• New

    चालू घडामोडी : 24 जानेवारी 2017

    24 January 2017
    भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. परराष्ट्र सचिव म्हणून दोन वर्षे म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर जयशंकर हे या महिन्यात निवृत्त होणार होते. मात्र त्यांना आता जानेवारी, 2018 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.जयशंकर यांनी 29 जानेवारी, 2015 रोजी परराष्ट्र सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली होती. जयशंकर यांनी अमेरिका व व चीनमधील भारतीय राजदूत याआधी काम केले आहे.

    राजीव गांधींच्या काळात हायड्रोजन बॉम्बची निर्मिती
    पाकिस्तानच्या अणू कार्यक्रमाला प्रत्युत्तर म्हणून भारताने तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली 1985 मध्ये हायड्रोजन बॉम्बची एक चाचणी करण्याची सर्व तयारी होती, असे अमेरिकेची गुप्तचर संस्था सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने (CIA) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या काही कागदपत्रांतून समोर आले आहे. सुमारे 9 लाख 30 हजार गोपनीय कागदपत्रे प्रसिद्ध करून सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीद्वारे (CIA) याबाबतची माहिती उघड केली आहे.  दक्षिण आशियामध्ये 1985 च्या दरम्यान आण्विक शस्त्रात्र स्पर्धा वाढण्याची शक्यता पाहून भारत-पाक यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी एक प्रतिनिधी पाठवण्याचा विचार अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रिगन करीत होते. 

    अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या (सीआयए) संचालकपदाची शपथ माईक पॉंपेओ यांनी घेतली. पॉंपेओ हे "कॉंग्रेस'चे माजी सदस्य आहेत.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad