चालू घडामोडी : 10 डिसेंबर 2016
|
१० डिसेंबर : मानवी
हक्क दिन
|
·
मानवी हक्काच्या वैश्विक
घोषणापात्राचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी १० डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून
साजरा केला जातो.
·
२०१६ ची थीम : ‘एखाद्याच्या हक्कासाठी उभे रहा’
·
मानवी हक्काच्या वैश्विक
जाहीरनामा १० डिसेंबर १९४८ रोजी स्वीकारण्यात आला
·
१९५० पासून हा दिवस
साजरा केला जातो.
|
डीजी शाला टीव्ही
चॅनेल
|
·
कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन
देण्यासाठी केंद्रीय इलेकट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘डीजी शाला’ नावाचे टीव्ही चॅनेल सुरु
केले आहे.
·
रोकडविरहित व्यवहाराना
प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजिधन’ उपक्रमाचाच हे चॅनेल भाग आहे.
वैशिष्ठ्ये
-
दिवसाचे २४ तास आणि
वर्षाचे ३६५ दिवस सुरू राहणार
-
दूरदरशन कडून
व्यवस्थापित करण्यात येणार आहे.
-
हे जीसॅट-१५ या
उपग्रहावर आधारित आहे
|
पथ्वीच्या कक्षेत
भ्रमण करणारे अंतराळवीर जॉन ग्लेन यांचे निधन
|
·
पथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणारे
पहिले अमेरिकन अंतराळवीर जॉन ग्लेन यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे.
·
२० फेब्रुवारी १९६२ रोजी
अटलांटिक महासागरामध्ये उतरण्यापूर्वी मर्कुरी कॅप्सुल “फ्रेंडशिप ७” ने पृथ्वीची तीन वेळा त्यांनी चक्कर मारली होती
·
१९७४ साली ते अमेरिकन
सिनेट म्हणून निवडून आले.
·
वयाच्या ७७ व्या वर्षी, ते
अंतराळात उड्डाण करणारे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ति ठरले होते.
·
त्यांनी हा प्रवास
अंतराळ यान - डिस्कवरी मधून केला.
|
विजय चौधरी
तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी
|
·
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचा
विजय चौधरी तिसर्यांदा महाराष्ट्र केसरी ठरला
आहे.
·
पुण्यातल्या वारजे गावात
झालेल्या स्पर्धेत विजय चौधरीनं अभिजित
कटकेवर मात केली आहे.
·
विजय चौधरीनं माती
विभागातून महाराष्ट्र केसरीची फायनल गाठली होती. तर अभिजित कटकेनं मॅट विभागातून
अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
·
या विजयासह विजय चौधरीनं
नरसिंग यादवच्या सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकण्याच्या विक्रमाशीही बरोबरी
साधली.
·
विजय चौधरी २०१४ आणि २०१५
साली सलग दोनवेळा महाराष्ट्र केसरी किताब जिंकला होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत