• New

    डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी नीती आयोगाकडून दोन योजनांचा प्रारंभ


    >> डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी नीती आयोगाने भाग्यवान ग्राहक योजना आणि डिजी-धन-व्यापारी योजना जाहीर केल्या आहेत.
    >> याद्वारे वैयक्तिक खर्चासाठी डिजीटल पेमेंट करणाऱ्या ग्राहक आणि व्यापाऱ्याला बक्षीस दिलं जाणार आहे.
    >> डिजीटल व्यवहाराच्या क्षेत्रात गरीब, मध्यमवर्ग आणि लहान व्यापाऱ्यांना आणण्याच्या दृष्टीने या योजना आखण्यात आल्या आहेत.
    >> नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामार्फत या योजनांची अंमलबजावणी होणार आहे.
    >> रोकडरहित व्यवहार करून व्यवहारातली पारदर्शकता वाढवण्याबरोबरच काळ्या पैशाला आळा घालण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारनंही काही प्रोत्साहनपर सवलती काही दिवसांपूर्वी जाहीर केल्या आहेत.
    # भाग्यवान ग्राहक योजना
    >> या योजनेअंतर्गत डिजिटल माध्यमातून पेमेंट करणार्‍या व्यक्तिला दर दिवशी किमान १००० रुपये तर आठवड्याला १ लाख रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.
    >> २५ डिसेंबर २०१६ च्या पहिल्या सोडतीद्वारे योजना कार्यान्वित होणार असून १४ एप्रिल २०१७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी महासोडत काढण्यात येणार आहे.
    >> १५,००० विजेत्यांना प्रतेकी दररोज १००० रुपये कॅशबॅक बक्षिसे प्राप्त होणार आहेत
    >> योजनेच्या शेवटच्या दिवशी मेगा परितोषिक विजेता घोषित करण्यात येणार असून त्याला १ कोटी रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे.
    # डिजी-धन-व्यापारी योजना
    >> ही योजना देशभरातील व्यापारी वर्गासाठी आहे.
    >> व्यापर्‍यांना कॅशलेस व्यवहारांसाठी पीओएस(पॉईंट ऑफ सेल) मशीन अनिवार्य करण्यात आले आहे.
    >> या अंतर्गत व्यापारी जर  पीओएस च्या माध्यमातून व्यवसाय करत असेल तर त्याला दर आठवड्याला २५ डिसेंबर २०१६ ते १४ एप्रिल २०१७ पर्यंत  ५०,००० रुपयाचे बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे.
    >> शेवटच्या दिवशी ५० लाख, २५ लाख आणि १२ लाख रुपयाचे तीन मेगा पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad