सचिनच्या आत्मचरित्राची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद
- 'प्लेइंग इट माय वे हे' सचिनचे आत्मचरित्र प्री-बुकिंग नोंदणी, प्रकाशनाच्या पहिल्या दिवशीची विक्री आणि एकूण विक्री अशा तिनही वर्गवारीत सर्वाधिक खप झालेले पुस्तक ठरले आहे.
- फिक्शन आणि नॉन-फिक्शन वर्गवारीतील सर्वाधिक विक्रीचे पुस्तक ठरले आहे.
- ‘हॅचे इंडिया’ने ६ नोव्हेंबर २०१४ साली सचिनचे ‘प्लेइंग इट माय वे’ हे आत्मचरित्र प्रकाशित केले होते.
- त्याच्या आजवर १,५०,२८९ प्रत विकल्या गेल्या आहेत. या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे.
- याशिवाय, डॅन ब्राऊन यांच्या ‘इनफर्नो’, वॉल्टर आयसेक्सन यांचे ‘स्टीव्ह जॉब्स’ आणि जे.के.रौलिंग्स याचे ‘कॅज्युअल व्हॅकेन्सी’ या पुस्तकांनीही सचिनच्या ‘प्लेइंग इट माय वे’ने मागे टाकले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत