• New

    चालू घडामोडी : 17 जानेवारी 2017

    17 January 2017
    ज्येष्ठ साहित्यिक, कवी पुरुषोत्तम पाटील यांचे निधन
    प्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ कवी आणि महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे माजी सदस्य प्रा. पुरुषोत्तम श्रीपत पाटील यांचे नुकतेच निधन झाले. साहित्यप्रेमींमध्ये पुपाजीम्हणून ते प्रसिद्ध होते.
    अल्पपरिचय
    -          ३ मार्च १९२८ रोजी जळगाव जिल्ह्यातील बहादरपूर (ता.पारोळा) येथे
    -          त्यांचे मूळ गाव ढेकू (अमळनेर, जिल्हा जळगाव)
    -          सातवीपर्यंत बहादरपूरला शिक्षण
    -          अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमधून १९४६ मध्ये मॅट्रिक
    -          फर्ग्युसन महाविद्यालयातुन कला शाखेची पदवी
    -          त्यांच्या कविता सत्यकथामधून प्रकाशित होत
    -          जनशक्तीमध्ये उपसंपादक म्हणून काम
    -          जळगाव जिल्ह्यातील चिंचोली, हातेड येथील विद्यालयांमध्ये मुख्याध्यापकाची जबाबदारी
    -          १९६१ मध्ये धुळे येथील श्रीशिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू
    -          पहिला काव्यसंग्रह तळ्यातल्या सावल्या१९७८ मध्ये प्रकाशित. त्यास राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला.
    -          अनुष्टुभया नियतकालिकाचे संपादक म्हणूनही काम केले.
    -          कवितेसाठी वाहिलेले कवितारतीहे द्वैमासिक १९८५ मध्ये सुरू
    -          तुकारामाची काठी’, अमृताच्या ओळीही पुस्तके
    -          अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांचे ते सदस्य होते.
    -          १९८५ मध्ये प्रजासत्ताकदिनी झालेल्या अखिल भारतीय बहुभाषिक कविसंमेलनात त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
    -          महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे ते सदस्य होते.
    -          कवी बा. भ. बोरकर, वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काम केले.

    संपादकीय
    # सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात भारत जागतिक पातळीवर ४ थ्या स्थानावर आहे.
    # दरडोई उत्पन्नाच्या संदर्भात भारत जागतिक पातळीवरील १८३ देशांत १३९ व्या स्थानावर आहे.अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स आणि भारत या देशांतील लोकांचे दरडोई सरासरी राष्ट्रीय उत्पन्न अनुक्रमे ५५,८०५, ४३,७७१, ४०,९९७, ३७,६७५ आणि १,६१७ डॉलर्स एवढे आहे. परचेसिंग पॉवर पॅरिटी लक्षात घेता ते अनुक्रमे ५५,८०५, ४१,१५९, ४६,८९३, ४१,१८१ आणि ६,१६२ एवढे ठरते.
    # देशातील १४ कोटी शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी ८५ टक्के कुटुंबे ही सीमांत व अल्पभूधारक शेतकऱ्यांची आहेत.

    जनगणना
    लोकसंख्येबाबत कौटिल्यच्या अर्थशास्त्र (इसवी सनपूर्व ३०० वर्षे) तसेच १५ व्या शतकातील आइने-ए-अकबरी या ग्रंथातही चर्चा आढळते. भारतात १८६५-७२ दरम्यान पहिली लोकसंख्या मोजणी केली गेली; पण ती टप्प्याटप्प्याने केल्यामुळे विश्वासपूर्ण मानली जात नाही. मात्र १८८१ साली अशी मोजणी एकाच वेळी सर्व देशभर केली गेली आणि त्यानंतर दर दहा वर्षांनी ही विराट प्रक्रिया आपल्या देशात २०११ पर्यंत सतत पार पाडली गेली आहे. विकसनशील देशांत भारत हा एकमेव देश आहे, जिथे मागील १०० वर्षांहून अधिक काळ अशी जनगणना अखंडितपणे आणि बहुतांश समाधानकारकरीत्या झालेली आहे. ही एक मोठी उपलब्धीच आहे.केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाचा भाग असलेली जनगणना (सेन्सस) संस्था हे काम आयोजित करते. रजिस्ट्रार जनरल हा तिचा प्रमुख असतो आणि प्रत्येक राज्यात या संस्थेचे कार्यालय असून सेन्सस कमिशनर हा त्याचा प्रमुख असतो.मोजणीच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक वास्तू ते निवासी घर, कार्यालय किंवा कारखाना आहे किंवा कसे हे निरीक्षण करून त्यांना त्या गटाप्रमाणे क्रमांक दिले जातात. ग्रामीण भागात १५० तर शहरी भागात १३० निवासी कुटुंबे या प्रमाणात एक प्रशिक्षित गणना कर्मचारी सदर क्रमांकित घरी त्यांची भेट घेऊन निर्देशित प्रपत्रात सर्व कुटुंब सभासदांची आकडेवारी भरतो. हा कार्यक्रम देशभर जवळपास एका निश्चित पंधरवडय़ातच पूर्ण केला जातो.

    युजीन सेरनन
    शेवटचा चांद्रवीर  युजीन सेरनन यांचे नुकतेच निधन झाले. जेमिनी ९ ए, अपोलो १० व अपोलो १७ अशा तीन मोहिमांत ते चंद्रावर जाऊन आले होते.
    युजीन सेरनन यांच्याविषयी
    -          नौदलाचे वैमानिक, विद्युत अभियंता व १९७२ मध्ये चंद्रावर चालणारा अखेरचा माणूस ही त्यांची ओळख आहे.
    -          सेरनन यांचा जन्म १४ मार्च १९३४ रोजी इलिनॉइसमधील शिकागो येथे झाला.
    -          मेवूड येथील प्रोव्हिसो ईस्ट हायस्कूलमधून ते पदवीधर झाले व नंतर विद्युत अभियांत्रिकीत पदवी घेतली.
    -          परडय़ू विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले व नंतर नौदलात वैमानिक बनले.
    -          हवाई अभियांत्रिकीतही त्यांनी नौदलाच्या संस्थेतून पदव्युत्तर पदवी घेतली होती.
    -          चंद्रावर एकूण १२ जण जाऊन आले. त्यात दोनदा चंद्रावर प्रत्यक्ष चालण्याचा अनुभव घेणारे सेरनन हे एकमेव.
    -          विशेष म्हणजे चंद्रावर पहिले पाऊल   ठेवणारे नील आर्मस्ट्राँग व शेवटचे पाऊल ठेवणारे सेरनन दोघेही परडय़ू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी.
    -          १९७६ मध्ये सेरनन नौदल व नासा येथून निवृत्त झाले.
    -          त्यांच्या आठवणी द लास्ट मॅन ऑन द मूनया पुस्तकात शब्दबद्ध आहेत. त्या पुस्तकाचे सहलेखक आहेत डोनाल्ड डेव्हिस.
    -          इन द शॅडो ऑफ द मूनहा माहितीपट त्यांच्यावर काढण्यात आला. नंतर त्याच नावाने त्यांनी पुस्तकही लिहिले.
    -          डिस्कव्हरी वाहिनीने त्यांच्यावर व्हेन वुई लेफ्ट अर्थ, द नासा मिशन्सहा लघुपट काढला
    -          एचबीओने काढलेल्या फ्रॉम द अर्थ टू मूनया लघुपटास एमी पुरस्कार मिळाला होता.
    -          द स्काय अ‍ॅट नाइटया बीबीसीच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता.
    -          इंटरनॅशनल स्पेस हॉल ऑफ फेमसह अनेक मानसन्मान त्यांना मिळाले.

    भडगावच्या निशा पाटील हिला 2016 चा राष्ट्रीय वीरबालापुरस्कार
    ·        जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील निशा पाटील हिला 2016 चा राष्ट्रीय वीरबालापुरस्कार जाहीर झाला आहे.
    ·        या वर्षी देशभरातील 25 मुलांना राष्ट्रीय बालवीरवीरबालासन्मानाने गौरविण्यात येणार असून त्यात राज्यातून निशा ही एकमेव आहे.
    ·        निशाने जिवावर उदार होऊन गावातील एका घराला लागलेल्या आगीतून एका बालिकेचे प्राण वाचविले होते.
    ·        भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्षा गीता सिद्धार्थ यांनी 17 जानेवारी 2017 रोजी शौर्य पुरस्कारांची घोषणा केली.
    ·        देशातील शूरवीर मुलांना व मुलींना प्रोत्साहन म्हणून 1957 पासून भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिले जातात. यंदाच्या विजेत्यांमध्ये 12 मुली व 13 मुलांचा समावेश आहे. यंदा चार मुलांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोच्च भरत सन्मान अरुणाचल प्रदेशाच्या कुमारी तार पेजू हिला मरणोत्तर जाहीर झाला आहे.



    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad