नोव्हेंबर 2016 : चर्चेतील व्यक्ती (Part 1)
सुशील चंद्रा
·
केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाच्या (CBDT) अध्यक्षपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
·
राणी नायर यांची जागा ते घेणार आहेत.
·
डिसेंबर 2015 पासून चंद्र हे सीबीडीचे सदस्य होते.
सुशील चंद्रा
|
·
रुरकी महाविद्यालयातुन आयआयटी पदवीधर
·
1980 च्या तुकडीतील भारतीय महसूल सेवेचे अधिकारी
·
यापूर्वी ते प्रत्यक्ष कर मंडळाच्या चौकशी विभागाचे सदस्य होते. (2015 मध्ये नेमणूक)
·
प्राप्तिकर खात्यात मुख्य आयुक्त, अहमदाबादचे प्राप्तिकर महासंचालक, प्राप्तिकर आयुक्त, मुंबईचे प्राप्तिकर संचालक (चौकशी) ही पदे त्यांनी भूषवली आहेत
|
केंद्रीय प्रत्यक्ष कर विभाग
|
·
प्राप्तिकर विभागाची धोरण ठरवणारी नोडल संस्था
·
सेंट्रल बोर्ड ऑफ रिव्हेन्यू कायदा १९६३ अंतर्गत स्थापना
·
रचना - एक अध्यक्ष आणि सहा सदस्य
·
प्रत्यक्ष कर आणि प्राप्तिकर विभागाचे धोरण निर्मिती आणि प्रशासकीय मुद्यासंबंधित जबाबदार संस्था.
|
www.surne.org
बिंदेश्वर
पाठक
·
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांची स्वच्छ रेल्वे मिशनच्या सदिच्छादूत पदी नियुक्ती केली आहे.
·
भारतीय रेल्वेने काही रेल्वे स्थानके स्वच्छ करण्यासाठी सुलभ इंटरनॅशनलशी करार केला आहे.
·
प्रायोगिक तत्वावर सुलभ इंटरनॅशनलने सप्टेंबर २०१६ पासून पाच महत्वाच्या रेल्वे स्थानकाची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे.
·
ती पाच स्थानके : गोरखपूर, जुनी दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, ग्वाल्हेर.
बिंदेश्वर पाठक
·
२ एप्रिल १९४३ रोजी बिहारमधील रामपूर येथे जन्म.
·
समाजसेवक आणि सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक
·
मलनिस्सारण आणि सामाजिक स्वास्थ्य हे त्यांचे कार्यक्षेत्र
·
त्यांच्या कार्याबद्द त्यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.
सुलभ इंटरनॅशनल
ही एक सामाजिक सेवा संस्था असून ती मूलतः सुलभ सौचालय संस्था म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यावरण स्वच्छता, मानवी हक्क, ऊर्जा अपारंपरिक स्रोत, कचरा व्यवस्थापन आणि शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा या क्षेत्रामध्ये ही संस्था कार्य करते.
|
www.surne.org
डॉ. अनिरुद्ध
राजपूत
·
भारतातील सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे ३३
वर्षीय डॉ.
अनिरुद्ध राजपूत यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय विधि
आयोगावर सदस्य म्हणून निवड झाली आहे.
·
आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर सदस्य म्हणून निवड होणारे ते
पहिलेच भारतीय आहेत.
·
या आयोगाच्या ६८
वर्षांच्या इतिहासात वयाच्या ३३ व्या वर्षी निवड होणारे ते सर्वात तरुण सदस्य आहेत.
·
राजपूत हे
आशिया-पॅसिफिक गटातून सर्वाधिक मते
(१६०) मिळवून विजयी झालेत. गुप्त मतदान पद्धतीने ही
निवड करण्यात आली.
·
आफ्रिका,
आशिया-पॅसिफिक, पूर्व युरोप,
लॅटिन अमेरिका आणि पश्चिम युरोप या पाच गटातून ३४ सदस्यांची आयोगावर निवड करण्यात आली.
·
नवनिर्वाचित सदस्यांचा कालावधी पाच वर्षांचा आहे.
·
डॉ. अनिरुद्ध राजपूत यांच्याविषयी
·
पुण्यातील आयएलएस या संस्थेच्या विधि महाविद्यालयातून त्यांनी २००५ मध्ये एलएल.बी.ची पदवी मिळवली.
·
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पोलिटिकल सायन्स या विख्यात संस्थेतून एलएल.एम. ही पदव्युत्तर पदवी मिळविली.
·
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर येथे गुंतवणूकविषयक करारातील लवाद आणि नियमन या विषयात त्यांनी संशोधन करून डॉक्टरेट मिळविली.
·
गेली सहा वर्षे ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करीत आहेत.
·
वकिली करीत असतानाच इंडियन लॉ इन्स्टिटय़ूट येथे दोन वर्षे ते अभ्यागत प्रोफेसर होते.
·
सध्या ते दिल्लीच्या राष्ट्रीय विधि विद्यापीठात विशेष आमंत्रित म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
·
हरयाणा वित्त आयोगाचे सदस्य, विधि आयोगाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ गटाचे सदस्य, २०१२ मध्ये क्रीडा विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचे ते सदस्य असे विविध पदे त्यांनी भूषविली.
·
इंडिया अँड इन्व्हेस्टमेंट ट्रीटी अर्ब्रिटेशन आणि डॉ. आंबेडकर अँड जम्मू अँड कश्मीर ही राजपूत यांची दोन पुस्तके लवकरच प्रकाशित होणार आहेत.
|
·
काय आहे आतंरराष्ट्रीय विधि
आयोग?
आंतरराष्ट्रीय विधि आयोग ही संयुक्त राष्ट्रसंघाची कायदाविषयक सर्वोच्च संस्था आहे. आयोगाचे कामकाज जिनेव्हा येथील मुख्यालयातून चालते. आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या निरंतर विकासाची जबाबदारी विधि आयोगाकडे आहे. आयोगाची स्थापना १९४७ मध्ये झाली.
|
www.surne.org
डोनाल्ड ट्रम्प
·
अमेरिकेच्या बहुचर्चित अध्यक्षीय निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव करुन ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.
·
ट्रम्प हे आता अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष होणार आहेत.
·
अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला 538 प्रातिनिधिक मतांपैकी 270 प्रातिनिधिक मते आवश्यक असतात.
ट्रम्प यांना 289, तर हिलरींना 218
प्रातिनिधिक मते मिळाली.
·
या निवडणुकीत ट्रम्प यांना 59,044, 562 मते (47.5%) मिळाली, तर हिलरींना 59,182,281 मते (47.6 %) मिळाली.
·
त्यांच्या विजयामुळे व्हाइट हाउस मध्ये गेली आठ वर्षे असलेली डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता संपुष्टात येणार आहे.
·
ते पहिल्या टर्म साठी निवडून आलेले सर्वात वयस्कर अध्यक्ष ठरणार आहेत.
·
कोणी कोणती राज्ये जिंकली?
·
ट्रम्प: टेक्सास, फ्लोरिडा, दक्षिण कॅरोलिना, उत्तर कॅरोलिना, जॉर्जिया, अल्बामा, मिसिसिपी, लुइसियाना, कन्सास, ओक्लाहोमा, अर्कान्सस, टेनेसी, इंडियाना, केन्टूकी, पश्चिम व्हर्जिनिया, मिसूरी, ओहिओ, पेन्सिलव्हानिया, विस्कॉन्सिन, लोवा, नेब्रास्का, उटाह, इडाहो, व्योमिंग, दक्षिण डाकोटा, मोन्टाना, उत्तर डाकोटा, मिशिगन, अरिझोना, अलास्का
§ हिलरी: न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन, ओरेगॉन, नेवाडा, कोलोराडो, न्यू मेक्सिको, इलिनोइस, व्हर्जिनिया, न्यूजर्सी, मेरीलॅण्ड, कोलंबिया डिस्ट्रीक्ट, डेलावेअर, कनेक्टिकट, ऱ्होड आइसलॅण्ड, मसाच्युसेट्स, वेरमॉन्ट, मइने, न्यू हॅम्पशायर, मिनेसोटा, हवाई
v कोण आहेत डोनाल्ड ट्रम्प?
·
1946 साली न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प यांचा जन्म झाला. त्यांनी विज्ञानशाखेतून शिक्षण घेतलं.
कॉलेजच्या दिवसांत एक विद्यार्थी नेता म्हणून आपली ओळख बनवली.
·
रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याआधी ट्रम्प रिअल इस्टेटच्या दुनियेतलं सर्वात मोठं नाव मानले जायचे.
·
न्यूयॉर्कच्या क्षितिजावर दिसणाऱ्या गगनचुंबी इमारतींपैक ट्रम्प टॉवर, ट्रम्प प्लेस,
ट्रम्प पार्क, ट्रम्प प्लाझा अशा इमारती डोनाल्ड यांनी उभारल्यात.
·
गेल्या 40 वर्षांत ट्रम्प यांच्या उद्योग साम्राज्याचा पसारा एवढा वाढला,
की ते जवळपास
100 कंपन्यांचे मालक बनले.
v निवडणुकीत भारत
कमला हॅरिस
-
निवडणुकीत भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक कमला हॅरिस यांची सिनेटच्या सदस्यपदी निवड झाली आहे.
-
डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अन्य उमेदवार लोरेटा सॅंचेझ यांचा ३४.८ टक्के मतांनी पराभव केला.
-
हॅरिस यांना एकूण १९,०४,७१४ मते मिळाली.
-
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा व उपाध्यक्ष जो बिडेन यांनी हॅरिस यांना पाठिंबा दर्शविला होता.
-
कॅलिफोर्नियातील राज्याच्या ॲटर्नी जनरलपदी त्या दोन वेळा निवडून आल्या आहेत.
-
सिनेटवर निवडून जाणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला ठरल्या आहेत.
-
हॅरीस ऑकलंडमध्ये जन्मलेल्या असून त्यांची आई चेन्नईहून १९६० मध्ये अमेरिकेत आली होती.
प्रमिला जयपाल
-
भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक प्रमिला जयपाल या वॉशिंग्टन राज्याच्या प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधीगृहात प्रवेश करणार आहेत.
-
या पदापर्यंत प्रथमच पोचलेल्या त्या पहिला भारतीय वंशाच्या महिला आहेत.
-
त्यांचा जन्म चेन्नईत झाला असून, वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांनी भारत सोडला.
-
त्या प्रथम इंडोनेशिया, सिंगापूर व शेवटी अमेरिकेत स्थायिक झाल्या.
-
२५ वर्षांच्या कालावधीनंतर एप्रिल १९९५ मध्ये त्यांनी भारताला भेट दिली होती.
-
‘पिलग्रिमेज टू इंडिया : ए वुमन रिव्हिजिट्स हर होमलॅंड’ हे त्यांचे पुस्तकही २०००मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
राजा कृष्णमूर्ती
-
राजा कृष्णमूर्ती यांनी प्रतिनिधीगृहात प्रवेश मिळवला.
-
डेमोक्रॅटिक पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले ४३ वर्षीय राज हे इलिनॉइसमधून निवडून आले आहेत.
-
एल्मरस्टचे माजी महापौर पीटर डिकीन्नी यांचा त्यांनी पराभव केला आहे.
-
प्रतिनिधीगृहावर निवड झालेले ते दुसरे हिंदू-अमेरिकन ठरले आहेत.
-
त्यांचा जन्म नवी दिल्लीत झाला असून, मूळ गाव चेन्नई आहे.
-
दुसऱ्या प्रयत्नांत त्यांना हे यश मिळाले आहे.
-
सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य सेवा या क्षेत्रात त्यांचे विशेष काम आहे.
-
ओबामांचे ते सल्लागार होते.
रो
खन्ना
-
कॅलिफोर्निया मधील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार रो खन्ना यांनी माइक होंडा यांच्यावर १९ टक्के मतांनी विजय मिळवला.
-
येल विद्यापीठाचे पदवीधर असलेले ४० वर्षीय खन्ना हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये प्रतिनिधित्व करतील.
-
व्यवसायाने प्राध्यापक, विधिज्ञ असलेले खन्ना ओबामांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या व्यापार विभागात उप सहसचिव पदावर कार्यरत होते.
v कशी होते अमेरिकेची निवडणूक?
·
अमेरिकन निवडणूक प्रक्रिया ही अप्रत्यक्षात भारतीय प्रंतप्रधानांच्या निवडणूक प्रक्रियेसारखी असली तरी ती बरीचशी वेगळी आहे.
·
दर चार वर्षांनी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतर येणा-या मंगळवारी अमेरिकी अध्यक्षपदासाठी मतदान होते.
·
अमेरिकन मतदार एलेक्टोरल कॉलेजच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातून "इलेक्टोर" ची निवड करतात आणि इलेक्टोर राष्ट्राध्यक्षांची निवड करतात.
·
इलेक्टोरल कॉलेज:
-
एका राज्यातील एकूण इलेक्टर्स हे त्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असतात.
-
प्रत्येक राज्यातील इलेक्टर्सची संख्या ही त्या राज्यातून अमेरिकेच्या संसदेत निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या संख्येएवढी असते.
-
अशा प्रतिनिधींची सभा म्हणजेच इलेक्टोरल कॉलेज.
·
अमेरिकेतील 50 पैकी 48 राज्यांतील नियमांनुसार त्या राज्यात सर्वाधिक मतं मिळवणाऱ्या पक्षालाच राज्यातील सर्व इलेक्टर्सचा पाठिंबा मिळतो.
·
अमेरिकेतील सर्व राज्य आणि राजधानीचा डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया धरून एकूण 538 इलेक्टर्स आहेत. त्यापैकी 270 जणांचा पाठिंबा मिळवणारा उमेदवार राष्ट्राध्यक्षपदी निवडला जातो.
·
राष्ट्राध्यक्षांची निवड करण्याव्यतिरिक्त इतर कुठल्याची राजकीय कारभारात या इलेक्टोरचा सहभाग नसतो.
·
विनर टेक्स ऑलचा (winner takes all) नियम:
-
अमेरिकेत राज्यांच्या अधिकाराला असाधारण महत्त्व आहे.
-
केंद्रीय निवडणूक आयोग नसलेल्या अमेरिकेत राज्यांच्या माध्यमातून अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येते.
-
जो उमेदवार राज्यातील अर्ध्यापेक्षा अधिक एलेक्टोर्सचा विश्वास जिंकण्यात यशस्वी होतो त्याच्या पारड्यात त्या राज्यातील शंभर टक्के एलेक्टोर्स टाकण्यात येतात.
-
यालाच विनर टेक्स ऑलचा (winner takes all) नियम म्हणतात.
·
दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली, तर त्यातून एकाची निवड करण्याचा अधिकार अमेरिकेची संसद म्हणजे काँग्रेसकडे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत