• New

    आधार कार्डावरील माहितीच्या आधारे चालणारे देशातील पहिले एटीएम DCB बँकेने सुरू केले


    ➡ डीसीबी बँकेने आधार कार्डाव्दारे एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा सुरु केली आहे
    ➡ यामध्ये ग्राहक पिन क्रमांकाऐवजी बायोमेट्रीक डिटेल म्हणजेच शारीरीक चिन्हांचा उपयोग करुन आपल्या एटीएम कार्डाचा उपयोग करु शकतो.
    अशी सुविधा सुरु करणारी डीसीबी देशातील पहिली बँक ठरली आहे.

    ➡ व्यवहार सुरु करण्यापूर्वी  ग्राहकाने पिनऐवजी बारा अंकी आधार क्रमांक टाकावा किंवा कार्ड स्वाईप करावे. याप्रक्रियेमध्ये तुम्ही देत असलेली माहिती खरी आहे हे तपासण्यासाठी तुमच्या बोटांचे ठसे एटीएममशीनच्या स्कॅनरवर स्कॅन होतील.

    ➡ सध्या फक्त डीसीबी बँकेच्या कर्मचा-यांसाठी ही सुविधा आहे.
    ➡ बँकेचे ४०० एटीएम नेटवर्कचे जाळे आहे. सर्व एटीएम्सना या सुविधेने जोडण्याचे लक्ष्य बँकेने ठेवले आहे.

    # DCB Bank
    ➡ स्थापना: 1930
    ➡ ईस्मालिया सहकारी बँक आणि मसालवाला सहकारी बँक यांच्या एकत्रीकरणातुन स्थापना
    ➡ मुख्यालय: मुंबई

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad