• New

    राज्यसभेत विकलांग जन अधिकार विधेयक मंजूर



    • १४ डिसेंबर २०१६ रोजी राज्यसभेत विकलांग जन अधिकार विधेयक मंजूर करण्यात आले आहे.  
    • १९९५ च्या विकलांगता कायद्यात १२० दुरुस्त्या सुचविणाऱ्या या विधेयकाद्वारे विकलांग व्यक्तींसाठीचे आरक्षण तीन टक्क्यांऐवजी चार टक्के करण्यात आले आहे.  
    • हिवाळी अधिवेशनात राज्यसभेने मंजूर केलेले हे पहिलेच विधेयक ठरले.  
    • या विधेयकाद्वारे विकलांगतेच्या व्याख्येची व्याप्ती वाढविण्यात आली असून पूर्वीच्या कायद्यातील ७ ऐवजी आता विकलांगांच्या २१ श्रेण्या करण्यात आल्या आहेत. त्यात अॅसिड हल्लापीडित आणि पार्किन्सन्स रुग्णांचा समावेश करण्यात आला आहे.


    काय आहे विधेयकात?

    1.  या विधेयकानुसार विकलांगांसोबत भेदभाव केल्यास सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १० हजार ते पाच लाखांच्या दंडाची तरतूद आहे. 
    2. ४० टक्के विकलांगता असलेल्या व्यक्तीला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण तसेच सरकारी योजनांमध्ये प्राधान्य दिले जाईल.  
    3. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात विकलांग व्यक्तींची संख्या २.२१ टक्के असून, त्यात १८.९ टक्के कर्णबधीर, तर १८.८ टक्के दृष्टीहीनांचा समावेश आहे. 
    4. सहा ते १८ वर्षांदरम्यानच्या विकलांग मुलांना शेजारच्या किंवा विशेष शाळेत मोफत शिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.  
    5. सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये पाच टक्के जागा त्यासाठी राखीव असतील.  
    6. सरकारी प्रतिष्ठानांमध्ये नोकरीत पाच टक्के आरक्षण असेल.  
    7. विकलांग व्यक्तींना खासगी क्षेत्रात किमान पाच टक्के आरक्षण मिळावे म्हणून केंद्र आणि स्थानिक सरकार प्रोत्साहन देईल.  
    8. विकलांगतेची व्याख्या करण्यासाठी एक वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यात येईल, असे गहलोत यांनी सांगितले.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad