मध्यप्रदेशात जगातील पहिले 'व्हाईट टायगर सफारी' पार्क.....
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 'व्हाईट टायगर सफारी' पार्कचे उदघाटन केले. सत्ना जिल्ह्यातील मुकूंदपूरमध्ये हे व्हाईट टायगर सफारी पार्क उभारण्यात आले आहे. फक्त सफेद वाघांसाठी सुरु करण्यात आलेले जगातील हे असे पहिले पार्क आहे. येथील विंध्य भागामध्ये १०० वर्षापूर्वी पहिला वाघ आढळला होता. या पार्कच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपये खर्च आला असून, २५ हेक्टर परिसरामध्ये हे पार्क पसरले आहे. या पार्कसाठी ५० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत