• New

    चालू घडामोडी : 19 जानेवारी 2017

    19 January 2017
    खासगी विधी कंपन्या राज्याचे कायदे बनविणार
    ·        राज्य सरकार आता खासगी विधी कंपण्यांकडून नवीन कायद्यांचे प्रारूप तयार करून घेणार असून गृहविभागाच्या कायद्याचे प्रारूप बनविण्यासाठी तीन खासगी कंपन्यांना मान्यता देण्यात आली आहे.
    ·        लक्ष्मीकुमारन व श्रिधरन, लिंक लिगल इंडिया लॉ सर्व्हिसेस आणि तुली अँड कंपनी या तीन घासगी विधी कंपन्यांना गृहविभागाने मान्यता दिली आहे.

    आलोक कुमार वर्मा सीबीआयचे नवे प्रमुख
    ·        दिल्लीचे पोलिस आयुक्त आलोक कुमार वर्मा यांची केंद्रीय अन्वेषन विभागाच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. दोन वर्षांचा त्यांना कार्यकाल लाभणार आहे.
    ·        नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने त्यांची निवड केली आहे.
    ·        अतिरिक्त संचालक राकेश अस्थना यांच्या कडून ते पदभार स्वीकारतील.
    आलोक वर्मा
    -          1979 च्या  बॅचचे आयपीएस अधिकारी
    -          अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम आणि केंद्रशाशीत प्रदेश केडरचे अधिकारी
    -          पुढील पदे भूषविली : दिल्ली पोलिस आयुक्त, तीहार जेलचे डीजी, आंदमान आणि निकोबार मध्ये आयजी, पुद्दुचेरी मध्ये डीजीपी.

    विजया राज्याध्यक्ष यांना जनस्थान पुरस्कार
    ·        ज्येष्ठ समिखसक आणि कथाकार विजया राज्याध्यक्ष यांना यंदाचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे.
    ·        एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या वतीने देण्यात येतो.
    ·        विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, इंदिरा संत, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, श्री. ना. पेंडसे, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, बाबुराव बागूल, ना. धो. मनोहर, महेश एल्कुंचवार, अरुण साधू यांना यापूर्वी हा पुरस्कार मिळाला आहे.

    असर चा अहवाल
    शिक्षक आणि शैक्षणिक साहित्यापेक्षा पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी आणि देखभालीसाठी सर्वाधिक खर्च होत असतानाही राज्यातील शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे नुकत्याच असर या संस्थेच्या अहवलातून समोर आले आहे.
    अहवालातील महत्त्वाची मुद्दे
    -          राज्यातील 14.5% शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. 2014 मध्ये हे प्रमाण 15.9% होते.
    -          पाण्याची टाकी असलेल्या शाळांपैकी 18.4% शाळांमध्ये पाणी नाही.
    -          राज्यातील 3.1% शाळांमध्ये स्वच्छता गृह नाही. (2014 मध्ये 2.9%)
    -          7.8% शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह नाही. (2014 मध्ये 9.8%)
    -          17.7% शाळांमध्ये वापरण्यायोगे स्वच्छता गृह नाहीत.
    -          मुलींसाठी स्वतंत्र आणि वापरण्याजोगे स्वच्छता गृह असलेल्या शाळांचे प्रमाण 62.5% आहे.
    -          67% शाळांमध्ये पिण्याचे पाणी आहे तर 68% शाळांमध्ये वापरण्याजोगे स्वच्छता गृहे आहेत.

    पोस्टाची पहिली पेमेंट बँक औरंगाबादमध्ये
    ·        महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पहिली इंडिया पोस्ट पेमेंट बँक औरंगाबाद शहरात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
    ·        औरंगाबाद येथील पोस्टाच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मराठवड्यातील आठ व नाशिक, नंदुरबार, धुळे व जळगाव हे बारा जिल्हे येतात.

    पी. बी. कडू यांचे निधन
    ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, कम्युनिस्ट नेते आणि माजी आमदार पी.बी. कडू यांचे निधन झाले आहे.  संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ति संग्राम मध्ये त्यांनी योगदान दिले होते. सुरुवारीला 1937 मध्ये त्यांनी प्रभात फेर्‍यांमध्ये सहभाग घेतला. संगमणेरला विद्यार्थी वसतिगृह सुरू केले. 1942 मध्ये चले जाव चळवळीत सहभाग भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आदि संघटनांमध्ये त्यांनी काम केले. 1952 साली नगर जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य. 1962-67 जिल्हा परिषद सदस्य. 1972 मध्ये राहुरीतून विधानसभेवर. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष



    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad