• New

    डॉ. खडसेंना साहित्य अकादमी पुरस्कार

    ●> प्रसिद्ध साहित्यिक डॉ. दामोदर खडसे यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
    ●> त्यांनी सदानंद देशमुख यांच्या 'बारोमास' या कादंबरीचा हिंदी अनुवाद केला आहे.
    ●> अकादमीने एकूण २३ भाषांतील अनुवादासाठीचे पुरस्कार जाहीर केले आहेत.
    ●> मराठीत अनुवादासाठीचा पुरस्कार नंतर जाहीर केला जाणार आहे.
    ●>  डॉ. खडसे यांनी आतापर्यंत २० मराठी पुस्तकांचे हिंदी अनुवाद केले असून, त्यात दया पवार, शिवाजी सावंत, जयवंत दळवी, भारत सासणे, राम नगरकर, शरणकुमार लिंबाळे आदी साहित्यिकांच्या पुस्तकांचा समावेश आहे.
    ●>  पुरस्कारप्राप्त कादंबरी अकादमीनेच प्रकाशित केली आहे. 
    ●> त्यांच्या मूळ हिंदी कादंबरी 'कालासूरज'ला राष्ट्रपतींतर्फे 'राष्ट्रीय साहित्य पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे.

    साहित्य अकादमी पुरस्कार
    साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या विविध भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होते. पन्नास हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad