मोदींकडून सौदीच्या राजांना मशिदीची प्रतिकृती भेट
- सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी सौदीचे सुलतान सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद यांना केरळच्या चेरामन जुमा मशिदीची सोन्याचा मुलामा दिलेली प्रतिकृती भेट म्हणून दिली.
मशीदीबद्दल
- अरब व्यापाऱ्यांनी भारतात बांधलेली ही सर्वात जुनी मशिद आहे.
- चेरामन जुमा मशिद ही भारत आणि अरब यांच्यातील व्यापारी संबंधांचे प्रतीक आहे.
- त्रिशूर जिल्ह्यात असलेली ही मशिद सौदीतून भारतात आलेल्या व्यापाऱ्यांनी इ. स. ६२९मध्ये बांधली होती.
- केरळमधील 'चेरा' राजा चेरामन पेरुमल यानं मक्केत पैगंबर यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यानं इस्लाम धर्म स्वीकारला. या ऐतिहासिक घटनेनंतर राजाच्या पत्राद्वारे आलेल्या लेखी आदेशानुसार स्थानिक प्रशासनाने अरब व्यापाऱ्यांना मशिद बांधण्यासाठी आवश्यक ती मदत दिली होती.
- या मशिदीचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे हजारो वर्षांपासून एक ज्योत तेवत आहे. ही ज्योत सतत तेवत राहावी यासाठी मशिद प्रशासन तेलाची व्यवस्था करते.
मोदी हे चौथे भारतीय पंतप्रधान
- सौदी अरेबियाचा दौरा करणारे नरेंद्र मोदी हे चौथे भारतीय पंतप्रधान आहेत.
- २०१० मध्ये मनमोहन सिंह
- १९८२ मध्ये इंदिरा गांधी
- १९५६ मध्ये जवाहरलाल नेहरू
 
 
 
 

कोणत्याही टिप्पण्या नाहीत