• New

    पोलिओची नवीन लस


    ➡ देशात असलेल्या पोलिओ रुग्णांमध्ये पी १ आणि पी ३ विषाणूबाधित रुग्ण आहेत. तथापि, पी २ विषाणूबाधित रुग्ण देशात नाहीत. त्यामुळे येत्या २५ एप्रिलपासून पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमात बदल करण्यात येणार आहे.
    ➡ पोलिओसाठी देण्यात येणाऱ्या लसीमध्ये तीन विषाणूंऐवजी पी १ आणि पी ३ या दोन विषाणूंसाठी लस तयार केली आहे.
    ➡ पोलिओ हा आजार पी १, पी २ आणि पी ३ या तीन विषाणूंमुळे होतो.
    ➡ तीन वर्षांत देशात एकही पोलिओचा नवीन रुग्ण न आढळल्याने जागतिक आरोग्य संघटनेने देशाला ‘पोलिओमुक्त’ घोषित केले.
    ➡ सध्या देशात पोलिओच्या रुग्णांमध्ये पी १ विषाणूबाधित रुग्णांची संख्या अधिक असून पी ३ विषाणूबाधित रुग्णदेखील आहेत.
    ➡ आता पी २ विषाणूमुळे पोलिओ होण्याचा धोका राहिलेला नाही.
    ➡ याआधी ३ लसी एकत्र करून दिल्या जात होत्या. आता २ लसी एकत्र करून दिल्या जाणार आहेत.
    ➡ आता ‘बायव्हॅलिड ओरल पोलिओ व्हॅक्सिन’ देण्यात येणार आहे.
    ➡ बाळ जन्मल्यावर सहाव्या, दहाव्या आणि सोळाव्या आठवड्यात लसीकरण केले जाते
    ➡ यापुढे सोळाव्या आठवड्यात लस देताना पोलिओची नवी लस टोचली जाणार आहे
    ➡ जगभरात एप्रिल २०१६मध्ये हा बदल होणार असून देशात २५ एप्रिलला हा बदल होईल.
    ➡ या दिवसापासून पोलिओसाठीचा तीन लसींचा वापर पूर्णपणे बंद केला जाणार असून नवीन लस दिली जाणार आहे.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad