‘मेक इन इंडिया’अंतर्गत 'एफ १६’ची निर्मिती
- एफ १६' आणि 'एफ ए १८ सुपर हॉर्नेट' या अतिशय प्रगत लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या बोइंग आणि लॉकहीड मार्टिन या अमेरिकी कंपन्यांनी या विमानांचे उत्पादन 'मेक इन इंडिया' अंतर्गत करण्याची तयारी दर्शवली आहे. तसा संयुक्त प्रस्तावही या कंपन्यांनी केंद्र सरकारकडे पाठवला आहे.
- दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी भारतीय हवाईदलाची गरज पाहता 'एफ १६' (सुपर व्हायपर) आणि 'एफ ए १८'(सुपर हॉर्नेट) या लढाऊ विमानांचे देशातच उत्पादन करण्याविषयी विचारणा केली आहे.
'एफ ए १८'ची वैशिष्ट्ये :
लॉकहीड मार्टिनच्या अतिशय प्रगत 'एफ ए १८' या लढाऊ विमानामध्ये दोन इंजिनांचा समावेश असून, 'एफ १६'मध्ये मात्र एकच इंजिन आहे. या पार्श्वभूमीवर बोइंगनेही नव्या पिढीतील विमानांच्या भारतातील निर्मितीची ऑफर देऊ केली आहे. हवाईदलाव्यतिरिक्त नौदलातही 'एफ ए १८' विमानांची स्वॉड्रन दाखल होण्याची शक्यता आहे. एकाचवेळी अनेक प्रकारची भूमिका पार पाडण्याची शक्यता असणारी ही विमाने आमच्यासाठी खूपच उपयोगी असल्याचे नौदलाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत