वाघांच्या संख्येत १०० वर्षांत प्रथमच वाढ
- जगभरातील जंगलांमध्ये असलेल्या वाघांच्या संख्येत गेल्या शंभरहून अधिक वर्षांत प्रथमच वाढ झाली आहे.
- त्यातील निम्मे वाघ भारतामध्ये आहेत.
- विविध देशांची सरकारी व व्याघ्र संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांनी केलेल्या ताज्या व्याघ्रगणनेत भारतीय उपखंडाखेरीज रशियापासून व्हिएतनामपर्यंतच्या देशांंमध्ये एकूण ३,८९० जंगली वाघ असल्याचे आढळून आले आहे.
- जागतिक वन्यजीव निधी (WWF) व ‘ग्लोबल टायगर फोरम’ यांनी 11एप्रिल रोजी ही आकडेवारी जारी केली.
- ही आकडेवारी ताज्या म्हणजे २०१४च्या आंतरराष्ट्रीय व्याघ्रगणनेवर आधारित आहे.
- शंभर वर्षांपूर्वी जगात १ लाख वाघ होते. वाघांची संख्या सन २०१० मध्ये ३,२०० या सार्वकालिक निचांकावर पोहोचली होती.तर आता ३८९० आहे.
- ३८० कोटींचा निधी भारत सरकारने ‘प्रॉजेक्ट टायगर’साठी आजवरची सर्वाधिक म्हणजे ३८० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- ‘टायगर रेंज’मधील भारत, नेपाळ, रशिया व भुतान यासारख्या देशांमध्ये वाघांची संख्या वाढली असली तरी वाघ हा अजूनही विलुप्ततेच्या धोक्यातच आहे.
- देशनिहाय गणती:
- बांगलादेश -१०६
- भूतान -१०३
- चीन -सातहून अधिक
- भारत -२,२२६
- इंडोनेशिया - ३७१
- लाओस -०२
- मलेशिया -२५०
- नेपाळ -१९८
- रशिया -४३३
- थायलंड -१८९
- व्हिएतनाम -पाचहून कमी
व्याघ्रसंवर्धनाबाबत तिसरी आशिया आंतरमंत्री परिषद
- 12 एप्रिल रोजी दिल्ली येथे होणार आहे
- व्याघ्र संवर्धन मोहिमेत सहभागी असलेल्या १३ आशियाई देशांच्या तिसऱ्या परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.
- त्यात वाघांचे अस्तित्व असलेले देश शिकारविरोधी उपाययोजनांवर चर्चा करतील.
- या तीन दिवसीय परिषदेत ७०० पेक्षा अधिक तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि या क्षेत्राशी संबंधित जाणकार सहभागी होत आहेत.
- ग्लोबल टायगर इनिशिएटिव्हअंतर्गत पहिली आंतरमंत्री परिषद २०१०मध्ये रशियात झाली होती, त्यात २०२२पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.
- वाघांचे अस्तित्व असलेल्या देशभरातील १७ राज्यांतील ४५ व्याघ्र प्रकल्पांतील कोअर, बफर व नियमित जंगलांमध्ये उद्या, १६ जानेवारीपासून व्याघ्र गणनेला सुरुवात झाली आहे.
- ट्राझीट लाईन व कॅमेरा ट्रॅपिंग पध्दतीने ही गणना केली जाणार असून राज्यातील ताडोबा, मेळघाट, पेंच, सहय़ाद्री व नवेगाव प्रकल्पांत व्याघ्र गणनेची तयारी पूर्ण झाली आहे.
- देशभरातील ४२ व्याघ्र प्रकल्पांत दर चार वषार्ंनी वाघांची गणना केली जाते. या वर्षी मध्य प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांत प्रत्येकी एका व्याघ्र प्रकल्पाची भर पडल्याने यावर्षी ४५ व्याघ्र प्रकल्पांत ही गणना केली जात आहे.
- यावर्षी प्रथमच गोवा व नागालॅंड येथेसुध्दा व्याघ्र गणना होणार आहे.
- २०१० मध्ये व्याघ्र गणना झाल्यानंतर आता २०१४ मध्ये ही गणना केली आहे.
- राज्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, मेळघाट, सहय़ाद्री, नागझिरा, पेंच या पाच व्याघ्र प्रकल्पांसह गडचिरोली, धुळे, चंद्रपूर, मेळघाट, वर्धा, तसेच पश्चिम, उत्तर महराष्ट्रासह राज्यातील ५ हजार ५०० बिटांतर्गत ही गणना केली जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत