चालू घडामोडी :12 डिसेंबर 2016
वरदाह चक्रीवादळ
|
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नुकतेच
वरदाह नावाचे चक्रीवादळ दाखल होते. या वादळामुळे आंध्रप्रदेश, तामिळनाडूतल्या अनेक भागात सोसाट्याच्या
वार्यासह जोरदार पाऊस पडला. या मोसमातील हे तिसरे चक्रीवादळ आहे. पहिल्यांदाच असे
झाले आहे कि ईशान्य पावसाळी हंगामात एका
वर्षात तीन चक्रीवादळ निर्माण झाले आहे.
यापूर्वी क्यांत आणि नाडा हे दोन चक्रीवादळे निर्माण झाली होती.
चक्रीवादळ म्हणजे काय?
काही स्थानिक परिस्थितीमुळे मध्यभागी कमी दाबाचा टापू निर्माण होतो. भोवतालचे
वारे कमी दाबाच्या केंद्राकडे वाहू लागतात. या प्रक्रियेत हवेचा भोवरा तयार होतो
आपण त्याला चक्रीवादळ म्हणतो. चक्रीवादळाच्या समभाररेषा गोलाकार असतात. अशा
आवर्ताचा विस्तार ४००-४५० कि.मी.पर्यँत असू शकतो. वा-याचा वेगही प्रचन्ड (ताशी ३००
कि.मी. पर्यँत) असतो. परिणामत: अशा वादळामुळे नुकसानही प्रचन्ड होते.
-
तामिळनाडून घोंघावत शिरलेल्या
चक्रीवादळाच्या नावाचा म्हणजे 'वरदाह' या शब्दाचा अर्थ आहे गुलाब.
हा मूळ उर्दू शब्द असून या वादळाचे नामकरण पाकिस्तानने केले आहे.
-
बंगालच्या उपसागरात
थायलंडच्या दक्षिणेला हे चक्रीवादळ तयार झाले.
-
'वरदा' च्या पूर्वी आलेल्या
'हुडहुड' वादळाचे नाव ओमानने ठेवले
होते. त्यापूर्वीचे 'फायलीन' नाव
थायलंडने सुचवले होते.
-
आतापर्यंत चक्रीवादळांची
६४ नावे ठेवण्यात आली आहेत. भारताने एका वादळाला 'लहर' हे नाव
दिले होते.
-
चक्रीवादळाच्या
नामकरणाला १९५३ मध्ये अटलांटिक क्षेत्रात झालेल्या करारानुसार सुरुवात झाली.
-
हिंदी महासागरात
येणाऱ्या वादळांना नावे देण्याचा प्रस्ताव भारताने मांडला होता. त्यानुसार २००४
पासून हिंदी महासागरातल्या वादळांना आशियातले ८ देश क्रमाक्रमाने नावे सुचवतात
जगातील सर्वांत
मोठा बोगदा कार्यान्वित
|
·
जगातील सर्वांत मोठा बोगदा
असलेल्या स्वित्झर्लंडमधील गॉटहार्ड बेस टनेलमधून ११ डिसेंबर २०१६ रिजी
प्रवासी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली.
वैशिष्ठ्ये
-
हा बोगदा ५७
किलोमीटरचा आहे.
-
तो बांधण्यासाठी १.८
कोटी डॉलर खर्च आला आहे.
-
हा बोगदा अल्प्स पर्वतात
आहे.
-
बांधण्यासाठी १७ वर्षे
लागली आहेत
सर्वात लांब पहिले तीन बोगदे
१) गॉटहार्ड बेस टेनल – स्वित्झर्लंड (लांबी : ५७ किलोमीटर)
२) सेइकान बोगदा – जपान (लांबी : ५३.९ किलोमीटर)
३) चॅनेल टनेल (ब्रिटन व फ्रान्सला जोडणारा) (लांबी : ५०.५ किलोमीटर)
नुकताच वैज्ञानिकांना वातावरणाच्या तपांबर थराच्या वरच्या पातळीवर पहिल्यांदाच
अमोनिया आढळून आला आहे.
डिजिटल देयका
संबंधित वटल समितीचा अहवाल जाहीर
|
·
डिजिटल देयकावर वित्त मंत्रालयाकडून
२३ ऑगस्ट २०१६ रोजी गठित केलेल्या वटल समितीने त्याचा अंतिम अहवाल सादर केला आहे.
·
ही 11 सदस्यीय समिती
नीती आयोगाचे प्रमुख सल्लागार आणि माजी वित्त सचिव रतन पी वटल यांच्या
अध्यक्षतेखाली आहे.
समितीच्या शिफारसी
-
दयकांमध्ये स्पर्धा, खुला प्रवेश आणि क्षमता यांना प्रोत्साहन देऊन डिजिटल
वातावरणातील अंतर भरून काढण्यासाठी हितावह नियामक उपायांसह भारतात डिजिटल
देयकाच्या वाढीला गती देण्यासाठी एक मध्यम-मुदतीचे धोरण तयार करावे.
-
डिजिटल व्यवहारांची सुरक्षितता
पाळताना आणि सर्व भागधारकांचा सर्व स्तरावर सहभाग आणि यामध्ये येणारे नवीन भागीदार
यांच्या हितार्थ आर्थिक आणि सामाजिक स्वरूपाने वगळले गट आणि बाजारातील उदयोन्मुख
तंत्रज्ञानाची एकरुपता यांचा समावेश करावी.
-
बका आणि बिगर बँका दरम्यान
देयक प्रणालीची आंतरक्रियात्मक क्षमता वाढवावी,
-
डिजिटल देयक पायाभूत
सुविधा आणि संस्था यांचा विकास आणि नवकल्पनेच्या सन्मानासाठी फ्रेमवर्क आणि डिजिटल
देयके सक्षम करण्यामध्ये प्रयत्न करावे.
न्यूझीलंडच्या
पंतप्रधानपदी बिल इंग्लिश
|
·
न्यूझीलंडचे उपपंतप्रधान
म्हणून कार्यरत राहिलेले बिल इंग्लिश आता देशाचे
नवे पंतप्रधान बनले आहेत.
·
ते जॉन की यांची जागा
घेतील. तर नव्या उपपंतप्रधानपदी पाउला बेनेट असणार आहेत.
·
२००८ साली नॅशनल पार्टी
सत्तेत आल्यानंतर इंग्लिश हे देशाचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री होते.
·
१९९० साली संसदेत निवडून
येण्याआधी दक्षिण आइसलँडमध्ये एक शेतकरी आणि न्यूझीलंड ट्रेजरीत ते विश्लेषक होते.
·
२००१ साली नॅशनल
पार्टीचे ते नेते होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली २००२ च्या निवडणुकीत पक्षाला
मोठा पराभव स्वीकारावा लागला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत