• New

    चालू घडामोडी : 20 जानेवारी 2017

    20 January 2017
    आयएनएस विक्रमादित्यवर एटीएम मशीन
    ·        भरताची सर्वांत मोठी युद्धनौका असेलल्या आयएनएस विक्रमादित्यवर एटीएम मशीन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
    ·        स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मदतीने हे एटीएम मशीन बसविण्यात येणार असून उपगृहाच्या मदतीने ही मशीन चालणार आहे.
    ·        एटीएम सुविधा असलेली आयएनएस विक्रमादित्य ही पहिलीच युद्धनौका असणार आहे.
    आयएनएस विक्रमादित्य
    कीयेव वर्गातील हि युद्धनौका रशियाकडून घेतली असून त्यावेळी त्याचे नाव ॲडमिरल गोर्श्कोव होते. विक्रमादित्य १९७८-८२ दरम्यान युक्रेनमधील ब्लॅक सी शिपयार्ड येथे बांधण्यात अली आहे. 2013 मध्ये भारतीय नौदलात समावेश करण्यात आला.

    माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांच्या सन्मानार्थ ऐतिहासिक इडन गार्डन्स मैदानातील एका स्टँडला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

    डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष
    ·        अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाचे 45 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. अमेरिकन परंपरेप्रमाणे बायबलवर हात ठेवत अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशांकडून ट्रम्प यांनी पद आणि गोपनीयतेची शपख घेतली.
    ·        शपथविधी सोहळ्यात उपाध्यक्ष माइक पेन्स यांनाही पदाची शपथ देण्यात आली आहे
    ·        अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष परंपरेने 20 जानेवारी रोजी शपथ घेतात. ही परंपरा मागच्या 200 वर्षांपासून पाळली जाते.

    एफआयबीपीची सहा एफडीआय प्रस्तावना मान्यता
    ·        आंतर मंत्रालयीन संस्था परकीय गुंतवणूक प्रवर्तन मंडळाने (FIBP) 1186.5 कोटी रापयांपेक्षा जास्त गुंतवणूकीच्या सहा प्रस्तावना मान्यता दिली आहे.
    ·        वित्तव्यवहार सचिव शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
    ·        Sanofi Synthelabo India, Star Den Media Services, Idea Cellular Infrastructure Services, Boehringer Ingelheim India Pvt. Ltd, Menarini India Private Limited आणि Recipharm Participation B.V. Netherlands यांच्या प्रस्तावना मान्यता दिली आहे.

    प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमध्ये दुरूस्ती
    ·        प्रधानमंत्री गरीब कल्याण ठेव योजनेमध्ये सरकारने रिझर्व्ह बँकेशी चर्चा करुन दुरुस्ती केली आहे.
    ·        त्यानुसार कोणीही व्यक्ती अघोषित उत्पन्न या योजनेमध्ये ठेवीच्या माध्यमाद्वारे ठेवू शकणार आहे. मात्र ही ठेव रक्कम घोषित केलेल्या अघोषित उत्पन्नाच्या 25 टक्क्यांपेक्षा कमी असू नये तसेच ही ठेव अधिकृत (सरकारी अधिकृत) बँकांमध्ये 17 डिसेंबर 2016 ते 31 मार्च 2017 या कालावधीत ठेवता येणार आहे.
    ·        प्रधानमंत्री गरीब कल्याण ठेव योजनेमधील ठेव सहकारी बँकांमध्ये ठेवता येणार नाही.

    संयुक्त राष्ट्राच्या जागतिक आर्थिक स्थिति 2017 अहवालामध्ये भारताचा वृद्धीदर 2017 मध्ये 7.7% तर 2018 मध्ये 7.6% असणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.



    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad