• New

    बेरोजगारीचे प्रकार


    * अदृश्य /छुपी/ प्रच्छन्न/ बेरोजगारी : 
    • आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात, त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतली असल्यास या जास्तीच्या व्यक्ती अदृश्य बेरोजगार आहेत असे म्हटले जाते. 
    • उदा. शेतावरील एक काम दोन व्यक्तीदेखील पूर्ण करू शकतात, मात्र त्या ठिकाणी कुटुंबातील पाच व्यक्ती काम करीत असतील तर उरलेल्या तीन व्यक्ती अदृश्य बेरोजगारीत मोडतात. 
    • या तीन व्यक्तींचे काम उत्पादक स्वरूपात नसते, म्हणून त्यांची सीमान्त उत्पादकता शून्य असते. कारण अशा व्यक्तींना कामावरून दूर केले तरी उत्पादनाच्या पातळीत काही फरक पडत नाही.
    * कमी प्रतीची बेरोजगारी : 
    • ज्या वेळी एखाद्या व्यक्तीस आपल्या क्षमतेपेक्षा कमी प्रतीच्या रोजगारावर समाधान मानावे लागत असेल त्या वेळी या बेरोजगारीस ‘कमी प्रतीची बेरोजगारी’ असे म्हणतात. 
    • उदा. एखाद्या इंजिनीअरने क्लर्कची नोकरी करणे.
    * सुशिक्षित बेरोजगारी : 
    • जेव्हा सुशिक्षित लोकांना रोजगार मिळत नाही किंवा सुशिक्षित कमी प्रतीच्या बेरोजगारीला बळी पडतात, तेव्हा त्याला ‘सुशिक्षित बेरोजगारी’ असे म्हणतात.
    * खुली बेरोजगारी :  
    • काम करण्याची इच्छा व क्षमता असून नियमित उत्त्पन्न देणारा रोजगार प्राप्त न झाल्यास या प्रकारच्या बेरोजगारीस ‘खुली बेरोजगारी’ म्हणतात. 
    • उदा. ग्रामीण भागातील स्वत:च्या मालकीची शेतजमीन नसलेले अकुशल कामगार किंवा रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहरी भागाकडे आलेले बेरोजगार.
    * हंगामी बेरोजगारी : 
    • ठराविक हंगाम सोडून जेव्हा काम मिळणे कठीण होते तेव्हा त्यास ‘हंगामी बेरोजगारी’ म्हणतात. 
    • उदा. शेतीचे काम करणाऱ्यांना नांगरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी सोडून वर्षांच्या इतर काळात भासणारी बेरोजगारी.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad