नोव्हेंबर 2016 : चर्चेतील व्यक्ती (Part 3)
www.surne.org
प्रा. एम. जी. के. मेनन
· प्रख्यात वैज्ञानिक, इस्त्रोचे माजी अध्यक्ष आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे माजी संचालक प्रा. एम. जी. के. मेनन यांचे २२ नोव्हेंबर २०१६ रोजी निधन झाले.
एमजीके मेनन यांचा अल्पपरिचय
· त्यांचे संपूर्ण नाव माबिलीकलाथिल गोविंद कुमार मेनन असे आहे.
· १९२८ मध्ये मंगळुरू येथे त्यांचा जन्म झाला.
· शिक्षण:
- पंजाब विद्यापीठातून मॅट्रिक
- आग्रा विद्यापीठातून विज्ञानाचे पदवीधर
- मुंबईच्या रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेत भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी
- १९५३ मध्ये ते ब्रिस्टॉल विद्यापीठातून पीएच.डी.
· पुढील संस्थांमध्ये त्यांनी काम केले:
ü टाटा मूलभूत संशोधन संस्था:
- १९५५ मध्ये ते या संस्थेत आले.
- १९६६ मध्ये संचालकपदी नेमणूक
- १९७५ पर्यंत ते या संस्थेचे संचालक होते.
ü भारतीय अवकाश संशोधन संस्था:
- इस्रोचे अध्यक्ष म्हणून त्यांनी १९७२ मध्ये नऊ महिने काम केले.
ü रामन ट्रस्ट
- थोर संशोधक सी. व्ही. रामन यांनी मेनन यांना रामन ट्रस्टवर नेमले होते.
· त्यांनी पुढील पदांवर काम केले आहे:
- विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव
- व्ही.पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्रीही.
- लंडनची रॉयल सोसायटी, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थांचे ते फेलो होते.
- नियोजन आयोगाचे सदस्य
- पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार
- कौन्सिल ऑफ सायन्स अॅण्ड इंडस्ट्रीअल रिसर्चचे उपाध्यक्ष
· त्यांना पुढील पुरस्कार मिळालेले आहेत :
- पद्मभूषण (१९६८)
- पद्मविभूषण (१९८५)
- २००८ मध्ये लघुग्रह ७५६४ ला गोकुमेनन असे त्यांचे नाव देण्यात आले
- १९७० मध्ये रोयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड
|
www.surne.org
राम नरेश यादव
· उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री राम नरेश यादव यांच २२ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे.
· राम नरेश यादव यांनी १९७७ व १९७९ या कालावधीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.
· मध्यप्रदेशचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे.
www.surne.org
अँटिनिओ कोस्टा
· भारतीय वंशाचे पोर्तुगाल पंतप्रधान अँटिनिओ कोस्टा हे १४ व्या प्रवासी भारतीय दिनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
· बेंगुलुरू (कर्नाटक) येथे ७ ते ९ जानेवारी २०१७ दरम्यान प्रवासी भारतीय अधिवेशन होणार आहे.
· अँटिनिओ कोस्टा हे ८ जानेवारी रोजी होणाऱ्या उदघाटन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
· यासोबतच ७ जानेवारी रोजी होणाऱ्या युवा प्रवासी भारतीय दिनाचे विशेष पाहुणे म्हणून सुरिनम चे उपाध्यक्ष मायकल अश्विन सतेंद्र हे उपस्थित राहणार आहेत.
· अँटोनियो कोस्टा
· १७ जुलै १९६१ रोजी पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे जन्म.
· त्यांच्या वडिलांचे मूळ गाव गोवा होते.
· ते व्यवसायाने वकील आहेत.
· ते २०१५ मध्ये पोर्तुगालचे पंतप्रधान बनले.
· २००४ मध्ये युरोपियन संसदेच्या १४ पैकी एका उपाध्यक्षपदी निवडून आले.
· २००७ ते २०१५ दरम्यान ते लिस्बन शहराचे महापौर होते.
· प्रवासी भारतीय दिन
· जगभरातील भारतीय समुदायाला भारतीय विकासात सामावून घेण्यासाठी दरवर्षी ९ जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो.
· ९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले होते म्हणून या दिवसाची निवड करण्यात अली आहे.
www.surne.org
पंकज पटेल
· पंकज पटेल यांची २०१७ साठी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की)च्या अध्यक्षपदी निवड करण्यात अली आहे.
· अंबुजा नेओटीया समूहाचे अध्यक्ष हर्षवर्धन नेओटीया यांची जागा ते घेणार आहेत.
· पंकज पटेल
· सध्या ते Zydus Cadila चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आहेत.
· आयसर आणि IIM अहमदाबाद सारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये सल्लागार समितीत कार्यरत होते.
· गुजरात कॅन्सर सोसायटीचे ते उपाध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, ट्रस्टी आहेत.
· गुजरात कर्करोग संशोधन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत.
· Federation of Indian Chambers of Commerce and Industry (FICCI)
· भारतातील सर्वात मोठी आणि जुनी गैरशासकीय व्यवसाय संस्था
· १९२७ मध्ये स्थापना
· मुख्यालय : नवी दिल्ली
· मिशन: भारतीय उद्योगाची जागतिक स्पर्धात्मकता आणि क्षमता वाढवणे.
www.surne.org
दिलीप पाडगावकर
· ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत दिलीप पाडगावकर यांचे 25 नोवेंबर रोजी पुण्यात निधन झाले.
· पाडगावकर किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू होते.
· अल्प परिचय
· १ मे १९४४ रोजी त्यांचा जन्म झाला.
· त्यांनी वयाच्या २४ वर्षी पत्रकारितेला सुरूवात केली होती.
· आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती.
· पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केली होती.
· पटकथा-दिग्दर्शन पदवीही त्यांनी मिळवली होती.
· ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने त्यांची पॅरिस प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती.
· १९७८ ते १९८६ या कालावधीत त्यांनी युनेस्कोत बँकॉक आणि पॅरिससाठी काम केले होते.
· १९८८ मध्ये त्यांची टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
· २००२ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित केले होते.
www.surne.org
निकी हॅले
· अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी साऊथ कॅरोलिना प्रांताच्या विद्यमान गव्हर्नर निकी हॅले यांची संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत म्हणून निवड केली आहे.
· अमेरिकेच्या प्रशासनात कॅबिनेट दर्जाच्या पदावर नियुक्ती झालेल्या निकी हॅले या पहिल्या भारतीय-अमेरिकन नागरिक ठरल्या आहेत.
कोण आहेत निक्की हॅले?
· त्यांची सध्या साऊथ कॅरोलिना प्रांताची गव्हर्नर म्हणून दुसरी टर्म आहे.
· २०११ मध्ये या प्रांताच्या त्या पहिल्या महिला गव्हर्नर म्हणून निवडून आल्या होत्या.
· बॉबी जिंदाल नंतर अमेरिकेतील एखाद्या राज्याच्या गव्हर्नर असणार्या दुसर्या अमेरिकन-भारतीय व्यक्ति.
www.surne.org
युद्धविर सिंह मल्लिक
· नीती आयोगाचे विशेष सचिव युद्धविर सिंह मल्लिक यांची राष्ट्रीय महामार्ग महामंडळाच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले आहे.
· NHAI
· National Highways Authority of India ही एक शासनाची स्वायत्त संस्था आहे.
· देशातील 70,000 किमी राष्ट्रीय महामार्गाच्या विकास, देखभाल, व्यवस्थापनाची जबाबदारी या संस्थेवर आहे.
· रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाअंतर्गत नोडल संस्था.
· 1988 मध्ये स्थापन झाली असून 1995 मध्ये स्वायत्त दर्जा देण्यात आला.
www.surne.org
फिडेल कॅस्ट्रो
· क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष, क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे २५ नोव्हेंबर २०१६ रोजी हवाना येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
· अमेरिका पुरस्कृत पिग्स उपसागरातील १९६१ चे आक्रमण आणि त्यानंतर वर्षभराने रशियाने क्युबात क्षेपणास्त्र तैनात करण्यावरून निर्माण झालेला पेच या दोन घडामोडींनी कॅस्ट्रो यांची राजवट विशेष गाजली.
v फिडेल कॅस्ट्रो
· १३ ऑगस्ट १९२६ मध्ये त्यांचा जन्म झाला
· बटिस्टा राजवटीविरुद्ध अयशस्वी उठाव त्यांनी केला आणि १९५३ मध्ये त्यांना कैद झाली.
· १९५९ साली चे गव्हेरा यांच्या साथीने कॅस्ट्रो यांनी क्युबातील बॅतिस्ता यांची अमेरिकाधार्जिणी राजवट उलथून टाकली.
· फेब्रुवारी 1959 ते डिसेंबर 1976 पर्यंत फिडेल यांनी क्युबाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडली.
· १९७६ ते २००८ ते क्युबाचे राष्ट्राध्यक्ष झाले.
· फेब्रुवारी 2008 साली त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
· ब्रिटनची रानी एलिझाबेथ आणि थायलंडच्या राजानंतर सर्वाधिक काळ एखाद्या देशाचे प्रमुख असणारे तिसरे व्यक्ति.
· नाम (अलिप्त राष्ट्र चळवळ) परिषदेच्या निमित्ताने १९८३ साली फिडेल कॅस्ट्रो भारतात आले, तेव्हा त्यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले होते.
www.surne.org
आनंद यादव
· ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे २७ नोव्हेंबर २०१६ रोजी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
v आनंद यादव यांचा अल्पपरिचय
· ३० नोव्हेंबर १९३५ रोजी त्यांचा कोल्हापुरातील कागल येथे जन्म झाला.
· आकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली. पुणे विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.
· ८२ व्या अखिल भारतीय साहित्य समेलनाचे अध्यक्ष (२००९)
· ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.
· झोंबी, नांगरणी, घरभिंती, काचवेल अशा चार खंडातील आत्मचरित्रांमधून त्यांनी आपला जीवनसंघर्ष उलगडला होता.
· नटरंग या त्यांच्या कादंबरीवर नटरंग नावाचाच प्रसिद्ध चित्रपट (२०१०) प्रदर्शित होऊन गेला.
· त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रासाठी १९९० मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
· आनंद यादव यांनी संत तुकारामाच्या जीवनावर लिहिलेल्या संतसूर्य तुकाराम या काल्पनिक कादंबरीवर आक्षेप घेत वारकऱ्यांनी त्यांना २००९ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यापासून वंचित केले होते.
· आनंद यादव यांनी सुमारे ४० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
· आनंद यादव यांची साहित्य संपदा :
· काव्यसंग्रह
हिरवे जग (१९६०), मळ्याची माती (१९७८), मायलेकरं (१९८१)
· कथासंग्रह
खळाळ (१९६७), घरजावई (१९७४), माळावरची मैना (१९७६), आदिताल (१९८०), डवरणी (पुस्तक) (१९८२), उखडलेली झाडे (१९८६)
· व्यक्तिचित्रे
मातीखालची माती (१९६५)
· ललित, वैचारिक लेख संग्रह/समीक्षा ग्रंथ
स्पर्शकमळे (१९७८), पाणभवरे (१९८२)
· कादंबरी
गोतावळा (१९७१), नटरंग (पुस्तक) (१९८०), एकलकोंडा (१९८०), माऊली (१९८५), संतसूर्य तुकाराम
· आत्मचरित्रात्मक
झोंबी (१९८७) , घरभिंती (१९९२), काचवेल
· बालकथा
उगवती मने
www.surne.org
कोणत्याही टिप्पण्या नाहीत