• New

    तिसरे लायगो उपकरण भारतात बसवण्यास तत्त्वत: मान्यता



    •   गुरूत्वीय लहरींच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता या लहरी शोधण्यासाठीचे तिसरे लायगो उपकरण भारतात बसवण्यास केंद्र सरकारने  तत्त्वत: मान्यता दिली. 
    •  या लायगो म्हणजे लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी प्रकल्पात दोन यंत्रे सध्या अमेरिकेत लिव्हिंगस्टोन व हॅनवर्ड येथे आहेत. 
    • तिसरे लायगो उपकरण भारतात बसवण्याचा प्रस्ताव होता. 
    • भारतात हे उपकरण बसवण्यासाठी म्हणजेच लायगो प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्था व मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्था तंत्रज्ञानाची मदत करणार आहेत.
    • अणुऊर्जा व विज्ञान-तंत्रज्ञान विभाग यांच्या अखत्यारीत हा प्रकल्प आहे. अलिकडे गुरूत्वीय लहरी शोधण्याच्या अमेरिकी नेतृत्वाखालील प्रकल्पात भारतीय वैज्ञानिकांनी मोठी कामगिरी केली होती. 
    •  अंदाजे एक हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. प्रकल्प पूर्ण होण्यास किमान ७-८ वर्षे लागतील.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad