• New

    गतिमान एक्सप्रेसला हिरवा कंदिल...


    • दिल्ली ते आग्रादरम्यान चालणा-या या गाडीला सुरेश प्रभू यांनी हजरत निजामुद्दीन स्टेशनवर हिरवा झेंडा दाखवल्यावर ही गाडी रवाना झाली.
    • गतिमान एक्सप्रेस ही देशातील पहिली सेमी हाय-स्पीड ट्रेन असून ती दिल्ली-आग्रा मार्गावर १६० कि.मी. प्रतितास वेगाने धावणार असून २०० किमीचे अंतर ही एक्सप्रेस ११० मिनिटात पार करेल.


    काय आहेत ट्रेनची वैशिष्ट्ये?
    - ही देशातील पहिली अशी ट्रेन आहे ज्यामध्ये विमानातील हवाई सुंदरीप्रमाणे ट्रेन सुंदरी असतील.
    - प्रवाशांना विमानात जशा उच्च दर्जाच्या सुविधा मिळतात तशाच खानपानापासून सर्व सुविधा या ट्रेनमध्ये देण्याचा प्रयत्न आहे.
    - या ट्रेनच्या तिकीटासाठी शताब्दी एक्सप्रेसपेक्षा २५ टक्के जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. या ट्रेनमधील सुंदरी फूल देऊन प्रवाशाचे स्वागत करणार आहेत.
    - या ट्रेनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. संपूर्णपणे वातानुकूलित असलेल्या या ट्रेनमध्ये चेअर कारसाठी ६९० रुपयाचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. एक्झिक्युटीव्ह क्लासमधून प्रवास करण्यासाठी १३६५ रुपये मोजावे लागतील.
    - दिल्ली-आग्रा मार्गावर धावणा-या शताब्दी एक्सप्रेसचे चेअर कारचे शुल्क ५४० आणि एक्झिक्युटीव्ह क्लासचे शुल्क १०४० रुपये आहे.

    

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad