पहिला द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर...
- रिझर्व्ह बँकेने नव्या आर्थिक वर्षातील पहिला द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला आहे.
- रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची (0.25%) टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
- या निर्णयानंतर त्यामुळे रेपो रेट 6.75 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांवर आला.
- कॅश रिझर्व्ह रेशो (रोख राखीव प्रमाण) कोणताही बदल करण्यात आला नसून तो ४ टक्क्यांवर कायम आहे.
काय असतो रेपो रेट ?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं.म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना.. रिझर्व बँकही वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्या कर्जासाठी जो व्याजदर दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत