• New

    चालू घडामोडी : 28 जानेवारी 2017

    28 January 2017
    डूम्सडे क्‍लॉक 30 सेकंदांनी पुढे
    ·        जगाचा शेवट कधी होणार हे प्रतीकात्मकदृष्ट्या सांगणाऱ्या घड्याळाचे काटे शास्त्रज्ञांनी 30 सेकंदांनी पुढे सरकविले आहेत. ही घड्याळ डूम्सडे क्‍लॉक म्हणून ओळखली जाते.
    ·        जगभर 2016 मध्ये घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जगाचा शेवट 30 सेकंदांनी जवळ आल्याचे सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून अण्विक शास्त्रज्ञांनी केला आहे.
    ·        आण्विक शास्त्रांच्या प्रसिद्ध नियतकालिकातर्फे 1947 मध्ये डूम्सडे क्‍लॉकया प्रतीकात्मक घड्याळाची निर्मिती केली होती. नैसर्गिक आणि आण्विक हल्ल्यासारख्या मानवनिर्मित आपत्तींच्या तीव्रतेवरून या घड्याळाची वेळ कमी, अधिक केली जाते.
    ·        पुढील घटनांच्या पार्श्वभूमीवर डूम्सडे क्‍लॉकमधील वेळ 30 सेकांदांनी कमी करण्यात आली: 
    -          अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली निवड
    -          हवामानबदलांमुळे होणारे परिणाम
    -          भारत आणि पाकिस्तान या अण्वस्त्रधारी देशांमध्ये असलेला तणाव
    -          उत्तर कोरियाकडून देण्यात आलेली आण्विक हल्ला करण्याची धमकी

    टार्गेट ऑलिंपिक पोडियम (टॉप) समितीच्या अध्यक्षपदी नेमबाज अभिनव बिंद्राची नियुक्ती
    ·        भारताचा गोल्डन फिंगरअभिनव बिंद्रा याची क्रीडा मंत्रालयाने टार्गेट ऑलिंपिक पोडियम (टॉप) समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
    ·        बिंद्रा यापूर्वीच्या समितीतही होता. मात्र, रिओ ऑलिंपिकच्या तयारीसाठी त्याने आपले नाव मागे घेतले होते.
    ·        दहा सदस्यीय समितीत पी. टी. उषा, प्रकाश पदुकोण, अंजली भागवत, कर्णम मल्लेश्‍वरी, अनिल खन्ना, पी. के. मुरलीधरन राजा, रेखा यादव, एस. एस. रॉय, इंदर धमिजा यांचा समावेश आहे.
    ·        या समितीवर 2020 आणि 2024 ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकू शकणाऱ्या देशातील क्रीडा गुणवत्तेचा शोध घेण्याची जबाबदारी असेल. या समितीची मुदत नियुक्तीपासून एक वर्षाची राहणार आहे.

    भारतीय वंशाच्या तिघांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च सन्मान
    सामाजिक कार्य आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये दिलेल्या भरीव योगदानाबद्दल ऑस्ट्रेलिया सरकारने पुरुषोत्तम सावरीकर, माखनसिंग खांगुरे आणि विजय कुमार या भारतीय वंशाच्या तिघांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया मेडल 2017 हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे.
    पुरुषोत्तम सावरीकर
    -          सावरीकर यांचा सिडनी येथे वैद्यकीय व्यवसाय असून आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग भारतीय समुदायासह सर्वच नागरिकांसाठी करत व्यापक जनहित साधल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला.
    -          सावरीकर हे ऑस्ट्रेलियन इंडियन मेडिकल ग्रॅज्युएट्‌स असोसिएशनचे माजी अध्यक्ष असून, त्यांनी आकाशवाणी सिडनीचीही स्थापना केली आहे.
    माखनसिंग खांगुरे
    -          पर्थ येथे राहणारे माखनसिंग खांगुरे यांनी न्यूरोरेडिओलॉजी, शिक्षण आणि इतर वैद्यकीय संघटनांच्या माध्यमातून जनतेची सेवा केल्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे.
    विजय कुमार
    -          विजय कुमार हे न्यूक्‍लिअर मेडिसीन तज्ज्ञ आणि संशोधक आहेत. न्यूक्‍लिअर मेडिसीन आणि जीवशास्त्र यामध्ये त्यांनी केलेल्या संशोधनकार्याबद्दल ऑस्ट्रेलिया सरकारने त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.
    -          कुमार हे सिडनी येथील तमीळ संगम संघटनेचेहे सदस्य आहेत.
    -          त्यांना न्यूक्‍लिअर सायन्स क्षेत्रामधील योगदानाबद्दलही 2007 आणि 2014 मध्ये पुरस्कार मिळाला होता.



    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad