चालू घडामोडी : 26 जानेवारी 2017
26 January 2017
मेघालय राज्यातील राज
भवनमधील कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्यामुळे अडचणीत आलेले राज्यपाल व्ही
शण्मुगनाथन यांनी 26 जानेवारी 2017 रोजी पदाचा राजीनामा दिला आहे.
रशियाचे भारतामधील
राजदूत ऍलेक्झांडर कदाकिन यांचे 26 जानेवारी 2017 रोजी वयाच्या 68 व्या वर्षी हृदयविकाराच्या
झटक्याने निधन झाले. कदाकिन हे 2009 पासून रशियाचे भारतामधील राजदूत म्हणून
जबाबदारी सांभाळत होते.
68
वा प्रजासत्ताक दिन
26 जानेवारी 2017
रोजी देशभरात 68 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. अबुधाबीचे युवराज शेख
मोहम्मद बिन झायद अल नाहयान हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते.
वैशिष्ठ्ये
·
यंदा प्रथमच एनएसजी आणि
ब्लॅक कॅट कमांडो पथसंचलनात सहभागी झाले होते. (NSG ची
स्थापना : 1984).
·
राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे ‘शेर्पा’ (बुलेट प्रूफ वाहन) पहिल्यांदाच संचलंनमध्ये
दाखल.
·
महाराष्ट्राने लोकमान्य बाळ
गंगाधर टिळक यांचा देखावा सादर केला होता.
·
2017 च्या प्रजासत्ताक
दिनाची थीम : स्किल इंडिया आणि बेटी बचओ बेटइये पढाओ.
·
संचलंनामध्ये 17 राज्यांनी
सहभाग घेतला होता.
·
यंदाच्या पथसंचलनात युएईचे
सैन्यही सहभागी झाले होते.
·
संपूर्ण देशी बनावटीचे ‘तेजस’ हे लढाऊ विमानही पहिल्यांदाच संचलनात सहभागी
झाले. तेजसशिवाय स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर ध्रुव आणि रुद्रही सादर करण्यात आली.
पद्म
पुरस्कार 2017
·
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला
पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून कला, समाजसेवा,
साहित्य, क्रीडा, विज्ञान,
उद्योग, वैद्यकीय सेवा, शिक्षण,
प्रशासकीय सेवा आदी वेगवेगळ्या क्षेत्रांतील 89 नामांकित
चेहऱ्यांना या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
·
त्यात ‘पद्मविभूषण’ पुरस्कार विजेत्यांमध्ये सात, ‘पद्मभूषण’ विजेत्यांमध्ये सात आणि ‘पद्मश्री’ पुरस्कार विजेत्यांमध्ये 75 जणांचा समावेश
आहे.
·
पुरस्कारविजेत्यामध्ये 19
महिला आहेत, तर 5 परदेशी नागरिक, अनिवासी भारतीय आणि भारतीय वंशाचे आहेत. 6 जणांना मरणोत्तर पुरस्कार
देण्यात आले आहेत.
·
महाराष्ट्राला सर्वाधिक, म्हणजे 8 पद्म पुरस्कार मिळाले असून, पाठोपाठ
गुजरातला 7, कर्नाटक, केरळ, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि दिल्लीला प्रत्येकी 6
पुरस्कार मिळाले आहेत.
पद्मविभूषण
1)
शरद पवार
2)
डॉ. मुरलीमनोहर जोशी
3)
सुंदरलाल पटवा (मध्य
प्रदेशचे माजी मुख्यमंत्री) (मरणोत्तर)
4)
पी. ए. संगमा (लोकसभेचे माजी
अध्यक्ष) (मरणोत्तर)
5)
येसुदास (प्रसिद्ध गायक)
6)
सद्गुरू जग्गी वासुदेव (आध्यात्मिक
क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्त्व)
7)
प्रा. यू. आर. राव (शास्त्रज्ञ)
पद्मभूषण
1)
विश्वमोहन भट (मोहनवीणा
वाद्याचे जनक)
2)
चो रामस्वामी (पत्रकार) (मरणोत्तर)
3)
महाचक्री सिरिनधोर्न (थायलंडच्या
राजकुमारी)
पद्मश्री
भारतीय क्रिकेट
संघाचा कर्णधार विराट कोहली, हॉकी संघाचा कर्णधार पी.
श्रीजेश, ऑलिंपिक पदकविजेती महिला कुस्तीगीर साक्षी मलिक,
ऍथलिट दीपा कर्मकार, पॅरा ऍथलिट दीपा मलिक,
विकास गौडा, देहूचे डॉ. सुहास मापुसकर
यांच्यासह 75 जणांना "पद्मश्री' पुरस्काराने गौरविण्यात
आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत