• New

    नोव्हेंबर 2016 : चर्चेतील व्यक्ती (Part 2)

    www.surne.org
    इशात हुसैन
    §  टाटा समूहाने सायरस मिस्त्री यांचे टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या अध्यक्षपदावरून हटवले असून त्याजागी इशात हुसैन यांची नियुक्ती केली आहे.
    कोण आहेत इशात हुसैन?
    ·         जुलै १९९९ साली हुसैन टाटा सन्सच्या बोर्डावर कार्यकारी संचालक म्हणून रुजू झाले होते.
    ·        तर २८ जुलै २०० पासून ते  आत्तापर्यंत हुसैन यांनी वित्त संचालक म्हणूनही काम पाहिले.
    ·        टाटा सन्स जॉईन करण्यापूर्वी त्यांनी टाटा स्टील कंपनीत सुमारे १० वर्ष वित्त - वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालकपदाची धुरा सांभाळली.
    ·        तसेच टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस , व्होल्टास आणि टाटा स्काय अशा विविध कंपन्यांच्या संचालक मंडळावरही ते कार्यरत होते.

    www.surne.org
    मेंग हॉंगवेई
    ·        चीनमधील उच्चस्तरीय पोलीस अधिकारी मेंग हॉंगवेई यांची आंतरराष्ट्रीय गुन्हे पोलीस संघटनेच्या (इंटरपोलअध्यक्षपदी निवड करण्यात अली आहे.
    ·        बालीइंडोनेशिया येथे झालेल्या इंटरपोलच्या ८५ व्या वार्षिक बैठकीत त्यांची निवड करण्यात अली आहे.
    ·        Mireille Ballen Ballestrazzi यांची जागा ते घेणार आहेत.
    ·        मेंग हॉंगवेई हे  वर्षे पद धारण करणारे पहिले चिनी व्यक्ती आहेत.
    ·        मेंग हॉंगवेई यापूर्वी चीनमध्ये सार्वजनिक सुरक्षा उपमंत्री या पदावर कार्यरत होते.
    v INTERPOL
    ·        इंटरपोल ही एक जागतिक पोलिस सहकार्य संस्था आणि स्वयंसेवी संस्था आहे.
    ·        तिचे कार्यक्षेत्र सार्वजनिक सुरक्षा आणि  दहशतवादाविरुद्ध लढामानवतेविरुद्धचे गुन्हेयुद्ध गुन्हेपर्यावरण गुन्हे आहे.
    ·        आंतरराष्ट्रीय गुन्हे पोलीस आयोगाच्या स्वरूपात १९२३ मध्ये स्थापना करण्यात अली.
    ·        इंटरपोलचे मुख्यालय ल्योनफ्रांस येथे आहे.
    ·        १९० सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्रानंतर सर्वात मोठी आंतराराष्ट्रीय संघटना

    www.surne.org
    अन्विता तेलंग

    ·        १४ नोव्हेंबर २०१६ रोजी बालदिनानिमित्त पुण्याच्या अन्विता तेलंग हिने रेखाटलेले डुडल गुगलवर झळकले आहे.
    ·        गुगलतर्फे घेण्यात आलेल्या यंदाच्या ‘डुडल 4 गुगल’ स्पर्धेत पुण्याच्या बालेवाडी येथील विब्ग्योर हायस्कूलची विद्यार्थिनी अन्विता प्रशांत तेलंग ही राष्ट्रीय विजेती ठरली.
    ·        तिने रेखाटलेल्या कल्पकप्रेरणादायी आणि ‘एन्जॉय एव्हरी मोमेंट’ हे शीर्षक असलेल्या डुडलची निवड करण्यात आली होती
    ·        इयत्ता चौथी ते सहावीच्या गटात अन्विताने बाजी मारली.
    ·        या वर्षीच्या डुडल स्पर्धेची संकल्पना ‘इफ आय कुड टीच एनीवन एनीथिंगइट वुड बी...’ ही होती.

    www.surne.org
    जयंत सावरकर
    ·        अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ‘९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची निवड करण्यात आली आहे.
    ·        नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जयंत सावरकर यांच्यासह अशोक समेळप्रविण कुलकर्णीबापु लिमयेप्रशांत दळवी (सर्व मुंबई), श्रीनिवास भणगे (पुणे), विनायक केळकर (सांगलीयांचे प्रस्ताव दाखल झाले  होते.
     जयंत सावरकर……
    ·        जयंत सावरकर हे एक मराठी नाट्य अभिनेते आहेत.
    ·        त्यांचा जन्म  मे १९३६ रोजी झाला.
    ·        वयाच्या विसाव्या वर्षी १९५५ पासून त्यांची आभिनयाची कारकीर्द सुरू झाली.
    ·        सुरुवातीची बारा वर्षे सावरकर यांनी ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम केले.
    ·        जयंत सावरकर यांनी शंभरहून अधिक मराठी आणि तीसहून अधिक हिंदी चित्रपटांत कामे केली आहेत.
    ·        मी एक छोटा माणूस हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे.
    ·        अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार (२०१५)
    ·        डॉमा.गोखांडेकर स्मृतिपुरस्कार
    ·        रत्नागिरी जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून गौरव (१९९६)
     आखिल भारतीय नाट्य संमेलन
    ·        अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते.
    ·        .श्रीखापर्डे हे .१९०५ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
    ·        त्यानंतर काही अपवाद वगळताजवळजवळ दर वर्षी नाट्यसंमेलन होते.
    ·        यापूर्वी ठाण्यामध्ये झालेल्या ९६ व्या आखली भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर हे होते.

    www.surne.org
    अजय राजाध्यक्ष
    ·        अमेरिकेच्या वित्त विभागाला रोखे बाजारात गुंतवणुकीचा तसेच तेथील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हला अर्थव्यवस्था आणि भांडवली बाजाराबद्दल सल्ला देणाऱ्या ‘ट्रेझरी बोरोइंग अॅडव्हायजरी कमिटी (TABC)’ वर अजय राजाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
    ·        अत्यंत महत्त्वाच्या अशा या समितीवर नियुक्त होणारे ते पहिले आणि एकमेव भारतीय मूळ असलेले व्यक्ती आहेत.
    ·        एकूण १६ सदस्य असलेल्या या समितीच्या अन्य सदस्यांमध्ये जागतिक पसारा असलेल्या बडय़ा वित्तसंस्थांचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत.


     अजय राजाध्यक्ष
    ·        मुंबईत जन्मलेले ३८ वर्षीय राजाध्यक्ष यांनी मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगची पदवी मिळविली
    ·        आयआयएम कोलकाता येथून वित्त विषयातून एमबीए केले.
    ·        त्यांनी ॅरिझोना येथील अमेरिकन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ इंटरनॅशनल मॅनेजमेंटमधून पदव्युत्तर पदवी मिळविली.
    ·        बार्कलेज्मध्ये २००५ सालात रुजू होण्यापूर्वी ते काही काळ वॉल स्ट्रीटवर भांडवली बाजारात उमेदवारीही केली.

    www.surne.org
    रविचंद्रन अश्विन
    ·        भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने यंदाच्या वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
    ·        अश्विनने २०१६ या वर्षात आतापर्यंत एकूण ८० विकेट्स घेतल्या असून यंदाच्या वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणाऱया यादीत अश्विन अव्वल स्थानावर आहे.
    ·         यातील ५५ विकेट्स अश्विनने कसोटी सामन्यांत घेतल्या आहेत.
    ·        अश्विनने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये आतापर्यंत ४१ कसोटी सामन्यांत २३१तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०२ सामन्यांत १४२ विकेट्स घेतल्या आहेत.
    ·        ट्वेन्टी-२० विश्वात अश्विनच्या खात्यात ५२ विकेट्स जमा आहेत.
    ·         जून २०१० रोजी अश्विनने भारतीय संघात पदार्पण केले होते.

    www.surne.org
    एमबालमुरलीकृष्ण
    ·        कर्नाटकी संगीताला वेगळी दिशा देणारे प्रख्यात गायक एमबालमुरलीकृष्ण यांचे २१ नोव्हेंबर २०१६ रोजी निधन झाले.
    ·        एक सुप्रसिद्ध गायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या बालमुरलीकृष्ण यांनी संगीतकार आणि अभिनेता म्हणूनही भूमिका निभावल्या होत्या
     एमबालमुरलीकृष्ण
    ·         जुलै १९३० रोजी शंकरगुप्तमआंध्रप्रदेश येथे जन्म.
    ·       मंगलमपल्ली मुरलीकृष्ण हे त्यांचे मूळ नाव होते.
    ·        वयाच्या आठव्या वर्षांपासून त्यांनी आपल्या संगीत प्रवासाला सुरुवात केली.
    ·        गणपती रागसर्वश्री रागमहती रागलवंगी रागी त्यांची देणगी आहे.
    ·        १९६७ मध्ये भक्त प्रल्हाद मध्ये त्यांनी नारदाची भूमिका केली होती.
    ·        त्यांना मिळालेले पुरस्कार
    -          पद्मविभूषण -१९९१
    -          युनेस्को द्वारे महात्मा गांधी सिल्व्हर मेडल १९९५
    -          फ्रान्सचा पुरस्कार
    -          उकृष्ट संगीत दिग्दर्शन आणि पार्श्वगायनासाठी फिल्मफेयर आणि राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले.




    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad