• New

    चालू घडामोडी : 16 जानेवारी 2017

    16 January 2017
    जीएसटीसाठी केंद्राचे नमते
    केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली 16 जानेवारी 2017 रोजी झालेल्या बैठकीत जीएसटी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्यांवर केंद्राने नमते घेतले आहे.
    बैठकीतील काही महत्त्वाचे निर्णय:
    -          छोट्या प्रमाणात कर भरणार्‍या करदात्यांपैकी बहुसंख्यांवर राज्य सरकरांचे नियंत्रण असेल असे केंद्राने मान्य केले आहे.
    -          वार्षिक दीड कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या करदात्यांपैकी 90% करदाते राज्यांच्या नियंत्रणाखाली येणार , उर्वरित 10% केंद्राच्या नियंत्रणाखाली.
    -          वार्षिक दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या  करदात्यांपैकी केंद्र व राज्य सरकरांकडे प्रत्येकी 50%.
    -          दोन कोटी रुपयापर्यंतचा कर बुडविणे हा जमीनपात्र गुन्हा असेल (यापूर्वी मूळ मसुदयात  दोन कोटी रुपयापर्यंतचा कर बुडविल्यास थेट अटक करण्याची तरतूद होती).
    -          आता फसवणूक वा तत्सम प्रकार असतील तरच करबुडव्यांच्या अटकेचा विचार होईल.

    एक टक्का श्रीमंतांकडे 58% संपत्ती
    भारतातील 1% धनाड्यांकडे देशातील 58% संपत्ती एकवटली असल्याचे ऑक्सफॅमच्या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. जागतिक आर्थिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॅमने हा आर्थिक विषमतेचा अहवाल प्रकाशित केला आहे.
    अन्य मुद्दे
    -          भारततिल तळाच्या 70% लोकांकडे असलेल्या संपत्तीइतकी दौलत अवघ्या 57 अब्जाधीशांकडे आहे.
    -          जगभरातील 50% लोकांकडे असलेल्या संपत्तीइतके धन केवळ 8 अब्जाधीशांकडे एकवटले आहे.

    गर्भातील बाळांत व्यंग असेल तर गर्भपात करता येऊ शकतो, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे.मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी, १९७१ च्या कायद्यानुसार २० आठवडय़ानंतर गर्भपात करता येत नाही.



    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad