• New

    चालू घडामोडी : 13 डिसेंबर 2016

    कमीत कमी सुट्ट्या घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या देशांच्या यादीत भारताने चौथे
    ·        कमीत कमी सुट्ट्या घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या देशांच्या यादीत भारताने चौथे स्थान पटकावले आहे. एक्सपिडीयाच्या सर्व्हेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे.
    ·        एक्सपिडीया हे ऑनलाइन पोर्टल असून कोणत्या देशातील लोक नोकरीला किती प्राधान्य देतात याचा या पोर्टलने नुकताच सर्व्हे केला.
    ·        त्यात त्यांना भारतीय लोक वर्षातून २१ सुट्ट्या मिळत असतानाही केवळ १५ सुट्ट्या घेत असल्याचे आढळून आलं आहे.
    ·        या यादीत स्पेन आणि दुबईनं अव्वल स्थान मिळवल आहे. त्यानंतर मलेशिया दुसऱ्या क्रमांकावर असून तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरीया आहे.
    ·        कामासाठी ७१ टक्के भारतीयांनी सुट्ट्या रद्द केल्याचे या सर्व्हेक्षणात आढळून आलं आहे.
    ·        हा सर्व्हे १२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०१६ च्या दरम्यान करण्यात आला आहे.
    ·        २८ देशात हा सर्व्हे करण्यात आला असून त्यात ९४२४ कामगारांनी भाग घेतला होता.


    क्रिस्टियानो रोनाल्डो: बॅलोन डिओर अवॉर्ड 2016
    ·        रियाल मॅड्रिड संघाकडून खेळणारा पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला चौथ्यांदा प्रतिष्ठित बॅलोन डिओर अवॉर्ड 2016 मिळालेला आहे.
    ·        वर्षातील सर्वोत्कृष्ठ फुटबॉलपट्टूला दिल्या जाणार्‍या या पुरस्करच्या शर्यतीत त्याने अर्जेंटीनाच्या लियोनल मेस्सी ला मागे टाकले आहे.  
    ·        यापूर्वी, हा पुरस्कार त्याला २००८, २०१३ आणि २०१४ मध्ये मिळवलेला होता.
    ·        या पुरस्कारासाठी करण्यात आलेल्या मतदानामध्ये रोनाल्डोने ४२९ मतांच्या विक्रमी फरकाने लिओनेल मेस्सी व फ्रेंच एंटोनी ग्रेझमन यांना अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या स्थानावर टाकले.
    ·        मस्सी ने हा पुरस्कार पाच वेळा मिळवलेला आहे.
    ·        बलोन डिओर हा जगभरातील सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या फुटबॉलपटूला दिला जाणारा पुरस्कार आहे आणि याचा निर्णय १७३ पत्रकारांच्या मताने ठरवण्यात येतो.
    ·        पहिल्यांदा  हा पुरस्कार स्टॅनली मॅथ्यूजला १९५६ साली दिला गेला.


    पजाब मध्ये भारतातील पहिली अॅम्फिबियन बस
    ·        पंजाब सरकारने अमृतसर जवळ हरिके पाणथळ जागेवर भारतातील पहिली अॅम्फिबियन (जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणावरून चालणारी) बस प्रकल्प सुरु केली आहे.
    ·        याला "हरिके क्रूझ" असे नाव देण्यात आले आहे, जी जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी प्रवास सेवा देणार आहे.
    ·        ११ कोटी रुपये खर्चून स्वीडिश ऑटोमोबाईल कंपनी स्कॅनियाकडून आयात करण्यात अली आहे.




    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad