ग्रीन डिझेल'वर बोईंगच्या विमानाची भरारी
- बोईंग कंपनीच्या विमानाने आज जैवइंधन "ग्रीन डिझेल'चा वापर करत अवकाशात यशस्वी झेप घेतली.
-जगातील ही पहिलीच चाचणी.
-विविध प्रकारच्या भाज्या, स्वयंपाकानंतर शिल्लक राहिलेले तेल आणि प्राण्यांची चरबी यापासून हे डिझेल तयार करण्यात आले होते.
-बोईंगने तिच्या "इकोडेमॉनस्ट्रेटर-787' या चाचणीसाठीच्या विमानामध्ये 2 डिसेंबर रोजीच ग्रीन डिझेल भरले होते.
-विमानाच्या इंधन टाकीमध्ये 85 टक्के जेट फ्युलसोबत 15 टक्के ग्रीन डिझेल भरण्यात आले होते.
स्वस्तातील ग्रीन डिझेल
-पारंपरिक इंधनापेक्षा तुलनेने स्वस्त असलेले ग्रीन डिझेल सहज कोठेही सहज उपलब्ध होऊ शकते.
-ग्रीन डिझेल आणि "हेफा' या दोन्हींमधील रासायनिक गुणधर्म सारखेच आहेत.
-हेफा (हायड्रो प्रोसेस्ड ईस्टर्स अँड फॅटी ऍसिड्स) ला 2011 मध्ये हवाई वाहतुकीसाठीचे जैवइंधन म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
-ग्रीन डिझेल आणि बायोडिझेलमध्ये बराच फरक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत