोषणा केली आहे.
१) श्री.
पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार : भारतीय विचार साधना प्रकाशनास
२) विंदा
करंदीकर जीवनगौरव पुरस्कार : ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना
३) मंगेश
पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार : श्याम
जोशी यांना
४) डॉ.
अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार : ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख
·
मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच, २७ फेब्रुवारी २०१७ रोजी हे चारही पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य व
संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार
आहेत.
यावर्षी होणाऱ्या
महिलांच्या विश्वकरंडक पात्रता क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी
मिताली राज हिची नियुक्ती करण्यात आली आहे. या संघात देविका वैद्य ही
महाराष्ट्राची एकमेव खेळाडू आहे. मोना मेश्राम या विदर्भाच्या अष्टपैलू खेळाडूला
मात्र वगळण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत