चालू घडामोडी : 27 फेब्रुवारी 2017
पूर्व किनारा आर्थिक कॉरिडॉर संबंधी भारत
आणि एडीबीमध्ये करार
|
· भारत आणि आशियाई विकास बँकेने
(एडीबी) 800 किलोमीटर लांबीच्या विशाखापट्टणम-चेन्नई औद्योगिक कॉरिडॉरच्या विकाससाठी
375 दशलक्ष डॉलर्सच्या कर्ज व अनुदानाचा करार केला आहे. 2500 किमीच्या पूर्व किनारा
आर्थिक कॉरिडॉरचा हा पहिला टप्पा आहे. पूर्व किनारा आर्थिक कॉरिडॉर कन्याकुमारी ते
कलकत्ता दरम्यान विकसित करण्यात येणार आहे.
एडीबी: एडीबी ही मनिला स्थित
क्षेत्रीय विकास बँक असून 1966 मध्ये या बँकेची स्थापना करण्यात आली. सध्या बँकेचे
67 सदस्य असून त्यापैकि 48 आशियाई क्षेत्रातील आहेत.
भारत
आणि जर्मनीने दोन्ही देशांत गुंतवणूक प्रवाह वाढविण्यासाठी सर्वंकष सामाजिक सुरक्षा
कराराला मान्यता दिली असून 1 मे 2017 पासून
तो अमलात येणार आहे. 2011 मध्ये या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती.
भारताच्या एफडीआयमध्ये 18% नी वाढ
|
औद्योगिक
धोरण आणि प्रमोशन विभागणे (DIPP)
नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार भारताने 2016 मध्ये 46 दशलक्ष डॉलर्सची परकीय
गुंतवणूक आकर्षित केली आहे. 2015 च विचार करता भारताचा एफडीआय 2016 मध्ये 18% नी वाढला
आहे. सेवा, दूरसंचार, व्यापार, कम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर
आणि वाहन या क्षेत्राने प्रामुख्याने ही गुंतवणूक आकर्षित केली आहे. सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक सिंगापूरमधून व त्यानंतर
अनुक्रमे मॉरिशस, नेदर्लंड, जपान मधून झाली आहे.
सिलहेट शहारच्या विकाससाठी भारत आणि बांगलादेशमध्ये
सामंजस्य करार
|
बांगलादेशमधील
सिलहेट (Sylhet)
या मेट्रो शहारच्या शाश्वत विकाससाठी भारत आणि बांगलादेशने वित्तीय मदत पुरविण्यासंबंधी
सामंजस्य करार केला आहे. सिलहेट हे एक प्राचीन आणि ऐतिहासिक शहर असून स्वातंत्र्यापूर्वी
आसाम प्रांताचा भाग होते.
राजस्थानमध्ये ‘राहत’ वैद्यकीय प्रकल्प सुरू
|
सादुर
आणि ग्रामीण भागातील जनतेला हृदय विकरच्या झटक्यावेळी वेळेवर उपचार पुरविण्यासाठी राजस्थांनाच्या
मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ‘राहत’ या वैद्यकीय प्रकल्पाची सुरुवात केली आहे. हृदय विकारावर आरोग्य कार्यक्रम
सुरू करणारे राजस्थान हे तमिळनाडू नंतर दुसरे राज्य ठरले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत