सिगारेट कंपन्यांनी उत्पादन थांबवले
➡ सिगारेटच्या पाकिटांवरील वैधानिक इशारा दर्शनी भागाच्या ८५ टक्के करण्याच्या सरकारी अधिसूचनेचा निषेध करण्यासाठी देशातील प्रमुख सिगारेट कंपन्यांनी 1 एप्रिल 2016 पासुन उत्पादन थांबवले.
➡ यामुळे दररोज सुमारे ३५० कोटी रुपयांचा फटका बसेल, असा दावा या कंपन्यांनी केला आहे.
➡ सिगारेटच्या पाकिटांवरील वैधानिक इशाऱ्याबाबतची केंद्र सरकारची अधिसूचना 1 एप्रिल पासुन अंमलात आली.
➡ सिगारेटसह तंबाखूजन्य पदार्थांच्या वेष्टणाच्या दर्शनी भागात तंबाखूच्या दुष्परिणामांचा इशारा किती प्रमाणात असावा, यासाठी सरकारने एक संसदीय समिती नेमली होती.
➡ तंबाखू उत्पादन पाकिटांच्या दर्शनी भागाच्या ५० टक्के हा वैधानिक इशारा असावा, अशी शिफारस या समितीने केली होती.
➡ मात्र सरकारने पुढचे पाऊल टाकत हा इशारा दर्शनी भागाच्या ८५ टक्के असावा, असा निर्णय घेत गेल्या वर्षी २४ सप्टेंबरला त्याबाबत अधिसूचनाही काढली.
➡ या निर्णयाचा निषेध करत आयटीसी, गॉडफ्रे फिलिप्स आणि व्हीएसटी या प्रमुख सिगारेट उत्पादक कंपन्यांनी उत्पादन थांबवले.
➡ या कंपन्या टोबॅको इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सदस्य असून एकूण सिगारेट विक्रीत त्यांचा वाटा ९८ टक्के आहे.
➡ टीआयआयच्या म्हणण्यानुसार सध्या अस्तित्वात असलेला ४०% जागेवर सचित्र धोक्याची सूचना देण्याचा नियम पुरेसा आहे.
#धुम्रपान आणि आरोग्य :
- सिगारेटमध्ये तंबाखू, निकोटिन यासह विविध शरिरघातक रसायने असतात.
- सिगारेट मध्ये जवळजवळ 32 वेगवेगळी अपायकारक रसायने असतात.
- एक सिगारेट मनुष्याच्या जीवनातील 8 मिनिटे कमी करतो.
- धुम्रपानाचा सर्वात जास्त परिणाम आपल्या फुप्फुसांवर होतो.
- धुम्रपान करणाऱ्या व्यक्तिंना फुप्फुसाचा कर्करोग (Lung cancer) होण्याची अधिक शक्यता असते.
- धुम्रपान हे फुप्फुस कँसरचे 90 % कारण असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत