जलतज्ज्ञ मुकुंद धाराशिवकर यांचे निधन
- ज्येष्ठ जलतज्ज्ञ, पांझरा बारमाही प्रकल्पाचे तज्ज्ञ सल्लागार तथा लेखक, विज्ञान प्रचारक अशी चतुरस्त्र ओळख असलेले मुकुंद धाराशिवकर (७०) यांचे निधन झाले.
- पुढच्याच दिवशी धाराशिवकर यांनी लिहिलेल्या ‘अभिजीत अफलातून सागराच्या पोटातून’ या विज्ञान कादंबरीचे प्रकाशन होणार होते.
- धाराशिवकर हे स्थापत्य अभियंता होते.
- अभियांत्रिकी क्षेत्रात सल्लागार म्हणून ३८ वर्षे काम केल्यावर स्वेच्छानिवृत्ती स्वीकारत विज्ञानाचा प्रसार, प्रचार आणि पाणी प्रश्नाबाबत अभ्यास केला.
- भारतीय जलसंस्कृती मंडळ या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचे उपाध्यक्षपद त्यांनी सांभाळले.
- राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे ते महाराष्ट्र विभागाचे कार्यकारिणी सदस्य राहिले.
- विज्ञान प्रयोगिका तसेच विज्ञान संग्रहालय त्यांनी धुळ्यात स्थापन केले.
- बालवाडमय ते अभियांत्रिकी संशोधनापर्यंत विविध विषयांवर त्यांनी लेखन केले.
- त्यांच्या नावावार तीन कादंबऱ्या आहेत.‘पाणी पाणी तुमचे आमचे’ या ग्रंथाबद्दल त्यांना राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख पर्यावरण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
- विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक जबाबदाऱ्या लिलया सांभाळणाऱ्या धाराशिवकर यांनी शासनाच्या मदतीसाठी पांझरा बारमाही प्रकल्पाचे मानद तांत्रिक सल्लागार म्हणून देखील काम पाहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत