• New

    योजना खर्च आणि योजनाबाह्य खर्च म्हणजे काय?

    सन १९८७-८८ च्या अर्थसंकल्पापासून एकूण सरासरी खर्चाचा योजना खर्च व योजनाबाह्यखर्च अशा नवीन भागात विभागणी करण्यात आली. 

    योजना खर्च किंवा नियोजित खर्च:-

    • सरकारी योजनांवर होणाऱ्या खर्चाला नियोजित खर्च किंवा योजना खर्च असे म्हणतात.
    • या खर्चाची परत महसुली योजना खर्च व भांडवली योजना खर्च अशी विभागणी केली जाते. 
    • नियोजित खर्चात केंद्रीय योजनांवरील खर्च म्हणजे, शेती, ग्रामीण विकास, पाटबंधारे, पूरनियोजन, ऊर्जा, उद्योग, खाण, दळणवळण, माहितीतंत्रज्ञान, पर्यावरण समाजोपयोगी सेवा या संबंधीच्या योजनांचा खर्च येतो.
    • त्याचप्रमाणे राज्य व केंद्रशासित प्रदेशांना दिलेली केंद्रीय मदतदेखील धरली जाते.

    योजनाबाह्य खर्च किंवा अनियोजित खर्च :-

    • योजनाबाह्यखर्चामध्ये पुन्हा महसुली खर्च आणि भांडवली खर्च अशी पोटविभागणी करण्यात आली. 
    • योजनाबाह्य महसूल खर्चात व्याजाचे देणे, संरक्षण खर्च, शिक्षण, आरोग्य, वीज, दळणवळण खर्च, राज्यांना अनुदान आदी खर्च येतात, तर नियोजन व्यतिरिक्त अन्य भांडवली खर्चात संरक्षण खर्च, सार्वजनिक उद्योगांना कर्जे, राज्यांना व परदेशांना देण्यात येणारी कर्जे आदी खर्च येतात. 
    • अशा नियोजना शिवायच्या खर्चात सातत्याने वाढ होत असेल, तर तो चिंतेचा विषय ठरतो.


    टीप : नुकतेच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी योजना खर्च आणि योजना बाह्य खर्च हि विभागणी येणाऱ्या अर्थसंकल्पापासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad