चालू घडामोडी : 25 जानेवारी 2017
25 January 2017
डॉ.
विजय भटकर नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी
§ राष्ट्रपती
प्रणव मुखर्जी यांनी डॉ. विजय भटकर यांची
नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी 25 जानेवारी 2017 रोजी निवड केली.
§ त्यांची
निवड नालंदा विद्यापीठ कायदा 2010 च्या कलम 11(3) नुसार झाली असून ते 3 वर्षे हे
पद भूषविणार आहेत.
डॉ. विजय भटकर
यांच्या विषयी
·
अकोला जिल्ह्यातील मुरंबा या
गावात 11 ऑक्टोबर 1946 रोजी जन्म.
·
सी-डॅकचे संस्थापक कार्यकारी
संचालक. पंतप्रधान राजीव गांधीनी सी-डॅक या संस्थेची स्थापना पुणे विद्यापीठात २
जून १९८८ रोजी केली.
·
भटकरांनी १९९३मध्ये परम-८००
तर १९९८मध्ये परम-१००० हे संगणक बनवले.
·
विक्रम साराभाईंच्या
अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना १९६८ साली झाली. त्या कमिशनवर भटकरांनी
दहा वर्षे काम केले.
·
इंदिरा गांधींनी 'इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार' साठी १९७२ साली
नेमलेल्या महत्त्वाच्या समितीचे सदस्य होते.
·
त्यांनी त्रिवेंद्रममध्ये
इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट या भारतातील सर्वात मोठया प्रयोगशाळेची
स्थापना केली. ते या संस्थेचे १९८० ते १९८७ या काळात ते संचालक होते.
·
भटकर टाटा कन्सल्टन्सीत १९८७
मध्ये उपाध्यक्ष झाले.
·
शाळेपर्यंत न पोचणाऱ्या
मुलांसाठी 'एज्युकेशन टू होम' (ईटीएच)
ही संकल्पना मांडून त्यासाठी १९९८-९९ मध्ये ईटीए संशोधन शाळा सुरू केली.
·
भटकरांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, डीव्हीनेट, मल्टिया, डिशनेट या
संस्थाही स्थापन केल्या.
·
भारत सरकारकडून पद्मश्री
-२०००,
महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार -२०००, लोकमान्य टिळक पुरस्कार -१९९९
नालंदा
विद्यापीठ
·
नालंदा विद्यापीठ बिहारमधील
नालंदा जिल्ह्यातील राजगीर येथे आहे.
·
नालंदा विद्यापीठ कायदा, 2010 अंतर्गत स्थापना झाली असून 19 सप्टेंबर 2014 रोजी या विद्यापीठाचे
उद्घाटन झाले.
·
विना-नफा , धर्मनिरपेक्ष आणि स्वायत्त अंतरराष्ट्रीय संस्था असून माजी राष्ट्रपती
एपीजे अब्दुल कलाम यांची संकल्पना होती.
·
जपान आणि सिंगापूरच्या
सरकारने या नवीन विद्यापीठासाठी संयुक्तपणे ५०० अब्ज अमेरिकन डॉलरची मदत देऊ
केलेली आहे
प्राचीन
इतिहासातील नालंदा विद्यापीठ
गुप्त सम्राट
समुद्रगुप्त व पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने इ.स. 370 ते इ.स. 455 या
काळादरम्यान विद्यापीठाची स्थापना झाली होती. प्रारंभी या विद्यापीठाचे नाव नलविहार
असे होते. सम्राट हर्षवर्धनाने शंभर खेडी विश्वविद्यालयाच्या खर्चासाठी दान दिलेली
होती. या खेड्यातील लोक विश्वविद्यालयाला अन्न, वस्त्र व
दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवीत. नालंदा विद्यापिठात अनेकमजली भव्य धर्ममायायोग
नावाचे ग्रंथालय होते. ग्रंथालयाच्या तीन उपविभागांना रत्नोदधी, रत्नसागर, आणि रत्नरंजक अशी नावे होती. त्यात हजारो
हस्तलिखिते व ग्रंथ होते. इ.स. 1193 साली बख्तियार खिलजी या तुर्की आक्रमकाने
नालंदा नगरावर आक्रमण करून ही नगरी पूर्णपणे उध्वस्त केली आणि नालंदा
विश्वविद्यालयही जाळून टाकले.
केंद्रीय ऊर्जा
क्षेत्रातील सार्वजनिक कंपनी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (पॉवरग्रिड) ने
25 जानेवारी 2017 रोजी अबुधाभी वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी सोबत सामंजस्य करार
केला आहे.
नालंदा विद्यापीठ
पूर्व आणि पश्चिम जगाचा दुवा होता. नालंदा नष्ट होण्यापूर्वी जगामध्ये नालंदाशिवाय
केवळ चार विद्यीपाठे होते. त्यामध्ये कैरोमधील अल् अझहर (स्थापना इसवी सन 972), इटलीमधील बोलोगना (स्थापन इसवी सन 1088) आणि ब्रिटनमधील ऑक्सफर्ड (स्थापन
इसवी सन 1167) यांचा समावेश होता.
भारत व संयुक्त अरब
अमिरातीमध्ये तेलाचा व्यूहात्मक साठा करण्यासंदर्भातील अत्यंत संवेदनशील करार
झाल्याची घोषणा 25 जानेवारी 2017 रोजी करण्यात आली. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी
व संयुक्त अरब अमिरातीचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल-नहयान यांच्या
उपस्थितीमध्ये ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. दोन देशांमध्ये एकूण 14 करार करण्यात आले असून
द्विपक्षीय संबंधांचे रुपांतर आता ‘व्यूहात्मक
भागीदारी’मध्ये करण्यात आले आहे. भारताने 2014 मध्ये अबु
धाबी राष्ट्रीय तेल कंपनीशी व्यूहात्मक तेल साठ्याची बांधणी करण्यासंदर्भातील
चर्चा सुरु केली होती. या करारानुसार आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये या तेलसाठ्यावर
भारताचा प्रथम अधिकार असेल. यानंतर संयुक्त अरब अमिरातीस येथून मागणीनुसार
तेलपुरवठा करता येईल. भारतास 2015-16 या वर्षात सर्वाधिक तेल पुरवठा करणाऱ्या
देशांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे स्थान पाचवे होते.
एव्हरेस्टची
उंची पुन्हा मोजली जाणार
जगातील सर्वांत उंच
पर्वतशिखर असणार्या माउंट एव्हरेस्टची उंची ‘सर्व्हे ऑफ
इंडिया’ तर्फे पुन्हा मोजली जाणार आहे. नेपाळमध्ये दोन
वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपामुळे एव्हरेस्टची उंची कमी झाली असल्याचे जगभरातील
अभ्यासकांचे म्हणणे असून त्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे.
1855 मध्ये
एव्हरेस्टची उंची जाहीर करण्यात आली. त्यानंतर अनेकांनी या शिखराची उंची मोजली.
मात्र,
आजही जगात सर्व्हे ऑफ इंडियाने मोजलेली एव्हरेस्टची उंची प्रमाण
मानली जाते. एव्हरेस्टची उंची 29 हजार 28 फूट आहे.
जगातील
उंच पर्वत
1.
एव्हरेस्ट - 29,028 फूट
(नेपाळ)
2.
के2 -- 28,250 फूट (व्याप्त
काश्मीर)
3.
कांचनगंगा - 28,169 फूट
(भारत,
नेपाळ)
4.
लोत्से - 27,940 फूट (नेपाळ, तिबेट)
5.
मकालू -- 27,766 फूट (नेपाळ, तिबेट)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत